Saksham Tate Murder case : सक्षम ताटे याला संपवण्यापूर्वी घराबाहेर रेकी ? तो व्हिडीओ समोर येताच खळबळ
नांदेडमध्ये ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेने राज्य हादरले आहे. प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून ते पोलिसांच्या हाती लागल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
प्रेमात असलेला माणूस अख्खं जग जिंकू शकतो, असं म्हणता. पण त्याच प्रेमापायी जीव गेला तर ? नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वीच घडलेल्या एका हत्याकांडाने राज्य हादरलंय. आपली मुलगी दुसऱ्या जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडली, हे सहन न झाल्याने त्याच मुलीच्या घरच्यांनी त्या तरूणाला निर्घृणपणे संपवलं. ऑनर किलींगच्या या घटने सक्षम ताटे (Saksham Tate Murder) या 19-20 वर्षांच्या तरूणाचा हकनाक बळी गेला. आधी गोळ्या झाडून, नंतर त्याच्या डोक्यात दगड मारून आरोपींनी त्याची हत्या केली. नांदेडच्या (Nanded Crime) जुनागंज भागात हा प्रकार घडला, त्यामुळे प्रचंड खळबळ माजली.
मात्र प्रियकराचा मृत्यू झाल्यानंतरही ती तरूणी हरली नाही. आपलं ज्याच्यावर प्रेम होतं, त्याला वडिलांनी आणि भावांनी संपवल्यावरही आचल मामीडवार या तरूणीचा निर्धार ठाम होता. तिने सक्षम याच्या मृतदेहाशी लग्न केलं आणि आता त्याच्या घरच्यांसोबत ती रहात आहे. अख्ख्या शहारसाह राज्याला हादरवणाऱ्या या घटनेत अनेक आरोप प्रत्यारोप होत असून रोज नवनवे अपडेट्सही समोर येत आहेत. त्यातच आता एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळ मिळू शकतं.
आरोपींचं ते कृत्य सीसीटीव्हीत कैद
आचलचे वडील आणि दोन भावांनी इतरांसहमिळून सक्षमला ठार मारलं. मात्र त्याची हत्या करण्यापूर्वी आचल हिचा भाऊ, आरोपींपैकी एक असलेला तरूण हा त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत सक्षम याच्या घराबाहेर उभा होता, तिथली टेहाळणी, रेकी करत होता. तिथे जवळच असलेल्या सीसीटीव्हीत हा रेकीचा सर्व प्रकार कैद झाला असून तो व्हिडीओ आता समोर आला आहे. त्या फुटेजमध्ये सुमारे 4ते 5 तरूण दिसत असून ते घराच्या बाहेर उभे राहून चर्चा करत असल्याचेही व्हिडीओत स्पष्ट कैद झालं आहे. सक्षम ताटे याच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती हे फुटेज लागलं असून त्याआधारे आता ते या तरूणांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं ?
आंचल मामीडवार हिचे भाऊ आणि सक्षम ताटे हे चांगले मित्र होते, त्यातून सक्षमचं त्यांच्या घरी येण जाणा व्हायचं. आचलशी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे वेगळ्या जातीचे असल्याने आचलच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं, त्यांनी आचलला लांब राहण्यास सांगितलं होतं. सक्षमविरोधात खोटी तक्रारही करायला लावली होती. मात्र त्यांचं नातं सुरूच होतं. अखेर याच रागातून आचलचे वडील आणि दोन भाऊ यांनी मिळून सक्षमची हत्या केली. आधी त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, तरीही सक्षम जिवंत होता. ते लक्षात आल्यावर आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केलं. सक्षम याच्या निधनानंतर आंचलने त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं. एवढंच नव्ह तर आता ती त्याच्या कुटुंबियांसोबत त्यांच्याच घरीही राहते. सक्षमच्या आईनेही आचलची शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय जाहीर केला. मी तिला मुलगी नव्हे, माझा मुलगा, माझा सक्षम मानणार, असं त्या म्हणाल्या. सक्षमला ज्यांनी मारलं, ज्यांनी त्याचा जीव घेतला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आंचल तसेच सक्षम याच्या आईनेही केली आहे.