Maharashtra Assembly Session 2026 LIVE: आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच अधिवेशात उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करणार आहेत... या ब्लॉगमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गाजणार याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या...

LIVE NEWS & UPDATES
-
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक झाला आहे. याचे पडसाद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण लागू करावे, या मागणीसाठी धाराशिवमधून मातंग समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या आरक्षणासाठी आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा लहुजी शक्ती सेनेने दिला आहे.
-
बदलापुरात अंडाशयाच्या तस्करीप्रकरणी सखोल तपास सुरु, तब्बल 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त
बदलापुरात अंडाशयाच्या तस्करीनंतर आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या तीन पथकाने ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसेच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईत तब्बल 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर पोलिसांनी छापे टाकल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
-
मेळघाटातील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात, अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळून चार आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहे. मेळघाट मधील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा आरोप अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी केला आहे. होळी सणाच्या निमित्ताने बाजार करण्यासाठी गेले होते. यावेळी जखमी प्रवाशांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व धारणीमध्ये उपचार सुरु आहेत. धारणी तालुक्यातील बेलतलाईवरून कंजूली या आपल्या गावी प्रवासी जात होते. यावेळी पिकअप वाहनात 15- 20 जण असल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटामध्ये दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
-
दारुच्या नशेत विषारी सापाजवळ स्टंट करणं भोवलं, तरुणाचा मृत्यू
विरार पश्चिमेच्या नवापूर येथे एका तरुणाने दारुच्या नशेत विषारी सापाजवळ स्टंट करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साप पकडून गळयात घालून हा तरुण फिरत होता. विचित्र चाळे करत असताना सापाने त्याच्या हाताला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजू चंदू बरड (४०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, सव्वा कोटींचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगरमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेकडून सव्वा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जानेवारी २०२६ मध्ये सघन तिकीट तपासणी मोहीम राबवत २१ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या मोहिमेत एकूण १ कोटी २५ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. मोहिमेदरम्यान एका दिवसात ९०९ प्रकरणे नोंदवून सुमारे साडेपाच लाख रुपयांची वसुली करण्यात आली. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून करण्यात आले आहे.
-
-
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शन घेऊन परतताना महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (५८, रा. कर्नाटक) या महिला भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मोरम्मा या २७ जणांच्या समूहासोबत यात्रेसाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात दर्शन घेऊन पार्किंगकडे परतत असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना तात्काळ खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
भिगवण प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी बारामती, दौंड आणि इंदापूर बंदची हाक…
भिगवण प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणी करता सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे… या बंदला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय.. बारामती मधील मुख्य बाजारपेठ मधील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांचा देखील कडेकोढ बंदोबस्त देण्यात आलाय..
-
-
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘मिशन निपुण’
नाशिक जिल्हा परिषद साडेपाच हजार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणार. दुसरी ते पाचवीतील अध्ययनात मागे असलेल्या ५,६२५ विद्यार्थ्यांना पुढील ३० दिवसांत ‘निपुण’ करण्याचे लक्ष्य आहे. मार्च अखेरीस होणाऱ्या अंतिम चाचणीपूर्वी ही विशेष मोहीम ‘मिशन मोड’वर राबवली जाणार आहे. मिशन निपुण नाशिक’ मुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
-
गोंदियात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात…
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे होणार फायदा, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता शक्यता आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटे झालेल्या पावसामुळे ज्वारीचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीवर पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा,द्राक्ष,आंबा, गहू या रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे.
-
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्र घेणार असून त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करावे अशी मातंग समाजाची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय झाल्याने समाजात नाराजी असून अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. धाराशिव मधूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
-
रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान
परळी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जवारी पिकावर परिणाम झाला असून संपूर्ण पीक आडवे पडले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
-
चिखला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण .
दोन गटात झालेल्या वाद प्रकरणी चिखलात काकड येथील आरोपी सरपंच गणेश काकड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वाशीम मधून गणेश काकड यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहीत समोर येत आहे. आतापर्यंत 23 लोकांना अचक करण्यात आली आहे. चिखला काकड गावाच्या परिसरात कलम 163 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन.. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं आहे.
-
कोणत्या प्रकरणांवर गाजणार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
वाढती बेरोजगारी, तरुणाईला ड्रग्जचा विळखा, मंत्रालयासह राज्यात वाढलेली लाचखोरी, मुलुंडमधील मेट्रोचा अपघात, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, नरहरी झिरवळ्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतक देखील अन्य विषयांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे.
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करणार आहे. 30 दिवसांच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणते कोणते मुद्दे मांडले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचं अकस्मिक निधन, विमान अपघात, पार्थ पवार यांना मुंढला जमीन प्रकरणात दिलेली क्लीन चिट अशा अनेक प्रकरणांवर आजपासून होणाऱ्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा पूर्वीच महाविकास आघाडीने दिला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार आहेत अशी माहिती दिली… शिवाय अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर या ब्लॉगमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गाजणार याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या…
Published On - Feb 23,2026 8:06 AM
