Dharmendra Death News LIVE : अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वांमध्ये विलीन, बॉलिवूड स्टार्संनी साश्रू नयनांनी दिला निरोप
Dharmendra Death News LIVE Updates Funeral : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाची त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण त्यांचं संपूर्ण कुटुंब विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पोहोचलं आहे. तसेच बॉलिवडूचे अनेक कलाकारही स्मशानभूमीत दाखल झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खान हे सुद्धा धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत आले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण : स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल 10 दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार
कल्याण पूर्व–पश्चिम रूटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्वाचा स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल 10 दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी हा पूल बंद असेल. पुलावर असलेले मोठ मोठे खड्डे दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
अहिल्यानगर : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसला धक्का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसला धक्का बसला आहे. कोपरगाव शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी आपल्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. पोटे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
-
बुलढाणा : पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली
बुलढाण्यात पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली असल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या जलंब जंक्शन वरून खामगाव कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या बाजूला एक जीर्ण पाण्याची टाकी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे रुळावर कोसळल्याने रेल्वेच्या विद्युत तारांसह रेल्वे मार्गाचे नुकसान झालं आहे. यामुळे खामगाव जलंब रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे.
-
धाराशिव बस डेपोत 3 तासांपासून डिझेल नसल्याने एसटी सेवा बंद
धाराशिव बस डेपोमध्ये गेल्या 3 तासांपासून डिझेल नसल्याने एसटी बस सेवा बंद आहे. त्यामुळे गेल्या 3 तासांपासून शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बस डेपोत बसून आहेत. लांब पल्ल्याचे प्रवासी एसटी नसल्याने गेले तीन तासापासून ताटकळत आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 दिवसापूर्वी धाराशिव बस डेपोला भेट दिली होती.
-
राज ठाकरे यांना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षा चालकाकडून माफी
ठाण्यात रिक्षा चालकाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवीगाळ करण्यात आली होती. या रिक्षा चालकाने आता राज ठाकरे यांची जाहीर माफी मागितली आहे. रिक्षा चालकाने दारुच्या नशेत शिवीगाळ केली होती.
-
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक या पॅनेलमध्ये एकत्र आले आहेत.
प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई जिंकायची आहे, मी इथे आलो तेव्हा पाहील रस्ते नाही, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजना बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण कोणी माई का लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही. ही योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली, ही योजना बंद पडणार नाही.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट
अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सभा स्थळाकडे जाणाऱ्या शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे मोठे खड्डे बुजवण्यात आले आहेत. नगर – मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठा पुल देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिर्डी विमानतळ ते कोपरगाव असा वाहन प्रवास करणार आहेत.
-
रावसाहेब दानवे-बबनराव लोणीकर एकत्र आल्यानंतर बॅनरबाजी
रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र आल्यानंतर भोकरदन शहरात ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांची वज्रमूठ, भाजपासाठी ऐतिहासिक दिवस आता विजय दूर नाही अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच आगामी निवडणुकात भाजपाचे वर्चस्व अटळ, असा उल्लेखही बॅनरवर करण्यात आला आहे.
-
तू माझा हिरो होतास आणि नेहमीच राहशील: मनोज मुंतशीर
मनोज मुंतशीर यांनी धर्मेंद्र पाजींसोबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका गायन कार्यक्रमातील आहे. त्यांनी लिहिलं की, “आकाशाला चमकण्यासाठी एका मोठ्या ताऱ्याची आवश्यकता होती, कदाचित म्हणूनच देवाने तुम्हाला त्याच्या चरणी बोलावले असेल. हृदयात धडधडत राहा आणि आकाशात चमकत राहा, धरमजी. पुन्हा भेटू.”
-
दीपिका-रणवीर यांनी वाहिली ‘ही-मॅन’ला श्रद्धांजली
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंग यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. ते दोघेही विलेपार्ले सोडताना एकत्र दिसले.
-
राहुल गांधींनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली
राहुल गांधी यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते लिहितात, “दिग्गज अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. भारतीय कला जगताचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. जवळजवळ सात दशकांपासून चित्रपटसृष्टीत त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच आदर आणि प्रेमाने लक्षात ठेवले जाईल.”
