नाराज वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, काय घेणार भूमिका?
काही दिवसांपासून वर्षा गायकवाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच आज वर्षा गायकवाड या अचानक थेट दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
Varsha Gaikwad : मुंबईतील जागांचा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील जागांवरुन तिढा सुरु असतानाच आता वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. काही दिवसांपासून वर्षा गायकवाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांची आहे.याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो काही दिवसांनंतर सुटला. पण असं असलं तरी अजून काही जागांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम आहे.
Published on: Apr 13, 2024 05:25 PM
