AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्री 2026

Durga Puja
Durga Puja Durga Puja
नवरात्र

मंत्र

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

म्हणजे देवी पृथ्वी, अग्नि, वायू, जल, आकाश या समस्त भूतांमध्ये शक्तीच्या रुपात अस्तित्वात आहे. या शक्तीमुळेच समस्त भूत आणि सकल पदार्थ गतिमान आहेत. त्या परम शक्तीला माझा अनेकवार नमस्कार आहे.

नवरात्र

व्हिडीओ

नवरात्र

बातम्या

navratri
नवरात्रीत कुलदेवतेचा फुलोरा नेमका कोणत्या माळेला बांधतात? पाचवी....
नवरात्रीमध्ये घरातील झाडू बदल्यास घडेल चमत्कार, जाणून घ्या त्यामागचं रहस्य
नवरात्रीमध्ये घरातील झाडू बदल्यास घडेल चमत्कार, जाणून घ्या...
नवरात्रीमध्ये दान धर्म केल्यामुळे नेमकं काय होते? जाणून घ्या…
नवरात्रीमध्ये दान धर्म केल्यामुळे नेमकं काय होते? जाणून घ्या...
अष्टमीला कन्या पूजन केल्याने मिळेल देवीचा आशीर्वाद, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त
अष्टमीला कन्या पूजन केल्याने मिळेल देवीचा आशीर्वाद, जाणून घ्या महत्त्व
Is it a sin to eat onion and garlic during Navratri, Let find out what Premanand Maharaj has to say about this
नवरात्रीत लसूण,कांदा खाणे पाप आहे का?प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले
नवरात्रीमध्ये कलशावर नारळ ठेवण्याचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?
नवरात्रीमध्ये कलशावर नारळ ठेवण्याचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?
नवरात्रीमध्ये काय करावे? काय करू नये जाणून घ्या….
नवरात्रीमध्ये काय करावे? काय करू नये जाणून घ्या....
लग्नाच्या नवसासाठी ओळखली जाणारी पुण्यातील पिवळी जोगेश्वरी देवी; कुठे आहे मंदिर?
लग्न जुळावं यासाठी इथे करतात नवस; पुण्यातील पिवळी जोगेश्वरीचं मंदिर
Loudspeaker allowed till 12 midnight on these 3 days of Navratri in Mumbai
मुंबईत नवरात्रीत 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकरला परवानगी
Mahur Renuka Devi : माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात, रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
Kolhapur Mahalaxmi : अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
Navratri 2024 : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी वणीच्या गडावर सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ

नवरात्रोत्सव

सनातन परंपरेत शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या 9 दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची 9 स्वरुपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीत शक्तीच्या नऊ स्वरुपात शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, देवी स्कंद माता, माता कात्यायनी, माँ कालरात्री, देवी महागौरी आणि सिद्धिदात्रींचा समावेश आहे. त्यांची या नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.

या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते. देवीच्या कृपेने भक्तांना कधी धन धान्याची कमी जाणवत नाही. शारदीय नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी विशेष मंडप टाकून तिची साधना आणि आराधना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सर्वात मोठा पर्व मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये महिषासुरमर्दिनीची विशेष पूजा केली जाते. ढोल वाजत दुर्गा पूजा केली जाते. आरती केली जाते. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात देवी बसवल्या जातात. देवीची नऊ दिवस उपासना करून गरबा खेळला जातो.