Sangali News : सांगलीतील वंचितकडून खासगी रुग्णालयाची तोडफोड

Sangali News : सांगलीतील वंचितकडून खासगी रुग्णालयाची तोडफोड

| Updated on: Jun 03, 2025 | 4:36 PM

सांगलीत वंचित बहुजन आघाडीकडून एका खासगी रुग्णालयात तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

वंचितकडून सांगलीत खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सांगली शहरातल्या विश्रामबाग चौक येथील असणाऱ्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

दरम्यान रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात. मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली आहे. गोरगरीब रुग्णांकडून अशाप्रकारे पैसे उकळले जात असतील तर अशीच तोडफोड केली जाईल असा इशारा वंचितकडून देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jun 03, 2025 04:35 PM