Vaishnavi Hagawane Case : मंत्री उदय सामंत वैष्णवीच्या आई वडिलांच्या भेटीला

Vaishnavi Hagawane Case : मंत्री उदय सामंत वैष्णवीच्या आई वडिलांच्या भेटीला

| Updated on: May 22, 2025 | 4:59 PM

Uday Samant Meet Kaspate Family : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी आज वैष्णवीच्या घरी भेट देऊन कसपटे कुटुंबाची भेट घेतली आहे.

मंत्री उदय सामंत हे वैष्णवीच्या आई वडिलांना भेटायला आलेले आहेत. कसपटे कुटुंबाच्या भेटीला सामंत आले असून त्यांच्याशी घडलेल्या प्रकाराबद्दल बातचीत केली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे यांची ती सून होती. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने स्वत:ला संपवलं. वैष्णवीच्या कुटुंबाने लग्नात हगवणे कुटुंबाने 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीचे भांडे आणि फॉरच्युनर कार हुंडा म्हणून दिलेली होती. असं असूनही वैष्णवीचा छळ हुंड्यासाठी झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेल आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मंत्री उदय सामंत यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कसून करावी अशा सूचना देखील त्यांनी पोलिसांना केलेल्या आहेत.

Published on: May 22, 2025 04:42 PM