राऊत आणि पवार यांच्यात रंगला ‘सामना’; टीकेला प्रत्युत्तर देत राऊत म्हणाले, मी कुठे म्हणतो…

| Updated on: May 10, 2023 | 11:42 AM

पवार यांनी सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नसल्याचं म्हणत पलटवार केला होता. त्यावर आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोंडीसह सामनावरून सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे.

Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाला नवं नेतृत्व देण्यात अपयशी ठरले अशी टीका केली होती. त्यांनी ही टीका पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून (Dainik Saamna) केली होती. यानंतर पवार (Sharad Pawar) यांनी सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नसल्याचं म्हणत पलटवार केला होता. त्यावर आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोंडीसह सामनावरून सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाहीत. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत. दरम्यान सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचं काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसतं. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असतं”, असे पवार म्हणाले.