Special Report | राज ठाकरेंना ज्यांनी उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाऊल ठेवू दिलं नाही ते बृजभूषण सिंह महाराष्ट्रात आल्यावर मनसे काय भूमिका घेणार

| Updated on: Jul 30, 2022 | 2:02 AM

मनसेचे कट्टर विरोधक असलेल्या बृजभूषण सिंह यांचीच भेट घेतलीय आणि त्यांना महाराष्ट्रात येण्य़ाचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरेंना ज्यांनी उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाऊल ठेवू दिलं नाही. ते बृजभूषण सिंह महाराष्ट्रात आल्यावर मनसे काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

Follow us on

मुंबई : ज्यांनी राज ठाकरेंना जाहीरपणे ललकारलं. ज्यांच्यामुळं राज ठाकरेंना( Raj Thackeray) अयोध्येचा दौरा स्थगित करावा लागला. ते बृजभूषण सिंह(Brijbhushan Singh) महाराष्ट्रात येणार आहेत. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ही माहिती दिलीय. दीपाली सय्यद सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत त्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतायत. आज त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेल्या बृजभूषण सिंह यांचीही भेट घेतली आणि महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली. भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह म्हणजे डॅशिंग माणूस. जे बोलतो ते करतो. महिला महाराष्ट्र केसरी लवकरात लवकर व्हावी यासाठी ही भेट झाली. लवकरच ते मुंबईत येणार आहेत. भेट झाल्याबद्दल पवार साहेबांचे खूप धन्यवाद असे ट्विट केलेय. आता तर त्यांनी मनसेचे कट्टर विरोधक असलेल्या बृजभूषण सिंह यांचीच भेट घेतलीय आणि त्यांना महाराष्ट्रात येण्य़ाचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरेंना ज्यांनी उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाऊल ठेवू दिलं नाही. ते बृजभूषण सिंह महाराष्ट्रात आल्यावर मनसे काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.