AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi Winner LIVE : ‘बिग बॉस मराठीने माझं नाव…’, तन्वी कोलतेची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Apr 19, 2026 | 11:30 PM
Share

Bigg Boss Marathi Season 6 Grand Finale Tanvi Kolte and Raqesh Bapat Winner 2026 LIVE Updates : बिग बॉस मराठी सीजन 6 चा फिनालेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच आता राहिलेल्या पाच स्पर्धकांमध्ये कोण शेवटी विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. बिग बॉस फिनाले संदर्भातील प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर.

Bigg Boss Marathi Winner LIVE : 'बिग बॉस मराठीने माझं नाव...', तन्वी कोलतेची पहिली प्रतिक्रिया काय?

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Apr 2026 11:21 PM (IST)

    Bigg Boss Marathi Winner LIVE : बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेता ठरताच तन्वीची भावनिक प्रतिक्रिया समोर, काय म्हणाली?

    ‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती ठरलेल्या तन्वी कोलते हिने आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना भावनिक वक्तव्य केलं आहे. “बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं आहे,” असं म्हणत तिने या शोबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

  • 19 Apr 2026 11:10 PM (IST)

    Bigg Boss Marathi Winner LIVE : ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती ठरली तन्वी कोलते; ट्रॉफीवर कोरलं नाव

    ‘बिग बॉस मराठी 6’चा बहुप्रतीक्षित महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून या सिझनची विजेती म्हणून तन्वी कोलते हिने बाजी मारली आहे. प्रेक्षकांच्या भरघोस मतांच्या जोरावर तन्वीने ट्रॉफी जिंकत स्वतःची दमदार छाप पाडली.

  • 19 Apr 2026 10:32 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉसला मिळाले टॉप 2, हा स्पर्धक टॉप 3 मधून बाहेर

    बिग बॉसच्या टॉप 3 स्पर्धकांमधून तन्वी कोलते आणि राकेश बापट हे सेफ झाले असून टॉप 3 मधून विशाल कोटियन बाहेर पडला आहे.

  • 19 Apr 2026 10:21 PM (IST)

    16 स्पर्धकांनीपैकी या स्पर्धकाने बिग बॉसच्या फिनालेला मारली दांडी, कोण आहे तो स्पर्धक?

    बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला रुचिता जामदारने दांडी मारली आहे. पण ती या सोहळ्याला का गैरहजर आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
  • 19 Apr 2026 10:11 PM (IST)

    बिग बॉसने टॉप 3 निवडण्यासाठी असा खेळ खेळला पाहून सर्वांनाच बसला धक्का, डोळ्यांवर पट्टी बांधली अन् गायब झाला चौथा स्पर्धक

    बिग बॉसने टॉप 3 निवडण्यासाठी असा खेळ खेळला पाहून सर्वांनाच बसला धक्का, डोळ्यांवर पट्टी बांधली अन् गायब झाला चौथा स्पर्धक. हा चौथा स्पर्धक म्हणजे अनुश्री माने.  सध्या आता टॉप 3 स्पर्धक आहेत. यामध्ये आता कोण ठरणार विजेता हे बघावे लागेल.

  • 19 Apr 2026 10:04 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘मी ट्रॉफी घेऊन जाणार म्हणणारी स्पर्धक टॉप 4 मधून बाहेर, प्रेक्षकांना मोठा धक्का

    बिग बॉसच्या टॉप 4 मधून अनुश्री माने ही बाहेर पडली आहे. यानंतर आता टॉप 3 स्पर्धक उरले आहेत.  अनुश्री माने बाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • 19 Apr 2026 09:54 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दिसणार दिसणारा बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टरार कोण?

    बिग बॉस मराठी सीझन 6 च्या महाअंतिम सोहळ्यात रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या आगमी चित्रपटाचं प्रमोशन केलं. यावेळी तिथे जेनेलिया देखील उपस्थित होती. ती या चित्रपटाची निर्माती आहे. यावेळी या चित्रपटातील स्टारकास्ट बद्दल बोलताना रितेश देशमुखने या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील दिसणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 19 Apr 2026 09:32 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : टॉप 5 मधून बाहेर पडलेल्या दीपाली सय्यदला किती रुपये मिळणार?

