ईडीचा सचिन वाझेला झटका; माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी….

| Updated on: May 25, 2023 | 7:09 AM

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते. आता ईडीकडून ही परवानगी मागे घेण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई : निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या अडचणीत वाढ होणार आहे. याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सचिन वाझेला माफीचा साक्षिदार म्हणून दिलेली परवानगी ईडीने मागे घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते. आता ईडीकडून ही परवानगी मागे घेण्यात आली आहे. सचिन वाझे हा सीबीआयच्या गुन्ह्यात देखील माफीचा साक्षीदार आहे. ईडीच्या गुन्ह्यात मात्र तो आता माफीचा साक्षीदार राहणार नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना मुंबईतील मोठे बार, रेस्टॉरंट आणि पबच्या मालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप केला होता.