Beed | मराठवाड्याच्या विकासाची चाकं, 75 वर्षांची स्वप्नपूर्ती, बीडकर आनंदात, पहा Video.. आष्टी-नगर रेल्वेचा उद्घाटन सोहळा

| Updated on: Sep 23, 2022 | 1:05 PM

मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लवकरच बीड ते मुंबई असा टप्पा रेल्वेने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Follow us on

बीडः बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगर (Ashti- Ahmednagar) या बहुप्रतीक्षित रेल्वेला आज हिरवा कंदिल दाखवण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आदी दिग्गज मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन पद्धतीने या सोहळ्याला हजेरी लावली. गेल्या ३५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. पण स्वातंत्र्यापासूनच बीडकरांनी आपल्या भागातून रेल्वे कधी धावेल, याचं स्वप्न पाहिलं होतं. आज अखेर ते पूर्ण झालं. ही रेल्वे धावण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यांनाच याचं श्रेय जातं, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांनी ही रेल्वे धावण्यासाठी खूप कष्ट घेतले असतील तरीही त्यांचं नाव या रेल्वेला देण्याची मागणी मी करणार नाही, कारण त्यांना ते आवडणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लवकरच बीड ते मुंबई असा टप्पा रेल्वेने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.