धनुष्यबाणाची पुढची सुनावणी 17 जानेवारीला; काय होणार धनुष्यबाणाचं?

| Updated on: Jan 10, 2023 | 8:57 PM

राज्यातील सत्ता संघर्षावर गेली ६० एक दिवस सुनावणी सुरू आहे. आजही केंद्रीय निवडणूक आयोगात या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला

Follow us on

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत शिंदे गट तयार केला. भाजपच्या सोबत जात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ही स्थापन केले. त्यानंतर आधी शिवसेनेवर आणि त्यानंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर अधिकार सांगितला. त्यावरून खरी शिवसेना कोणाची? असा वाद सुरू झाला. हाच सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे.

शिवसेनेवर आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपला हक्क सांगितल्याने मध्यंतरी राज्य निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यावर शिंदे गटाने अक्षेप घेतला होता.

राज्यातील सत्ता संघर्षावर गेली ६० एक दिवस सुनावणी सुरू आहे. आजही केंद्रीय निवडणूक आयोगात या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. तर ठाकरे गटाला युक्तीवादासाठी 17 जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता सत्तासंघर्षावरील ही सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.