Raj-Uddhav Thackeray : मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं पॉझिटिव्ह उत्तर, आता संदेश नाहीतर थेट बातमी

Raj-Uddhav Thackeray : मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं पॉझिटिव्ह उत्तर, आता संदेश नाहीतर थेट बातमी

| Updated on: Jun 07, 2025 | 1:32 PM

राज ठाकरेंसोबत युती कधी करणार असं विचारलं असता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक नवी अट घातल्याचे दिसले.

मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिलं. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. युतीसंदर्भात संकेत नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मधल्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरे सूचक वक्तव्य केलंय. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केल्यांतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्राच्या मनात तेच होतं असं देशपांडे म्हणाले. तर संजय राऊतांनी ही युतीबद्दल सूचक वक्तव्य केलाय. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील असं राऊत यांनी म्हटलंय. बघा नेमकं राजकीय वर्तुळात काय घडतंय?

Published on: Jun 06, 2025 07:38 PM