AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : शरद पवारांनी दिले निवृत्तीचे संकेत, अजित पवार म्हणाले की…

| Edited By: | Updated on: Nov 08, 2024 | 10:47 PM
Share

Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 8 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : शरद पवारांनी दिले निवृत्तीचे संकेत, अजित पवार म्हणाले की...
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज धुळ्यात पार पडणार आहे. विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची ही सभा होत आहे. धुळे शहरातील गोशाळा मैदानाच्या 45 एकरावर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. अडीच हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात जबरदस्त बॅनर वॉर. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे बॅनर चर्चेचा विषय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Nov 2024 04:47 PM (IST)

    4 पिढ्या आल्या तरी कलम 370 मागे घेणार नाही: अमित शहा

    जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापित करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. शाह म्हणाले की, काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणायचे आहे. मी म्हणतो 4 पिढ्या आल्या तरी 370 परत मिळणार नाही.

  • 08 Nov 2024 04:24 PM (IST)

    आम्ही धर्माबद्दल बोलत नाही तर घुसखोरांना हाकलण्यासाठी बोलतो: हिमंता बिस्वा सरमा

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, राहुल गांधींनी विचारावे की किती आदिवासी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? आज झारखंडमध्ये आदिवासींची जमीन कोण लुटत आहे आणि त्यांना संरक्षण कोण देत आहे, त्यात नंबर एक हेमंत सोरेन आणि नंबर दोन आहेत राहुल गांधी. हेमंत सोरेन हे आदिवासी नेते असल्याने एकाही घुसखोराला झारखंडमध्ये येण्यापासून रोखण्याची जबाबदारी नाही का? आम्ही धर्माबद्दल बोलत नाही, घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी बोलतो.

  • 08 Nov 2024 04:19 PM (IST)

    शरद पवारांनी दिले निवृत्तीचे संकेत, अजित पवार म्हणाले की…

    शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारताच म्हणाले की, मला याबाबत काहीच सांगायचं नाही. मला कोणच्याही मतासंदर्भात बोलायचं नाही.

  • 08 Nov 2024 03:50 PM (IST)

    परभणीच्या जिंतूर सेलू विधानसभेत शरद पवारांची जाहीर सभा

    परभणीच्या जिंतूर सेलू विधानसभेत विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सेलू शहरातील नूतन मैदान येथे सभेला सुरुवात झाली आहे. मंचावर राज्यसभा खासदार फौजिया खान माजी आमदार विजय गव्हाणे आणि इतर नेते उपस्थित आहेत.

  • 08 Nov 2024 03:19 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करत मोठा आरोप केला आहे. काँग्रेस ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर करतेय. नेहरुंच्या काळात ओबीसींना वेगवेगळ्या जातीत वाटून ठेवलं. काँग्रेस आता परजीवी काँग्रेस झालीय,अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

  • 08 Nov 2024 02:58 PM (IST)

    भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस पोलखोल करणार

    भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस पोलखोल करणार आहे, असे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सांगितले. जाती जातीत भांडणं लावण्याची काम भाजपने केली आहेत. लाडकी बहीण योजनेबाबतचं मोदींचं वक्तव्य चुकीचं आणि खोटं आहे. आम्ही कुठेही बोललो नाही की योजना बंद करणार नाहीत. मध्यप्रदेशात ही योजना का बंद झाला त्याचं उत्तर मोदींनी द्यावं.

  • 08 Nov 2024 02:50 PM (IST)

    2 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त

    विरार मध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. बँकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती. आज दुपारी विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बॅंकेच्या एटीएम व्हॅन ची चौकशी केली असता त्यात ही बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे

  • 08 Nov 2024 02:43 PM (IST)

    पूनम महाजन यांच्या वक्तव्याने एकच खळबळ

    प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी आज या वक्तव्याचं पुनरुच्चार केला. त्यासोबतच महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल, त्यामुळे माझं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलं, असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

  • 08 Nov 2024 02:30 PM (IST)

    एकनाथ शिंदे म्हणाले मी तुरुंगात जायला घाबरत नाही

    विरोधक म्हणाले आमचे सरकार आल्यावर तुम्हाला जेलमध्ये टाकू, ही एकनाथ शिंदे जेलमध्ये जावून आलाय मी कुणाला भीत नाही, असे ते म्हणाले.

  • 08 Nov 2024 02:20 PM (IST)

    सुरतेला शिवाजी महाराजाचं मंदिर बांधणार

    न केलेल्या कामाचा ही लोक गवगवा करत आहेत. ते आता 50 खोके नॉट ओके असा घणाघात त्यांनी केला. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार तर गद्दार जिथे गेले, त्या सुरत शहरात पण शिवाजी महाराजाचं मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 08 Nov 2024 02:10 PM (IST)

    राज्यात महायुतीचेच सरकार – रावसाहेब दानवे

    काळ्या दगडावरची ही पांढरी रेघ आहे आणि सूर्यप्रकाशापेक्षाही स्वच्छ कोणत्याही परिस्थितीत भविष्यकारालाही सुद्धा विचारायची गरज नाही. या राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे सरकार येणार असल्याचा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

  • 08 Nov 2024 02:00 PM (IST)

    नितीन गडकरी महादेव शिवणकर यांच्या घरी

    नितीन गडकरी यांची माजी वित्तमंत्री महादेव शिवणकर यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. महादेवराव शिवनकर महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री आणि लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते.

