Lok Sabha Election 2024 Date Announcement LIVE : महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

| Updated on: Mar 17, 2024 | 7:15 AM

Lok Sabha Election 2024 Voting and Result Date Announcement Live Updates : आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली. महाराष्ट्रात 20 मे रोजी मतदान होणार असून

Lok Sabha Election 2024 Date Announcement LIVE : महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

मुंबई | 16 मार्च 2024 : यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे… महाराष्ट्रात आधी लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुका देशात होऊ घातल्या आहेत. अशात ज्या निवडणुकीकडे देशासह जगाचं लक्ष लागलं आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. 17 व्या लोकसभेचा कार्यकाल 16 जूनला संपणार आहे. त्याआधी 18 व्या लोकसभेचं गठण होणं आवश्यक आहे. त्यामुळे आज या निवडणुकांची घोषणा होणार आहे. सहा ते सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या शिवाय काही राज्याच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा आजच केली जाऊ शकते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Mar 2024 06:55 PM (IST)

    काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची निवडणुकांच्या तारखांवर व्यक्त केलं असं मत

    लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, ” निवडणूक आयोगाची इच्छा असेल तर ते 10 टप्प्यांत निवडणुका घेऊ शकतात, याआधीच्या निवडणुकाही 7 टप्प्यात झाल्या होत्या, यावरून असे दिसून येते की, काहीच बदलले नाही. आम्ही अजूनही 7 टप्प्यांच्या प्रक्रियेत अडकलो आहोत. आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो पण 7 टप्प्यांच्या प्रक्रियेवरच अडकलो आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असत्या तर बरे झाले असते. बरे झाले आहे, आम्ही सप्टेंबरपर्यंत का वाट पाहत आहोत?”

  • 16 Mar 2024 06:47 PM (IST)

    लोकसभा निवडणुकांच्या तारखांवर ठाकरे गटाकडून आली अशी प्रतिक्रिया

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांच्या घोषणेवर, शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, निवडणूक आयोगाने थोडा विचार करून निवडणुकांचा एवढा मोठा कालावधी ठेवला असेल. निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील अशी आशा आहे. जर निवडणूक आयोगाने कारवाई केली तर सर्व पक्षांना समानता द्यावी.”

  • 16 Mar 2024 06:35 PM (IST)

    निवडणूक जाहीर होताच समाजवादी पार्टीकडून उमेदवार जाहीर

    लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने पाचवी यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टी नेता धर्मेंद्र यादव आझमगढमधून निवडणूक लढवणार आहेत.

  • 16 Mar 2024 06:20 PM (IST)

    राजकीय पक्षांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळाव्यात- निवडणूक आयोग

    मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळाव्यात. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान द्वेषपूर्ण भाषणे देऊ नयेत. स्टार प्रचारकांच्या हाती नियमावली सोपवा.

  • 16 Mar 2024 06:17 PM (IST)

    महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान

    • टप्पा 1: 19 एप्रिल
    • टप्पा 2: 26 एप्रिल
    • टप्पा 3: 07 मे
    • टप्पा 4: 13 मे
    • टप्पा 5: 20 मे
  • 16 Mar 2024 06:11 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले..

    लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या वेळापत्रकाच्या घोषणेवर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गोव्यात 7 मे रोजी निवडणुका होणार आहेत. मी निवडणूक आचारसंहितेचे स्वागत करतो. त्यांनी सर्व माहिती दिली आहे.गोवा सरकार निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे."

  • 16 Mar 2024 05:55 PM (IST)

    देशातील मतदारांचा EVM वर विश्वास नाही- संजय राऊत

    देशातील मतदारांचा EVM वर विश्वास नाही. तरीपण आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे निवडणुक आयोग इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुल्यासारखं वागणार आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला.

  • 16 Mar 2024 05:40 PM (IST)

    देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही- संजय राऊत

    निवडणूक आयोगाचं दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. देशात पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही- खासदार संजय राऊत

  • 16 Mar 2024 05:30 PM (IST)

    मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक- शिवानी वडेट्टीवार

    मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आम्ही आमचे उमेदवार ठरवले नाही मग सर्वे कसं काय ठरू शकतात असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

  • 16 Mar 2024 05:15 PM (IST)

    नागपूर च्या काही भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

    वादळी वाऱ्या सह पावसाने हजेरी लावली, काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी झाड पडली. जोरात असलेल्या हवेच्या धुळं उडाल्याने रस्त्यावरील नागरिक हैराण झाले. नागपूरच्या ग्रामीण भागात काटोल परिसरात सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी.

