Navneet Rana | उद्धव ठाकरे फेसबूकचे मुख्यमंत्री, नवनीत राणा यांनी पुन्हा डिवचले

Navneet Rana | उद्धव ठाकरे फेसबूकचे मुख्यमंत्री, नवनीत राणा यांनी पुन्हा डिवचले

| Updated on: Aug 21, 2022 | 6:50 PM

Navneet Rana | अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे.

Navneet Rana | उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे फेसबूकचे मुख्यमंत्री (Facebook CM) असल्याचा टोला अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी लगावला. हनुमान चालिसावरुन नवनीत राणा, त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार राजकारण पेटले होते. राणा दाम्पत्याला तुरुंगाची हवा ही खावी लागली होती. दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसूख घेण्याची एकही संधी राणा दाम्पत्य दवडत नाही. अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पुन्हा ठाकरे यांना डिवचले. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तूती सुमने उधळली. ते भविष्यात देशाचे नेतृत्व करतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 21, 2022 06:50 PM