Maharashtra Politics : मारा.. झोडा.. राज्य करा! 3 पक्षांच्या सत्तेत मारहाणीच्या घटनांचा त्रिकोण पूर्ण

Maharashtra Politics : मारा.. झोडा.. राज्य करा! 3 पक्षांच्या सत्तेत मारहाणीच्या घटनांचा त्रिकोण पूर्ण

| Updated on: Jul 21, 2025 | 8:40 AM

लातूरमधल्या घटनेनंतर सत्तेतील तिन्ही पक्षांमधल्या लोकांच्या मारहाणीचा त्रिकोणही पूर्ण झाला आहे.

लातूरमधल्या घटनेनंतर सत्तेतील तिन्ही पक्षांमधल्या लोकांच्या मारहाणीचा त्रिकोणही पूर्ण झाला आहे. आधी मंत्रालयाच्या कँटिनमध्ये भातावरच वरण खराब निघालं म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर विधान भवनात जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतच्या वादानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरातच आव्हाडांच्या समर्थकला मारहाण केली होती. विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर मकोकाची कलमं आहे. जिथे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळली जाते, आशा विधीमंडळाच्या परिसरातून याच आरोपीने कायदा सुव्यवस्थेची धिंड काढली. त्यानंतर हा त्रिकोण पूर्ण करण्याची जबाबदारी सत्तेतील अजित दादांच्या गटाने घेत पार पडली आहे. लातूरमध्ये कोकाटे यांच्या पत्ते खेळण्याविरोधात तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना जबर मारहाण केली आहे.

Published on: Jul 21, 2025 08:39 AM