Maharashtra Heavy Rain Alert | महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

Maharashtra Heavy Rain Alert | महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:08 AM

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

मुंबई: महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागनं सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केलेले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.