tv9 Marathi Special Report | मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी लागण्याची शक्यता

tv9 Marathi Special Report | मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी लागण्याची शक्यता

| Updated on: Jan 22, 2026 | 10:59 AM

29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज, 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत निघेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला यामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंकडे एसटी प्रवर्गाचे 02 नगरसेवक आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे हे बीएमसीत बाजीगर ठरतील. कारण बहुमत असलेल्या महायुतीकडे एसटी प्रवर्गाचा नगरसेवकच नाही. जर एसटीच आरक्षण निघालं तर काय?

29 महापालिकेच्या निवडणुका होऊन त्याचा निकाल लागला आता मुंबईचा महापौर कोण? होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेत महापौर पदावरून रस्सीखेंच सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा महापौर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज, 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत निघेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला यामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंकडे एसटी प्रवर्गाचे 02 नगरसेवक आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे हे बीएमसीत बाजीगर ठरतील. कारण बहुमत असलेल्या महायुतीकडे एसटी प्रवर्गाचा नगरसेवकच नाही. जर एसटीच आरक्षण निघालं तर काय? ठाकरेंचा महापौर होण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. त्यामुळे आज नेमकं काय घडणार? जुन्या पद्धतीने लॉटरी काढली जाणार की नव्या? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jan 22, 2026 10:50 AM