महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती पालकमंत्री पदं मिळणार?

| Updated on: Jul 28, 2023 | 2:59 PM

VIDEO | राज्यात कोणत्या जिल्ह्याला कुणाला पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळणार? काय ठरला फॉर्म्युला?

Follow us on

मुंबई, 28 जुलै 2023 | महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपला १६, शिवसेनेला १० तर अजित पवार गटाला १० पालकमंत्रीपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या मंत्र्याला पालकमंत्री पद मिळावं, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हे सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील सत्तानाट्यानंतर राज्यातील जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार, नाशिक जिल्ह्याला छगन भुजबळ, पुणे जिल्ह्याला अजित पवार, बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे आणि कोल्हापूर जिल्ह्याला हसन मुश्रीफ यांना या जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.