    दिपाली सय्यद ही बिग बॉसच्या टॉप 5 मधून बाहेर पडली आहे. मात्र, जेव्हा रितेशने 5 स्पर्धकांना 5 लाख रुपयांची सुटकेस ऑफर केली तेव्हा कोणीच बाहेर पडले नाही. त्यामुळे हे पाच लाख रुपये कोणालाच मिळाले नाहीत.

  • 19 Apr 2026 09:25 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : फिनालेत राधा पाटीलचा धमाकेदार परफॉर्मन्स

    बिग बॉस मराठी सीझन 6 ची स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राधा पाटील उर्फ ​​राधा मुंबईकर हिने महाअंतिम सोहळ्यात लावणी सादर केली आहे.

  • 19 Apr 2026 09:06 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉसच्या टॉप 5 मधून दिपाली सय्यद बाहेर

    बिग बॉस मराठी सीजन 6 च्या फिनालेत शेवटच्या टॉप 5 मधून मोठी अपडेट समोर आली आहे. या टॉप 5 मधून दीपाली सय्यद ही बाहेर पडली आहे.

  • 19 Apr 2026 08:52 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉसच्या घरात दुबईतील परिस्थितीवर चर्चा, समोर आली मोठी अपडेट

    ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये खास सेगमेंटदरम्यान होस्ट रितेश देशमुखने सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिषेक बच्चनकडे सोपवली. या वेळी अभिषेकने स्पर्धक रिझवानशी संवाद साधत दुबईतील परिस्थितीबाबत प्रश्न विचारला. त्यावर रिझवानने मीडियामध्ये दाखवल्याप्रमाणे परिस्थिती इतकी गंभीर नसल्याचे सांगत, तेथे शाळा, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले.

  • 19 Apr 2026 08:42 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : जेनेलियाची बिग बॉसच्या फिनालेमध्ये उपस्थिती, मराठमोळ्या लुकने वेधलं लक्ष

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यात होस्ट रितेश देशमुखसोबत त्याची पत्नी जेनेलिया देशमुख पहिल्यांदाच मंचावर दिसली. आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चनसोबत ती या शोमध्ये सहभागी झाली आहे. यावेळी जेनेलियाने नेसलेली महाराष्ट्रीयन खणाची साडी आणि तिचा आकर्षक लूक विशेष चर्चेत राहिला.

  • 19 Apr 2026 08:37 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’ फिनालेत अभिषेक बच्चनची खास उपस्थिती

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यात अभिषेक बच्चन यांनी मंचावर हजेरी लावत होस्ट रितेश देशमुखसोबत रंगत वाढवली. यावेळी अभिषेकने रितेशचे कौतुक करत, ‘तो माझ्या लहान भावासारखा आहे आणि या शोसाठी यापेक्षा उत्तम सूत्रसंचालक मिळू शकत नाही’ असे म्हणत शोबद्दलही आनंद व्यक्त केला.

  • 19 Apr 2026 08:22 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉसच्या फिनालेमध्ये ‘धुरंधर 2’ डंका

    बिग बॉस मराठी सीजन 6 च्या फिनालेला सुरुवात झाली आहे. यामध्ये शेवटचे पाच स्पर्धक हे गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये एका स्पर्धकाने धुरंधर 2 मधील गाण्यावर डान्स केला आहे.

  • 19 Apr 2026 08:18 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’ विजेत्यावर होणार पैशांचा पाऊस, बंपर बक्षिसांची घोषणा

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यात होस्ट रितेश देशमुख यांनी विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसांची घोषणा केली. यंदाचा विजेता ट्रॉफीसोबतच 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकणार आहे. याशिवाय त्याला एक ई-स्कूटर, 6 लाख रुपयांचे गिफ्ट व्हाउचर आणि आकर्षक हिऱ्यांचे दागिनेही देण्यात येणार आहेत.

  • 19 Apr 2026 08:13 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’ फिनालेची भावूक सुरुवात

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात भावूक वातावरणात झाली. होस्ट रितेश देशमुखने दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्याने आशा भोसले यांचं निधन हे संगीत क्षेत्रासाठी मोठं नुकसान असल्याचं सांगत, त्यांचा आवाज आजही प्रत्येकाच्या हृदयात कायम घुमत राहील अशा भावना व्यक्त केल्या.

