VIDEO | ‘नाव देण्यात भाजप आणि पंतप्रधान मोदी हे पटाईत’; कुणी केलीय खोचक टीका

| Updated on: Aug 26, 2023 | 3:03 PM

23 ऑगस्टला जगाच्या इतिहास भारताचे मोठं नाव झालं आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी जे कोणाला जमलं नाही, ते करून दाखवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ चे यशस्वी केलं आणि लँडर चंद्रावर उतरले.

Follow us on

नागपूर : 26 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतत असतानाच बेंगळुरूला गेले. तेथे त्यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांची भेट घेऊ त्यांचे गौरव करत पाठ थोपटली. तसेच त्यावेळी त्यांनी, चांद्रयान-३ चे, चांद्रयान-2 मिशन आणि महत्वाच्या दिवस अशा तीन मोठ्या घोषणा केल्या.  चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरले त्याला ‘शिवशक्ती’ असे नाव देण्यात आले.

तर चांद्रयान-2 मिशनच्या वेळी विक्रम लँडर जिथे पोहोचला पोहचला त्यास ‘तिरंगा पॉइंट’ आणि 23 ऑगस्ट या दिवसाची ओळख ही ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ असेल अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र यांनी केल्या. त्यावरून काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

वडेट्टीवार यांनी, देशाचे पंतप्रधान मोदी हे इस्त्रोतील शास्त्रज्ञांची भेट घेण्यासाठी गेले ही चांगली आणि अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी जो रोड शो केला तो त्या शास्त्रज्ञांना घेऊन करायला हवा होता. तर चांद्रयानच्या मोहिमेला शिवशक्ती नाव दिलं. त्यावरून टीका करताना वडेट्टीवार यांनी, भाजप आणि मोदी हे नाव देण्यात पटाईत आहेत असा टोला लगावला आहे. तर मेहनत शास्त्रज्ञांनी केलीय, नाव शास्रज्ञांचं झालंय पण त्याचा निवडणूकीत फायदा उचलायचा कसा हे आता चाललंय. पण काहीही नाव दिलं तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.