Sanjay Shirsat | वेदांतामागे डिलिंग कोणाची? आमदार संजय शिरसाट यांनी माजी उद्योगमंत्र्यांवर काय साधला निशाणा?

Sanjay Shirsat | वेदांतामागे डिलिंग कोणाची? आमदार संजय शिरसाट यांनी माजी उद्योगमंत्र्यांवर काय साधला निशाणा?

| Updated on: Sep 15, 2022 | 6:11 PM

Sanjay Shirsat | वेदांता कंपनी महाराष्ट्रातून एका दिवसात राज्यबाहेर गेली का? असा प्रश्न विचारत, डिलिंग न झाल्यानेच ही कंपनी राज्याबाहेर गेल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला.

Sanjay Shirsat | वेदांता कंपनी (Vedanta Company) महाराष्ट्रातून एका दिवसात राज्यबाहेर गेली का? असा प्रश्न विचारत, डिलिंग न झाल्यानेच ही कंपनी राज्याबाहेर गेल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केला. त्यांनी यावेळी माजी उद्योगमंत्र्यांवर (Former Minister) निशाणा ही साधला. वेदांता कंपनी गुजरातला गेल्यावर विरोधक आंदोलन करत आहे. पण हे आंदोलन ढोंग असल्याचे ते म्हणाले. ही कंपनी एका दिवसात बाहेर गेली नाही. या कंपनीला गेल्या सरकारने अर्थपूर्ण डिलींग न झाल्यानेच राज्यात सोयी-सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे कंपनीने बाहेरचा रस्ता धरला. त्यात गुजरातमध्ये त्यांना सोयी-सुविधा मिळाल्याने ती तिकडे गेली. पण अर्थपूर्ण डिलींग न झाल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगत त्यांनी माजी उद्योगमंत्र्यांना याविषयीची माहिती विचारा असेही सांगितले.