-
धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वांमध्ये विलीन, बॉलिवूड स्टार्सनी साश्रू नयनांनी दिला निरोप
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वांमध्ये विलीन झाले आहेत. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून घरी उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी घरी अचानक गोंधळ उडाला आणि रुग्णवाहिका घेऊन विलेपार्ले येथे नेण्यात आली. दरम्यान, करण जोहर यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाची पुष्टी केली. त्यानंतर, बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकामागून एक स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना निरोप दिला.
-
रामदास आठवले यांनी धर्मेंद्र यांना वाहिली आदरांजली
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दु:ख व्यक्त केले आहे. धर्मेंद्र हे एक मोठे अभिनेते होते. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. केंद्र सरकारच्या वतिने मी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
-
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर फडणवीस यांनी व्यक्त केले दु:ख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.
Maharashtra CMO says – “Expressing grief over the passing of the brilliant star who illuminated the golden era of Indian cinema, Chief Minister Devendra Fadnavis has offered heartfelt tributes to veteran actor Padma Bhushan Dharmendra. From playing dreamy, youthful romantic… pic.twitter.com/XhvLOTnTer
— ANI (@ANI) November 24, 2025
-
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली
ज्येष्ठे अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक अभूतपूर्व अभिनेता होते, त्यांनी ज्या भूमिका केल्या, त्यामाध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
The passing of Dharmendra Ji marks the end of an era in Indian cinema. He was an iconic film personality, a phenomenal actor who brought charm and depth to every role he played. The manner in which he played diverse roles struck a chord with countless people. Dharmendra Ji was…
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2025
-
धर्मेंद्र यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा, अनिल कपूर अंत्यसंस्कारासाठी दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनिल कूपर दाखल
-
धर्मेंद्र यांची 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबच्या नसराली गावामध्ये झाला होता, या छोट्या गावात जन्म होऊ देखील त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, धर्मेंद्र यांनी तब्बल 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे, त्यांचे अनेक चित्रपट हे चांगलेच गाजले. त्यांनी काही काळ पंजाबी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
-
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी अभिनेता सलमान खान दाखल
-
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांचे कुटुंबिय विलेपार्ले स्मशानभूमीवर पोहोचले असल्याचं म्हटलं जात आहे.
-
नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात भीषण आग लागल्याची घटना
नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोडाऊनमधील डेकोरेशनचं साहित्य जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
-
पिंपळनेरमध्ये नागरिकांनी एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला
पिंपळनेरमध्ये एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला. डोंगराळेतील चिमुकलीच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. चिमुकलीचा बॅनर हातात धरत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडवला.
-
पवार काका-पुतणे एकवटल्यानंतर आता काँग्रेसकडून हात पुढे
लोणावळ्यात पवार काका-पुतणे एकवटल्यानंतर आता काँग्रेसने ही हात पुढं केलाय. भाजप विरोधात आघाडीने या नव्या ‘लोणावळा पॅटर्न’चं समीकरण बनवलंय. लोणावळाकरांना एक पर्याय देणं गरजेचं होतं, म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गवळीवाडा येथील काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आपले उमेदवार रिंगणात उतरवले नाहीत. काँग्रेसचा विचार टिकवण्यासाठी नगरपरिषदेत आपले ही उमेदवार असणं गरजेचं आहे.
-
खासदार अशोक चव्हाण यांचं प्रताप पाटील चिखलीकरांना आव्हान
लोह्याचा नवीन पॅटर्न राज्यामध्ये जातोय बाप एका पक्षात,पोरगी दुसऱ्या पक्षात. खासदार अशोक चव्हाण यांची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर टीका. प्रताप चिखलीकर दादाच्या राष्ट्रवादीतून आमदार तर त्याची कन्या प्रणिता देवरे चिखलीकर भाजपाच्या पदाधिकारी. पाच पक्षात पाच माणसे असतील तर हे राजकारण आम्ही जिल्ह्यात अजिबात चालू देणार नाही. हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा,खासदार अशोक चव्हाण यांचा प्रताप पाटील चिखलीकर यांना थेट आव्हान
-
राजकारण्याचे पीए देखील दादागिरी करतायत का? – अंजली दमानिया
गर्जे कुटुंबाची कुठलीही व्यक्ती हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनला का हजर नव्हती? राजकारण्यांचे पीए देखील दादागिरी करायला लागलेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला.
