PHOTO | ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी पतीसह नव्या माध्यमात झळकणार? पाहा सपनाचा जबरदस्त ‘कमबॅक’ प्लॅन

उत्कृष्ट नृत्यांगना आणि आपल्या गाण्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारी सपना चौधरी (Sapna choudhary) आता यूट्यूबवर तिच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या वाहिनीवर सपना चौधरीने 3 गाणी रिलीज केली आहेत.

1/7
उत्कृष्ट नृत्यांगना आणि आपल्या गाण्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारी सपना चौधरी (Sapna choudhary) आता यूट्यूबवर तिच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या वाहिनीवर सपना चौधरीने 3 गाणी रिलीज केली आहेत. तिन्ही गाण्यांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. सपना चौधरीचे 'लक्ष्मीचंद की टेक' हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.
2/7
आपल्या पुढच्या योजनेविषयी सांगताना सपना चौधरी म्हणते, ‘आम्ही आमच्या यूट्यूब चॅनल ड्रीम्स एन्टरटेन्मेंटला या वर्षाच्या सुरूवातीस सुरुवात केली आणि आतापर्यंत या चॅनेलवर 3 गाणी रिलीज केली आहेत. मला सांगायला मला आनंद होतो की, आमच्या तिन्ही गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. म्हणूनच, मी आणि माझे पती यांनी ठरवले आहे की, आता आम्ही लवकरच आमच्या चॅनेलवर हरयाणवी वेब सीरीज देखील आणू.’
3/7
सपना चौधरी पुढे म्हणाली की, मला फावला वेळ असताना चित्रपट आणि वेब सीरीज बघायला आवडतात. म्हणून मी आणि माझे पती लवकरच माझ्या हरियाणाच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या YouTube चॅनेलवर हरियाणवी वेब सीरीज घेऊन येणार आहोत. हिंदी, पंजाबी आणि मराठी मनोरंजन विश्वाचे नाव जसे देश व जगात गाजत आहे, त्याचप्रकारे आपल्या हरियाणाचे नाव देखील गाजवायचे आहे.
4/7
सपना म्हणते, मला शक्य तितका हरयाणवी बोलीचा प्रचार करायचा आहे. मी हे देखील सांगेन की, कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला आणि आम्हाला काम करण्याची करण्याची संधी मिळाली की, लगेचच आम्ही आपली वेब सीरीज प्रदर्शित करू. मी देखील या वेब सीरीजमध्ये काम करणार आहे.
5/7
सपना चौधरी यांनी सांगितले की, लोक मला नेहमी विचारतात की, आम्ही तुला तुझ्या पतीबरोबर स्क्रीन शेअर करताना कधी पाहू शकू. तर या माध्यमातून मला सांगायचे आहे की, आम्ही दोघेही या क्षणी एकमेकांसोबत काम करणार नाही. ते त्यांचे काम करतात आणि मी माझे काम करते. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही.
6/7
बिग बॉस 11ची स्पर्धक असलेली सपना चौधरी म्हणाली की, बिग बॉसच्या घरात माझे चांगले संबंध असलेल्या सर्व लोकांशी मैत्री अजूनही अबाधित आहे. बिग बॉसमध्ये माझ्याशी भांडण करणार्‍या लोकांच्या संपर्कात मी नाही.
7/7
सपना म्हणाली, ‘मी हिना खानच्या संपर्कातही आहे आणि तिच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते तेव्हा मी तिच्याशी बोललो होते. मी सोशल मीडियावर मैत्री दाखवत नाही, पण मनापासून मैत्री करते.’