  • 19 Apr 2026 08:05 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : सस्पेन्स वाढला, बिग बॉस मराठी 6 चे शेवटचे टॉप 2 स्पर्धक कोण?

    ‘बिग बॉस मराठी 6’चा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता सर्वांचं लक्ष विजेता कोण होणार आणि ट्रॉफी कुणाच्या घरी जाणार याकडे लागलं आहे. अशातच सोशल मीडियावरील चर्चेनुसार तन्वी कोलते सध्या आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर विशाल कोटीयन उपविजेतेपदासाठी स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, विजेता आणि उपविजेता यांची अधिकृत घोषणा आजच्या महाअंतिम सोहळ्यातच होणार आहे.

  • 19 Apr 2026 07:54 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉस मराठी सीजन 6 च्या विजेत्याच्या ट्रॉफीचे अनावरण, फोटो समोर

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी विजेत्याच्या ट्रॉफीचे भव्य अनावरण करण्यात आले आहे. आकर्षक डिझाइन आणि खास थीम असलेली ही ट्रॉफी यंदाच्या सीझनचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ट्रॉफीची झलक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून, आता सीजन 6 चा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 19 Apr 2026 07:49 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’मधून आतापर्यंत कोण-कोण बाहेर?

    बिग बॉस मराठी 6’मध्ये स्पर्धा रंगत असतानाच अनेक स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष साळुंखे, करण सोनावणे, सचिन कुमावत, रुचिता जामदार, रोशन भजंकर, प्रभू शेळके, संकेत पाठक, सागर कारंडे, संस्कृती आणि राखी सावंत हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून विजेतेपदासाठी उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरस अधिकच वाढली आहे.

  • 19 Apr 2026 07:47 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : फिनालेपूर्वी बिग बॉसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप, या स्पर्धकांने पाठवली नोटीस, काय घडलं?

    ‘बिग बॉस मराठी 6’च्या माजी स्पर्धक सोनाली राऊत हिने शोमधील राहणीमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने घर अस्वच्छ आणि जेवणाबाबत गंभीर आरोप करत निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.

  • 19 Apr 2026 07:35 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : फिनालेपूर्वी बिग बॉसमध्ये मोठी घडामोड, विजेता म्हणून ज्याच नाव चर्चेत तो फिनालेमधून बाहेर पडला?

    बिग बॉस मराठी सीजन 6 च्या फिनालेला काही मिनिटे शिल्लक असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. बिग बॉस सीजन 6 चा विजेता म्हणून सोशल मीडियावर चर्चा रंगलेला राकेश बापट हा पाच लाख रुपये घेऊन बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसं नवीन आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

  • 19 Apr 2026 07:14 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : बिग बॉस फिनालेपूर्वी मोठी बातमी समोर, हा स्पर्धक 5 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडणार?

    बिग बॉस मराठी 6’च्या फिनालेपूर्वी नवा प्रोमो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता राकेश बापट ब्रीफकेस टास्कदरम्यान बझरकडे जाताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर तो 5 लाख रुपयांची ब्रीफकेस स्वीकारून शोमधून बाहेर पडणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती फिनालेमध्येच स्पष्ट होणार आहे.

  • 19 Apr 2026 06:55 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : हा स्पर्धक होणार पाचव्या स्थानी एलिमिनेट? नाव प्रचंड चर्चेत

    ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेपूर्वी मोठी चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिपाली सय्यद या पाचव्या स्थानावर एलिमिनेट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. शो सुरू झाल्यानंतरच याची स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

  • 19 Apr 2026 06:45 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’ ग्रँड फिनाले,  शेवटचे पाच स्पर्धक कोण? 

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या टॉप-5 स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘शेरनी’ म्हणून ओळखली जाणारी अनुश्री माने, ‘क्वीन ऑफ बिग बॉस’ तन्वी कोलते, ‘रणरागिणी’ दिपाली सय्यद, ‘मास्टरमाइंड’ विशाल कोटीयन आणि ‘जेंटलमन’ राकेश बापट यांचा समावेश आहे. या पाचही स्पर्धकांमधून आता विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 19 Apr 2026 06:34 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेत राखी सावंतचा धमाकेदार परफॉर्मन्स

    बिग बॉस मराठी 6’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना खास सरप्राईज मिळणार आहे. वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून चर्चेत राहिलेली राखी सावंत ग्रँड फिनालेमध्ये दमदार डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. राखीने शोदरम्यान आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि वादग्रस्त वागण्यामुळे चांगलीच रंगत आणली होती. आता ती किकमधील ‘यार ना मिले’ या गाण्यावर थिरकताना दिसणार असून तिच्या परफॉर्मन्समुळे फिनालेची रंगत आणखी वाढणार आहे.