-
पंकजा मुंडे तुम्ही अत्यंविधीला का उपस्थित नव्हत्या? अंजली दमानिया
“मला पंकजा मुंडेंकडून अपेक्षा होती की, तुम्ही त्या पालवे कुटुंबाला का मदत केली नाही? का पोलीस स्टेशनमध्ये गेला नाहीत? ती केवळ आत्महत्या असती तर हे सर्व झालं नसतं. तुम्ही अत्यंविधीला उपस्थित राहणं गरजेच होतं? किळसवाणं राजकारण झालं आहे” अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
-
‘कमळाबाईच्या सत्तेची गादी म्हणजे सदोष मतदार यादी’… – अखिल चित्रे यांचं ट्विट
‘कमळाबाईच्या सत्तेची गादी म्हणजे सदोष मतदार यादी’… असं ट्विट अखिल चित्रे यांनी केलं आहे.
वाचा संपूर्ण ट्विट –
‘कमळाबाईच्या सत्तेची गादी म्हणजे सदोष मतदार यादी’… ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्ष म्हणून नेत्यांपासून ते गटप्रमुखांपर्यंत सर्वजण मतदारयादीवर अत्यंत बारकाईने काम करतो आहोत, पण अशा गमतीशीर गोष्टी समोर येत आहेत कि थक्क व्हायला होतंय.
बरं हा निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा… pic.twitter.com/gwpGogh7fH
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 24, 2025
-
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेच्या घरी फॉरेन्सिक पथक दाखल
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेच्या घरी फॉरेन्सिक पथक व डॉक्टरही दाखल झाले आहेत. शनिवारी याच घरात अनंत याची पत्नी गौरी हिने गळफास घेतला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी काल रात्री अनंत गर्जेला अटक केली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भुसावळमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. त्यांच्या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. भुसावळ येथील भाजपचे मंत्री संजय सावकारे यांनी तयारीचा आढावा घेतला तसेच पाहणीही केली.
-
कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन
कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. विमानतळाशेजारून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी आहे. पर्यायी व्यवस्था न करता गेल्या वर्षभरापासून हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
-
डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार
मोहोज देवढे ,अहिल्यानगर – डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच अंत्यसंस्कार पार पडले . पोलिसांच्या मध्यस्थीने तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अनंत गर्जे यांना अटक करावी अशी माहेरकडच्या लोकांची मागणी होती . पोलिसांकडून अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती दिल्यानंतर डॉ.गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट
कोपरगाव / अहिल्यानगर – कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अर्जावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप आहे. 29 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा विवाद न्यायालयात पोहोचला आहे. भाजप-आरपीआय मित्रपक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी (अजीत पवार गट) उमेदवारांवर आरोप करण्यात आला असून दोन्ही बाजुचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने आज सुनावणीची शक्यता आहे. सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.
-
पिंपळनेर नगर परिषदेसाठी शिंदे-फडणवीस विरुद्ध काँग्रेस थेट लढत
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप विरुद्ध शिंदे सेना आणि काँग्रेस यांच्यात होत आहे. शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी या लढतीबाबत आशावाद व्यक्त केला असून, विकासाच्या कामांवर ही निवडणूक जिंकण्याचा तसेच नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार निवडून आणण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये मोठी कारवाई
नाशिक शहर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी कारवाई केली आहे. ‘कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा’ या मोहिमेअंतर्गत सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये भूषन लोंढे टोळीसह काही प्रमुख राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भाजप उमेदवार कैलास चोथे आणि त्यांचे पती शांताराम बागुल यांच्यासह, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पती सोनू खाटीक यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपींवर कारवाई करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.
-
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात कार डिव्हायडरला धडकून पलटी, प्रवासी सुखरूप
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात झाला आहे. एक कार सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. सुदैवाने या अपघातात गाडीमध्ये असलेले दोन्ही प्रवासी सुखरूप बचावले आहेत. त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. अपघातग्रस्त गाडीला क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आले आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धुळे दौऱ्यावर, नगरपालिका निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा पार पडणार आहे. पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पहिली प्रचारसभा आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
डॉ.गौरी पालवे यांच पार्थिवावर आज अत्यसंस्कार, मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण
अहिल्यानगर : डॉ.गौरी पालवे यांच पार्थिव मोहोज देवढे गावात दाखल झाले आहे. पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर गौरीचे अंत्यसंस्कार करावे, अशी मागणी माहेरच्या मंडळींनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
न्यायमूर्ती सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ
देशाचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. पुढचे १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे असणार आहे.