  • 16 Mar 2024 05:06 PM (IST)

    पश्चिम महाराष्ट्रात कुठे होणार कधी लढत?

    नवी दिल्ली : 7 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सांगली, सातारा, मावळ, पुणे, शिरूर, माढा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.

  • 16 Mar 2024 04:58 PM (IST)

    विदर्भात कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

    नवी दिल्ली : 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघासाठी मतदान होणार आहे. तर, 26 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम या मतदारसंघात मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

  • 16 Mar 2024 04:52 PM (IST)

    कोकण विभागात होणार तीन टप्प्यात मतदान

    नवी दिल्ली : रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर, 13 मे मावळ आणि पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

  • 16 Mar 2024 04:44 PM (IST)

    उत्तर महाराष्ट्रात 13 मे आणि 20 मे अशा दोन टप्प्यात मतदान

    नवी दिल्ली : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी या लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर दिंडोरी, नाशिक आणि धुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

  • 16 Mar 2024 04:39 PM (IST)

    मुंबईतील सहा मतदारसंघात 20 मे रोजी होणार मतदान

    नवी दिल्ली : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या सहा मतदारसंघामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ, मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई उत्तरमध्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे.

  • 16 Mar 2024 04:26 PM (IST)

    महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान, कोणत्या जिल्ह्यात कधी मतदान

    नवी दिल्ली : 19 आणि 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे.

    महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

    पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

    दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

    तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

    चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

    पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

  • 16 Mar 2024 04:11 PM (IST)

    एव्हिएमवर संशय घेऊ नका - राजीव कुमार

    नवी दिल्ली : एव्हिएम मशीनवर काही जण संशय व्यक्त करतात. पण, एव्हिएम मशीनची चाचणी तीन वेळा केली जाते. त्यावेळी उमेदवारही समोर असतात. मात्र, सोशल मिडीयावर आता अनेक संधोधक तयार झाले आहेत. एव्हिएम मशीन पूर्ण सुरक्षित आहेत असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

  • 16 Mar 2024 04:05 PM (IST)

    विदर्भात दुसऱ्या टप्प्यात मतदान

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 सात टप्प्यात होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रातील विदर्भात दुसऱ्या टप्प्यात तर कोल्हापूर, सांगली आणि कोकणमध्ये तिसर्या टप्प्यात मतदान होणार आहे.

  • 16 Mar 2024 04:00 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

    लोकसभेसाठी महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

  • 16 Mar 2024 03:59 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार

    पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार , तर 25 मे ला होणार सहाव्या टप्प्यातील मतदान होणार. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

  • 16 Mar 2024 03:57 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार

    तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार असून चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे.

  • 16 Mar 2024 03:56 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार

    पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला होणार आहे.

  • 16 Mar 2024 03:55 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : 4 जूनला निवडणुकीची मतमोजणी होणार - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार.

  • 16 Mar 2024 03:53 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : लोकसभेच्या निवडणुका 7 टप्यात होणार, 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान - राजीव कुमार

    लोकसभेच्या निवडणुका 7 टप्यात होणार. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार.

  • 16 Mar 2024 03:51 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : 4 राज्यात होणार विधानसभेच्या निवडणुका

    सिक्कीम, ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेशमध्ये विधनासभा निवडणूक होणार.

    आंध्र प्रदेश - 13 मे 2024, अरूणाचल प्रदेश - 19 एप्रिल 2024, सिक्कीम - 19 एप्रिल 2024

  • 16 Mar 2024 03:48 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : महाराष्ट्रासह 26 जागांवर पोटनिवडणुका

    महाराष्ट्रासह 26 जागांवर पोटनिवडणुका होणार.

  • 16 Mar 2024 03:41 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : द्वेष निर्माण होतील अशी वक्तव्यं प्रचारात करू नका

    द्वेष निर्माण होतील अशी वक्तव्यं प्रचारात करू नका. प्रचारात कुणावर वैयक्तिक टीका करू नका. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना नियमांची माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.

  • 16 Mar 2024 03:31 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : 2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - राजीव कुमार

    निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.  निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 16 Mar 2024 03:30 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : हिंसामुक्त निवडणुका राबवणं ही आमची जबाबदारी - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार . मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं.

  • 16 Mar 2024 03:28 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही - राजीव कुमार

    निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मतदाराला तक्रार असल्यास सी-व्हिजील ॲपवर नोंदवता येईल.

