संजय गायकवाड थेट नुकसानग्रस्तांच्या दारी; तत्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना

संजय गायकवाड थेट नुकसानग्रस्तांच्या दारी; तत्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना

| Updated on: Apr 28, 2023 | 10:15 AM

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मोताळा तालुक्यात झालेल्या पावसाने अनेक भागात दाणादाण उडवून दिली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

बुलढाणा : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावासाचा लपंडाव गेल्या महिन्यापासून सुरू आहे. अवकाळीसह गारपीटाचा (hailstorm) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसाच तो सामान्यांनाही. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मोताळा तालुक्यात झालेल्या पावसाने अनेक भागात दाणादाण उडवून दिली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांचे घरावरील छप्पर उडून गेली. ज्यामुळे घरातील सर्व अन्नधान्य भिजले. शेतमाल भिजला आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील पंचनामे लवकरात लवकर व्हावीत यासाठी शिवसेना नेते आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत घेतलं होत. त्यामुळे पाहणी होताच तत्काळ पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

Published on: Apr 28, 2023 08:58 AM