Video | भाजपच्या निलंबित आमदारांचा विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ

Video | भाजपच्या निलंबित आमदारांचा विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ

| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 6:06 PM

निलंबित बारा आमदार विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गेले. येथेही या बारा आमदारांनी गोंधळ घातला.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. या प्रकारानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानंतर आवाजी बहुमतानं भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. निलंबनानंतर बारा आमदार विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गेले. येथे निलंबित आमदारांनी उपाध्यक्षांपुढे त्यांची बाजू मांडली.