  • 16 Mar 2024 03:25 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : मतदानाबाबतची कोणतीही माहिती वेबसाईटवर मिळेल - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 16 Mar 2024 03:24 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : यंदा महिला मतदारांची संख्या वाढली

    यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद झाली आहे. देशात 82 लाख मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 16 Mar 2024 03:23 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात येणार. 85 वर्षांवरील व्यक्तींसाठी घरी जाऊन मतदान करून घेणार. पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठीही घरोघरी मतदानाची सोय करण्यात येईल.

  • 16 Mar 2024 03:19 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय असणार - राजीव कुमार

    प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय असेल. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छताची सोयही असेल.

  • 16 Mar 2024 03:15 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : देशात 97.8 कोटी मतदार - राजीव कुमार

    आपल्या देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

  • 16 Mar 2024 03:07 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : 16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार - राजीव कुमार

    ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे.  16 जूनला 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील. - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

  • 16 Mar 2024 03:06 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार - राजीव कुमार

    लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.

    चुनाव का पर्व, देश का गर्व

  • 16 Mar 2024 03:03 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 LIVE : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, तारखांची होणार घोषणा

    निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकांच्या तारखांची होणार घोषणा

  • 16 Mar 2024 02:40 PM (IST)

    महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील - फडणवीस

    महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. जागा वाटपावर आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस

  • 16 Mar 2024 02:35 PM (IST)

    आता दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल असा आमचा विश्वास - मुख्यमंत्री शिंदे

    सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. आता दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल असा आमचा विश्वास आहे. - मुख्यमंत्री शिंदे

  • 16 Mar 2024 02:30 PM (IST)

    मराठा समजाला टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका - मुख्यमंत्री

    विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका - मुख्ममंत्री एकनाथ शिंदे

  • 16 Mar 2024 02:25 PM (IST)

    सोयाबीन आणि कापसासाठी ४ हजार कोटींची तरतूद - मुख्यमंत्री शिंदे

    सोयाबीन आणि कापसासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आता आर्थिक विकास महामंडळ - मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

  • 16 Mar 2024 02:24 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून सरकार काम करतंय. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 16 Mar 2024 01:00 PM (IST)

    राजू शेट्टी हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

    मातोश्रीवर भेटीपुर्वी राजू शेट्टी हे संजय राऊत यांची मुंबईत घेणार भेट.हातकणंगले मतदार संघातून निवडणुक लढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहीती…

  • 16 Mar 2024 12:31 PM (IST)

    19 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी

    निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका. पक्षचिन्ह आणि नावाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिका. याचिकेवर 19 मार्चला होणार सुनावणी

  • 16 Mar 2024 12:16 PM (IST)

    संजय मंडलिक यांचे मोठे विधान

    माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला. मला अस्वस्थ आहात का विचारले, असे संजय मंडलिक यांनी म्हटले.

  • 16 Mar 2024 12:01 PM (IST)

    वाहन तोडफोड आणि जाळपोळ केल्यास अल्पवयीन आरोपींच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार

    पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या बैठकीत निर्णय. मागील काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

  • 16 Mar 2024 11:52 AM (IST)

    नंदुरबार लोकसभेच्या राजकीय हालचालींना वेग

    नंदुरबार- नंदुरबार लोकसभेच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख यांच्यात गुपित भेट झाली. आमदार के. सी. पाडवी यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयाला जाऊन भेट घेतली. शिंदे गटाच्या भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांना विरोध असल्याने काँग्रेस आणि शिंदे गटाच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

  • 16 Mar 2024 11:45 AM (IST)

    माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल- संजय मंडलिक

    कोल्हापूर- "माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला होता. मी अस्वस्थ आहे का असं त्यांनी मला विचारलं. उमेदवारी जाहीर होईल असंही त्यांनी मला सांगितलं आहे," अशी प्रतिक्रिया संजय मंडलिक यांनी दिली आहे.

  • 16 Mar 2024 11:30 AM (IST)

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.

  • 16 Mar 2024 11:17 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा आणि निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. येत्या 19 मार्चला दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे सहभागी होणार आहेत.

  • 16 Mar 2024 11:00 AM (IST)

    थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

    थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी ठाण्यातील निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने सकाळीच रवाना झाले. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.

  • 16 Mar 2024 10:53 AM (IST)

    दक्षिण मुंबईत शिवसेनेचा उमेदवार द्या

    दक्षिण मुंबईत शिवसेनेचा उमेदवार द्या अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी सह्यांचं पत्र पठवले आहे. दक्षिण मुंबईत भाजपच्या राहुल नार्वेकरांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. दक्षिण मुंबईतल्या दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी सह्या करून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. ठाणे, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु आहे.