  • 19 Apr 2026 06:31 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी 6’चा महाअंतिम सोहळ्याला बॉलिवूडचे 2 मोठे कलाकर लावणार हजेरी

    बिग बॉस मराठी 6’चा बहुप्रतीक्षित महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. यावेळी शोचा होस्ट रितेश देशमुख विजेत्याची घोषणा करणार आहे. विशेष म्हणजे या ग्रँड फिनालेमध्ये अभिषेक बच्चन आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही रितेशसोबत मंचावर झळकणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे अंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार असून प्रेक्षकांना खास मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

  • 19 Apr 2026 06:16 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : राकेश बापट एलिमिनेट होणार? फिनालेपूर्वी मोठी अपडेट समोर

    बिग बॉस मराठी सीझन 6 चा फिनाले काही तासांमध्ये सुरु होणार आहे. अशातच आता बिग बॉसमधून मोठी माहिती समोर आली आहे. फिनालेला काही तास शिल्लक असतानाच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख छोटी बॅग घेऊन दिसत आहे. यामध्ये 5 स्पर्धकांना ऑफर देण्यात येते. जो स्पर्धक बजर दाबेल आणि एलिमिनेट करेल त्याला 5 लाख रुपये देण्यात येतील. हे ऐकून उभे राहिलेल्या पाच स्पर्धकांमधून राकेश बापट पुढे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तो एलिमिनेट होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

  • 19 Apr 2026 05:57 PM (IST)

    Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : हा स्पर्धक होणार बिग बॉस मराठी सीजन 6 चा विजेता? काही तास शिल्लक असतानाच समोर आली मोठ अपडेट

    बिग बॉस मराठी सीजन 6 चा विजेता कोण ठरणार हे आज रात्री 8 वाजता ठरणार आहे. अशातच आता अभिनेता विशाल कोटियन हा बिग बॉस मराठी सीजन 6 चा विजेता होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर विशालला विजेता घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे विशाल सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

  • 19 Apr 2026 05:25 PM (IST)

    बिग बॉस मराठी सीजन 6 मध्ये सर्वात मोठं भाडणं कोणामध्ये झालं?

    बिग बॉस मराठी सीजन 6 मध्ये अनेक स्पर्धकांमध्ये भाडणं झाली पण सर्वात मोठं भाडणं हे राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात झालं होतं.

  • 19 Apr 2026 05:09 PM (IST)

    बिग बॉस मराठी सीजन 6 चा फिनाले कुठे पाहता येणार?

    गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणारा लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आज संपणार आहे. आज या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. हा फिनाले तुम्ही कलर्स मराठीवर रात्री 8 वाजल्यापासून पाहू शकता किंवा जिओ हॉटस्टारवर देखील हा फिनाले पाहू शकता.

  • 19 Apr 2026 04:42 PM (IST)

    काही तासांमध्ये ठरणार बिग बॉस मराठी सीजन 6 चा विजेता

    ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिजनच्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:00 वाजल्यापासून कलर्स मराठी वाहिनीवर हा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे.

अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस मराठी सीजन 6’ हा शो 11 जानेवारी रोजी सुरू झाला आणि तीन महिन्यांहून अधिक काळ चालला. अशातच आज या सीजन 6 चा विजेता कोण होणार? हे काही तासांमध्ये कळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीजनमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यामध्ये सर्वात चर्चेत राहिली ती म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत. तिने प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. तर या सीजनमध्ये राकेश बापटने देखील धडाकेबाज गेम खेळत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  या सीजनमध्ये शेवटचे पाच स्पर्धक राहिले असून यामधील बिग बॉस सीजन 6 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉस फिनाले संदर्भातील प्रत्येक घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर

Published On - Apr 19,2026 4:39 PM

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.