युद्धभुमीजवळ पोहोचलं tv9 मराठी

| Updated on: Mar 04, 2022 | 10:58 PM

नवव्या दिवशी रशिया माध्यमांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष पोलंडमधये पळून गेल्याचे सांगत आहेत, मात्र युक्रेनियन माध्यमांनी मात्र हा दावा चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा सुरु करण्यात आला तेव्हा या ठिकाणी 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकले होते.

Follow us on

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध परिस्थितीने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्यामुळे आता भारतीय नागरिकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. यावेळी टीव्ही 9 मराठीने युद्धभूमीजवळ जाऊन तिथून युद्धाच्या घडामोडींचा सुनील काळे यांनी आढावा घेतला आहे. हंगेरीमधूनच युक्रेनला जाण्यासाठी मार्ग आहे. युद्ध काळात जे भारतीय मायदेशी परतले आहेत त्यातील बहुतांशी भारतीय नागरिक हे याच मार्गावरुन परतले आहेत. युक्रेनमध्ये जरी युद्धजन्य आणि परिस्थिती गंभीर असली तरी हंगेरियामध्ये मात्र शांतता दिसून येत आहे. नवव्या दिवशी रशिया माध्यमांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष पोलंडमधये पळून गेल्याचे सांगत आहेत, मात्र युक्रेनियन माध्यमांनी मात्र हा दावा चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा सुरु करण्यात आला तेव्हा या ठिकाणी 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकले होते.