Accident | Hingoliच्या लिंगदरी शिवारात अपघात, पिकअप चालक फरार

| Updated on: Feb 10, 2022 | 2:21 PM

हिंगोली-सेनगाव मार्गावर लिंगदरी शिवारात जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात (Accident) झाला आहे. यात एका जनावराचा मृत्यू झाला तर इतर काही जनावरे खाली दबले. चोरीची ही जनावरे आहेत की आणखी काय, याचा तपास (Investigation) आता सुरू झाला आहे.

Follow us on
हिंगोली-सेनगाव मार्गावर लिंगदरी शिवारात जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात (Accident) झाला आहे. यात एका जनावराचा मृत्यू झाला तर इतर काही जनावरे खाली दबले. ग्रामस्थांनी पिकअपखाली दबलेल्या जनावरांना बाहेर काढून या जनावरांचे प्राण वाचवले. या दुर्घटनेनंतर पिकअप चालक फरार झाला असून ही जनावरे चोरीची असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. व्हिडिओ(Video)मध्ये आपल्याला या अपघाताची दृश्ये दिसून येतील. बेदरकारपणे हा चालक वाहन चालवत असल्याचाही अंदाज आहे. चोरीची ही जनावरे आहेत की आणखी काय, याचा तपास (Investigation) आता सुरू झाला आहे. अपघात घडला त्याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस या फरार झालेल्या पिकअप चालकाचा शोध घेत आहेत. तर दबलेल्या जनावरांना स्थानिकांनी बाहेर काढले.