Vaishnavi Hagawane : सगळं देऊनही माझ्या मुलीला तान्ह्या बाळासोबत उन्हात उभं केलं, वैष्णवीच्या वडिलांचे गंभीर आरोप

Vaishnavi Hagawane : सगळं देऊनही माझ्या मुलीला तान्ह्या बाळासोबत उन्हात उभं केलं, वैष्णवीच्या वडिलांचे गंभीर आरोप

| Updated on: May 21, 2025 | 7:28 PM

Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना वैष्णवीवर होणाऱ्या छळाची पूर्ण हकीकत सांगितली आहे.

लग्नात सासरच्यांनी 50 तोळे सोनं आणि फॉरच्युनर गाडी मागितली होती, असं वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटे यांनी म्हंटलं आहे. त्यानंतर लग्नाच्या 6 महिन्यातच वैष्णवीच्या सासूने चांदीची भांडी मागितली होती, असंही मृत वैष्णवीच्या वडिलांकडून सांगण्यात आलं आहे. दिवसभर वैष्णवीचा छळ करून तिला मारण्यात आलं, असा आरोप देखील कसपटे यांनी केला आहे.

यावेळी कसपटे यांनी बोलताना सांगितलं की, माझ्या मुलीला तिच्या 6 महिन्यांच्या बाळासोबत उन्हात उभं केलं होतं. हत्येच्या 3 दिवस आधीपासून त्यांच्यात वाद सुरू होता. तिला टॉर्चर करून मारण्यात आलं. आत्महत्या हा बनाव आहे, असे गंभीर आरोप वैष्णवीच्या वडिलांनी यावेळी केलेले आहेत. लग्नात देण्यासाठी मी आधी वेगळी गाडी बूक केली होती. मात्र ही गोष्ट शशांक हगवणे यांना समजताच त्यांनी मला सांगितलं की मला फॉरच्युनर गाडीच हवी, नाही तर मी लग्नात येणार नाही, असा हट्ट शशांकने धरल्याचंही कसपटे म्हणाले.

Published on: May 21, 2025 07:28 PM