Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage : बारावीचा निकाल लागला!  कोकण अव्वल; तुमचा निकाल tv9marathi.comवर

Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage : बारावीचा निकाल लागला! कोकण अव्वल; तुमचा निकाल tv9marathi.comवर

| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 12:28 PM

सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे.

पुणे : आजचा दिवस बारावीच्या निकालाचा होता. बारावीच्या निकालाची (HSC Results 2022) सगळ्यात मोठी बातमी आहे. यावर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण (Kokan) विभागाचा 97.21 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के इतका लागलाय, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली आहे.दरम्यान, यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला होता. यंदा निकालात कोकण आणि मुंबई सर्वात जास्त आणि सर्वात कमी अनुक्रमे पाहता येईल. त्यामुळे आजचा दिवस निकालाचा ठरला आहे.

Published on: Jun 08, 2022 12:20 PM