Uddhav Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, जीव केवढा? अन् डोळे… ठाकरेंची नितेश राणेंवर जिव्हारी लागणारी टीका
शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन काल उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मुंबईतील षणमुखानंद सभागृह येथे साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत विरोधकांना जाहीर आव्हान दिले.
‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा…’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल मुंबईत शिवसेना वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांच्यावर ही जिव्हारी लागणारी टीका केली.
‘सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा’, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंना खोचक टोला लगावला तर डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, जीव केवढा, पार्श्वभूमी काय? वडिलांची पार्श्वभूमी काय? बोलतोय कोणावरती? कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या, असं म्हणत ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे…