-
डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
अॅडव्हान्सच्या नावाखाली सराफाला घरी बोलावून दोरीने बांधत बेदम मारहाण करत लूट. विशेष म्हणजे आरडा ओरडा बाहेर इतराना ऐकू येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवून सफाराचे ३ तोळ्यांची चैन ५० रोकड लुटली. मानपाडा पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
-
परभणीच्या जिंतूर येथे अजित पवार यांची प्रचार सभा
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार साबिया फारूखी यांच्या प्रचारार्थ अजित पवार घेणार सभा. दादा शरीफ चौक येथे सभेचे आयोजन. जिंतूर नगरपालिकेत राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होणार आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विरुद्ध माजी आमदार विजय भांबळे असा सामना जिंतूर मध्ये असणार,
-
जरांगे पाटलांचे समर्थक अतुल घरत मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट
बीडच्या दासखेड फाटा परिसरात अहमदपूर-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री पोलीस कर्मचारी लहू वसुदेव आंधळे यांच्या चार चाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये जरांगे पाटलांचे समर्थक अतुल घरत यांचा मृत्यू झाला.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज त्र्यंबकेश्वर मध्ये सभा
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलीय सभा. सभेच्या आधी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असलेल्या दोन उमेदवारांवर गुन्हा दाखल. त्र्यंबकेश्वर मध्ये भाजपचे उमेदवार असलेले कैलास चौथे आणि शांताराम बागुल यांच्यावर सातपूर पोलिस ठाण्यात झाला खंडणीचा गुन्हा दाखल
-
वाहतूक पोलिसाला रिक्षाने फरफटत नेले
छत्रपती संभाजीनगर मधील महावीर चौकात वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या अंमलदारावर रिक्षा चढवली. त्या धडकेत अंमलदार खाली कोसळले. त्यानंतर चालक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुन्हा अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिस रिक्षाच्या खालील बाजूला अडकले. त्यामुळे जवळपास 20 फुटांपर्यंत त्यांना फरफटत नेले. तुकाराम टाकसाळे असे जखमी झालेल्या वाहतूक पोलिस अंमलदारांचे नाव आहे.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळालं आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नोव्हेंबरचा हप्ता उशिरा जमा झाला, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
-
गेट वे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल बांधणार
गेट वे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेटवे ऑफ इंडियावरील वाहतूक कोंडी कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. इथल्या सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी इथे नवीन जेट्टी बांधण्याचा कामाला मंजुरी दिली आहे.
या जेट्टीमुळे मुंबई आणि परिसरातील जलवाहतूक सुधारण्यास मदत होईल. विशेष म्हणजे मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीने (MHCC) या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात आली आहे आणि हे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये घेणार सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सभा घेणार आहेत. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून त्रंबकेश्वर नगरपरिषद भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्र्यंबकेश्वरची निवडणूक गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्र्यंबकेश्वरमधून आज भाजप नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहे.
-
पंकजा मुंडे यांचे पीए अनंज गर्जे यांना अटक
पंकजा मुंडे यांचे पीए अनंज गर्जे यांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. गौरीच्या आईवडिलांनी अनंज गर्जेंविरोधात एफआयआर दाखल केली होती.
-
डॉ. गौरी गर्जेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी गर्जेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होणार आहेत. काल संध्याकाळी गौरीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
-
नाशिक – शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंना विदर्भातील जबाबदारी
नाशिक – शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंना विदर्भातील जबाबदारी देण्यात आली आहे. यवतमाळसाठी संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नाशिकपासून दुर नियुक्ती केल्याने गोडसे यांना नाशिकमधून दूर ठेवल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हेमंत गोडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. राम रेपाळे यांच्याकडे नाशिकची संपर्कप्रमुख पदाची नियुक्ती कायम आहे.
-
पुण्यातील औंधमधील सिंध कॉलनीत दिसला बिबट्या
पुण्यातील औंधमधील सिंध कॉलनीत बिबट्या दिसला. वनविभागाचं रात्रभर सिंध सोसायटी, पुणे विद्यापीठ, वेताळ टेकडी भागात सर्च ऑपरेशन सुरू होतं. सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला होता मात्र बिबट्या अद्याप सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सर्च ऑपरेशन थांबवला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Published On - Nov 24,2025 8:25 AM
