Ujjwal Nikam : पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..

Ujjwal Nikam : पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..

| Updated on: Jul 13, 2025 | 5:05 PM

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ते आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. या नियुक्तीच्या वृत्तानंतर निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आभार व्यक्त केले.

निकम यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून मराठीत संवाद साधला. “मी मराठीत बोलू की हिंदीत?” असे विचारल्यानंतर मोदींनी मराठीतूनच संभाषणाला सुरुवात केली. त्यांनी मला सांगितले की, राष्ट्रपती महोदयांनी माझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. “ही प्रक्रिया इतक्या जलद गतीने होईल, असे मला वाटले नव्हते,” असे निकम म्हणाले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Published on: Jul 13, 2025 05:05 PM