Cricketer Yashpal Sharma | माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन

| Updated on: Jul 13, 2021 | 12:29 PM

भारताचे माजी दिग्गज फलंदाज यशपाल शर्मा यांनी भारताकडून 37 टेस्ट आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी अनेक अवघड सामने भारताला जिंकवून दिले.

Follow us on

भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असणारा 1983 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (13 जुलै) सकाळच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये 2 शतकांच्या मदतीने 1606 रन्स बनवले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 89 रन्स आहेत. पण 1983 च्या विश्वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता.