UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 7मध्ये मविआची सत्ता, यंदा काय बाजी मारणार?
Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi:उल्हासनगर प्रभाग सातमधील आरक्षण पाहायला गेलो तर सात अ येथे अनुसूचित जाती महिला, सात ब येथे मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सात क येथे सर्वसाधारण आणि सात ड येथे सर्वसाधारण असे देण्यात आले आहे.

राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उलट्यासुलट्या युती आणि आघाड्या झाल्या आहेत. मित्र एकमेकांचे शत्रू म्हणून लढताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी अनेक वर्षापासूनचे एकमेकांचे शत्रू मित्र म्हणून लढताना दिसत आहे. तर काही ठिकाणी तर जे पक्ष कधीच युती किंवा आघाडीत एकत्र येणार नाहीत, असं राज्यात वर्षानुवर्षाचं चित्र होतं, ते साफ पुसलं गेलं आहे. दरम्यान, उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग सातमध्ये यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर प्रभार सातची एकूण लोकसंख्या 28402 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 11195 तर अनुसूचीत जमाती 195 आहेत. तसेत या प्रभागाची व्याप्ती नानिक जौरा चौकापासून ते खेमानी रोड रुहानी सतसंग, चंद्रशेखर आझाद स्कुल, रामभाऊ म्हाळगी चौक, संविधान चौक, भैय्यासाहेब आंबेडकर नगर, पोलिस चौकी, संत आशाराम आश्रम, जकात नाका, रमाबाई टेकडी, जीएर आर, हनुमान नगर, महानगरपालिका शौचालय, आईस फॅक्टरी, ऑर्डिनन्स फॅक्टरी कंपाऊंड, वडार कॉलनी, आनंद शिंदे हाऊस, बुध्द नगर, पायऱ्या पर्यंत आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
उल्हासनगर प्रभाग सातमधील आरक्षण पाहायला गेलो तर सात अ येथे अनुसूचित जाती महिला, सात ब येथे मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सात क येथे सर्वसाधारण आणि सात ड येथे सर्वसाधारण असे देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या पंचम कलानी या सध्या नगरसेविका आहेत.
पूर्व उल्हासनगर महानगरपालिकेने एमआयडीसी कंपाऊंड भिंतीजवळील हद ऑडिनन्स फॅक्टरी कंपाऊंड आहे. दक्षिण – उल्हासनगर महानगरपालिकेची हद्द ऑडिनन्स फॅक्टरीच्या कंपाऊंड भिंतीपासुन राधे कृष्ण मंदिर मार्ग, आनंद शिंदे घराजवळील वडार कॉलनी पर्यंत, ज्यामध्ये वडार कॉलनी, बुध्द नगर आणि नंतर बाल्कनजी बारीच्या दक्षियेकडील कंपाऊंडमधील अंतर्गत रस्त्याने, मिलन दर्शन सोसायटीला लागून असलेल्या पायऱ्या आणि रॅम्पद्वारे, गुरु नानक जीरा चौकापर्यंत आहे. पश्चिम-गुरु नानक जीरा चौक, मिलन दर्शन सोसायटी समोरून मार्गे रुहानी सत्संग हॉल चौकातून चालू रस्त्याने आणि नंतर आझाद सोप कारखान्याकडे वळून साऊघ्रन अँड ईस्टर्न कंपाउंड मार्गे खेमानी स्कूल आणि सतनाम शेड मार्गे मेन रोड, बरेक नंबर ५९७ आणि संत अशाराम बापू रोड मार्गे उल्हासनगर महानगरपालिकेच्या म्हारळ गांव हद्दीपर्यंत आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