  • 16 Mar 2024 10:42 AM (IST)

    मी संन्यास घेणार नाही

    महायुतीतील प्रत्येक पक्षाला वाटत आहे तिकीट मिळावं आणि ते योग्य आहे मात्र मी संन्यास घेणार नाही असं विधान खासदार उदयनराजे यांनी केलं आहे. भाजपच्या दोन याद्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव वगळले गेले आहे

  • 16 Mar 2024 10:30 AM (IST)

    सोने आणि चांदीत दरवाढ

    या आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीत पुन्हा दरवाढ झाली. सोने महागले तर चांदी पण वधारली. त्यामुळे ग्राहकांना सराफा बाजारात अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.

  • 16 Mar 2024 10:22 AM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना दिलासा

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला.

  • 16 Mar 2024 10:10 AM (IST)

    अधिकारी, संस्था भाजपचे हप्ता वसूली एजंट

    ईडी, इतर संस्था, अधिकारी हे भाजपचे हप्ता वसूली एजंट असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. विरोधकांवर भाजप सरकार दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 16 Mar 2024 10:00 AM (IST)

    अंबादास दानवे नाराज

    शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस पण चव्हाट्यावर आली आहे. अंबादास दानवे हे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर डावलत असल्याचा आरोप केला आहे.

  • 16 Mar 2024 09:32 AM (IST)

    Live Update | माढा लोकसभेवरून महादेव जानकर यांच्या घरातच संघर्ष पेटला

    माढा लोकसभेवरून महादेव जानकर यांच्या घरातच संघर्ष पेटला... पुतण्या स्वरुप जानकर हे माढा लोकसभेची निवडणूक लढवणार... ते सातत्याने सांगतात पुतण्या राजकारणात येणार नाही पण मी राजकारणात येणार आहे... जानकर साहेब कुटुंबाशी सुसंवाद करत नाहीत... त्यांनी परभणीतून लढावं किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढावं... मात्र ते माढा मधून निवडणूक लढवणार असतील तर माझी उमेदवारी अटळ आहे... स्वरूप जानकर यांनी घेतली भूमिका

  • 16 Mar 2024 09:01 AM (IST)

    शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

    महाविकास आघाडीचे नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक. जयंत पाटील सिल्व्हर ओके वर दाखल. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला व इतर नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत

  • 16 Mar 2024 08:45 AM (IST)

    मोदींच्या रोड शो ला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर परवानगी

    मोदींच्या रोड शो ला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर परवानगी. 18 मार्च रोजी कोइंबतोर येथे 4 किलोमीटर अंतराचा नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार होता. स्थानिक प्रशासनाने मोदींच्या रोड शो ला परवानगी द्यायला नकार दिला होता. भाजपने या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मोदींच्या रोड शो ला परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत

  • 16 Mar 2024 08:29 AM (IST)

    निवडणूक आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर

    लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर . महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा यादीत समावेश. निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या लोकांची यादी प्रसिद्ध. या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही.

  • 16 Mar 2024 08:28 AM (IST)

    राहुल गांधी यावेळी किती मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

    लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी गांधी घराण्याबाबतची मोठी बातमी. राहुल गांधी यावेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अमेठी मधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नाहीत. पुन्हा एकदा वाईनाड मधूनच राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.

  • 16 Mar 2024 07:58 AM (IST)

    निवडणुकीचे अपडेट्स कुठे पाहायला मिळतील?

    आज निवडणुकीची घोषणा होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील.

  • 16 Mar 2024 07:55 AM (IST)

    कोण घेणार पत्रकार परिषद?

    केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज दुपारी पत्रकार परिषद घेतील. आणखी दोन आयुक्तही यावेळी उपस्थित असतील. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे.

  • 16 Mar 2024 07:52 AM (IST)

    मतदान कधी?

    आज दुपारी निवडणुकीची घोषणा होणार आहे. सहा ते सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडू शकते. 18 ते 20 एप्रिल दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकतं.

  • 16 Mar 2024 07:47 AM (IST)

    चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचीहो घोषणा होणार

    आज निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेसह विधानसभा निवडणुकांचीही घोषणा होणार आहे. आंध्रप्रदेश, ओडिसा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या चार राज्यांच्या निवडणुकांचीही घोषणा आज होऊ शकते.

Published On - Mar 16,2024 7:45 AM

Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.