Nirmala Sitharaman | 15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास क्षेत्राला मोठा प्रवाह देणारी महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी बजेट भाषणात 15,000 शाळांमध्ये “कंटेंट क्रिएटर लॅब्स” उभारण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये, क्रिएटिव्ह कौशल्ये आणि ऑनलाईन कंटेंट निर्माण क्षमतेला प्रोत्साहन मिळणार आहे.

या लॅब्सची स्थापना Indian Institute of Creative Technologies च्या मदतीने करण्यात येणार असून या प्लॅटफॉर्मद्वारे एनीमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) सारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळेल.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी सांगितले की, या लॅब्सच्या माध्यमातून यू‑ट्यूब, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियामध्ये कंटेंट निर्माण करणाऱ्या तरुणांना व्यावसायिक पातळीवर कौशल्ये विकसित करण्यास मदत मिळेल, ज्यामुळे त्यांना भविष्यात रोजगार व उद्योजकता दोन्ही क्षेत्रांत संधी मिळतील.