तीन वेळा Zelenskyy यांना मारण्याचा प्रयत्न? – Russia Ukraine War

| Updated on: Mar 04, 2022 | 8:19 PM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना एका आठवड्यात तिनदा मारण्याचे प्रयत्न झाल्याचा हा मोठा दावा आहे. त्यामुळे जगभरात खळबळ माजली असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. युद्ध न करण्याचा आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला यापूर्वी भारतानं रशियाला दिला आहे.

Follow us on

YouTube video player

कीव : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरु असून युक्रेनमधील (Ukraine) अनेक भागांना रशियानं लक्ष्य केलं आहे. रोज रशियाकडून (Russia) युक्रेनच्या वेगवेगळ्या आणि विशेषत: महत्वाच्या भागांवर हल्ले केले जात असल्यानं युक्रेनला प्रत्येक क्षणाला सतर्क रहावं लागत आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणांवर रशियानं हल्ले केले असल्यानं युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे.  यातच आता ब्रिटनमधील माध्यमांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना एका आठवड्यात तिनदा मारण्याचे प्रयत्न झाल्याचा हा मोठा दावा आहे. त्यामुळे जगभरात खळबळ माजली असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. युद्ध न करण्याचा आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला यापूर्वी भारतानं रशियाला दिला आहे. मात्र, अद्यापही रशियानं छेडलेलं युद्ध काही संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे दिवसागणिक युक्रेनमधील नागरिकांच्या अडचणी वाढतायेत.