Vaishnavi Hagawane Case : आईच्या मृत्यूनंतर निष्पाप लेकराचे हाल… 9 महिन्याचं बाळ 6 दिवसात 5 कुटुंबाकडे

Vaishnavi Hagawane Case : आईच्या मृत्यूनंतर निष्पाप लेकराचे हाल… 9 महिन्याचं बाळ 6 दिवसात 5 कुटुंबाकडे

| Updated on: May 24, 2025 | 11:29 AM

वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाचे अतोनात हाल झाले. गेल्या सहा दिवसांमध्ये वैष्णवीचं बाळ चार वेगवेगळ्या कुटुंबाकडे होतं. निर्दयी हगवणे कुटुंबामुळे नऊ महिन्याच्या बाळाचे हाल झाले. हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून सहा दिवस लपवून ठेवलं होतं.

निर्दयी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ सहा दिवस लपवलं. बाळ सहा दिवसात पाच कुटुंबांकडे. आई तर गेली मात्र नऊ महिन्याच्या बाळाचे अतोनात हाल. हगवणे कुटुंब वैष्णवीच्या बाळासोबतही निर्दयीपणे वागलंय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्याचं हे बाळ त्याच्या आत्याकडे होतं. पण हगवणे कुटुंबाला अटक झाल्यानंतर आत्यानं हे बाळ निलेश चव्हाण नावाच्या इसमाकडे सोपवलं. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे. त्याच निलेश चव्हाणाच्या घरी वैष्णवीचे काका बाळाला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. पण निलेश चव्हाणाच्या घराचा दरवाजा उघडलाच नाही. त्यानंतर वैष्णवीचे काका बावधन पोलीस ठाण्यात जायला निघाले. तेवढ्यात शशांक हगवणेचा मावसभाऊ अमित पवळे यांनी हे बाळ आपल्याकडे होतं असं टीव्ही नाईन मराठीला सांगितलं. हे बाळ तब्बल तीन दिवस अमित पवळेच्या घरी होतं. आईवडील बाळाला घेऊन बावधन पोलीस ठाण्यात गेले आहेत असं अमित पवळे म्हणाले होते. पण त्याच वेळी वैष्णवीच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. वैष्णवीचं बाळ आपल्याकडे आहे असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर हे नऊ महिन्याचं बाळ त्या अज्ञात व्यक्तीनं वैष्णवीच्या वडिलांकडे दिलं.

Published on: May 23, 2025 11:31 AM