  • 08 Nov 2024 01:45 PM (IST)

    15 हजार कोटी दिले -अमित शाह

    मोदींनी महाराष्ट्रसाठी काय केले आहे, असे शरद पवार म्हणत असतात. मी सर्व हिशोब घेऊन आला आहे. 10 वर्षांत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विकसित करण्यासाठी 15 हजार कोटी दिले आहेत, असे अमित शाह यांनी सांगलीमधील शिराळा येथील सभेत सांगितले.

  • 08 Nov 2024 01:32 PM (IST)

    104 सिंचन प्रकल्पाला परवानगी

    महाविकास आघाडी सरकारने केवळ 4 सिंचन प्रकल्पला परवानगी दिली मात्र आम्ही 104 सिंचन प्रकल्पाला परवानगी दिली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

  • 08 Nov 2024 01:18 PM (IST)

    काँग्रेसकडून जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न- मोदी

    काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत आहे. काँग्रेस यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात म्हटले.

  • 08 Nov 2024 01:11 PM (IST)

    कलम ३७० लागू होणार नाही- मोदी

    काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू होणार नाही. महायुती तुमच्या परिवारासाठी काम करत राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

  • 08 Nov 2024 12:57 PM (IST)

    मुंबईत आणखी एक विमानतळ होणार- मोदी

    वाढवण बंदराच्या जवळ नवीन विमानतळ करण्यासाठी महायुतीचे सरकारच्या शपथविधी झाल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सांगितले. .सविस्तर वाचा…

  • 08 Nov 2024 12:51 PM (IST)

    महाविकास आघाडीत विकास कामे थांबली

    महाविकास आघाडीच्या गाडीत चाके नाही, ब्रेक नाही. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली…सविस्तर वाचा…

  • 08 Nov 2024 12:09 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात दाखल, थोड्याच वेळात भाषण करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धुळ्यात आगमन झाले आहे. आज महाराष्ट्रात मोदींची पहिली सभा होणार आहे. थोड्याच वेळात ते व्यासपीठावर दाखल होणार असून जोरदार भाषण करतील. सध्या धुळ्यात देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे सभास्थळी दाखल झाले आहेत.

  • 08 Nov 2024 11:41 AM (IST)

    लक्ष्मण हाकेंवर हल्ला : १० जण पोलिसांच्या ताब्यात, 30 जणांवर गुन्हा दाखल

    नांदेड : प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी 10 जणांना कंधार पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीवरुन 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून उमेदवाराचे वाहन थांबवले, तसेच पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट करुन जखमी केले, गाडीवर दगडफेक आणि पोलिसांशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 08 Nov 2024 11:38 AM (IST)

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार

    नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आज निवृत्त होणार आहे. सरन्यायाधीश पदावरून धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार आहेत.

  • 08 Nov 2024 11:37 AM (IST)

    भाजपने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास केला, विजय वडेट्टीवारांची टीका

    भुजबळ जे म्हणताय ते खरं आहे, आम्ही आधी हेच बोलत होतो. मात्र आमचे आरोप राजकीय आहे असे सांगितले जात होते. भाजपमध्ये जी लोक गेली आहे, ती सर्व ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवूनच गेली आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच आहेत. आरोप लावणारेही तेच आहे आणि भाजपमध्ये प्रवेश देणारे तेच आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • 08 Nov 2024 10:52 AM (IST)

    Maharashtra News: काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार

    काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार… १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीमध्ये करणार रोड शो… गडचिरोली मधील आदिवासी मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेबांधणी… काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो…

  • 08 Nov 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra News: 95 % ईडी, सीबीआयच्या केसेस विरोधी पक्षावर आहेत – सुप्रिया सुळे

    ईडी, सीबीआयच्या केसेस फक्त विरेधी पक्षांवर आहेत… ईडी, सीबीआयच्या गैरवापरातून पक्ष फोडणं सुरु… अदृश्य शक्ती महिलांमागेही लागतेय… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 08 Nov 2024 10:19 AM (IST)

    Maharashtra News: भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही – संजय राऊत

    राज ठाकरे फडणवीसांसोबत सत्तेतच… भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही… आपला पक्ष सोडायचा आणि भाजपसोबत जायचं असा दबाव असतो… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं.

  • 08 Nov 2024 10:15 AM (IST)

    Maharashtra News: शिंदे, अजित पवारांसह सर्वजण गेले ते ईडीला घबरुन – संजय राऊत

    सगळे स्वतःला वाचवण्यासाठी शिंदेंसोबत गेले… शिंदे, अजित पवारांसह सर्वजण गेले ते ईडीला घबरुन.. भाजपमध्ये जाताच अनेकांच्या ईडी, सीबीआयच्या फाईली कपाटात… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…

  • 08 Nov 2024 10:08 AM (IST)

    Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जुन्नर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर हल्ला

    युवकचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे यांच्या गाडीवर दगडफेक… जुन्नरहून नारायणगावला परतत असताना कुरण येथे झाली दगडफेक… हल्लेखोर कुरणच्या जंगलात पळाले सुरज वांजगे सुखरूप … खासदार अमोल कोल्हे, बाबू पाटे यांनी घटनास्थळी दिली भेट… जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

  • 08 Nov 2024 09:56 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : ‘पवार साहेबांना दु:ख दिलं. याचा हिशोब…’

    शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटलांचा आमदार बबनराव शिंदेवर जोरदार निशाणा. अभिजीत पाटलांना मत म्हणजे शरद पवारांना मत असणार आहे. मतदान करताना शरद पवारांना या वयात पक्ष आणि पार्टी फोडणाऱ्या सही करणाऱ्या 40 गद्दार आमदारांमध्ये माढ्याचे आमदार देखील होते. त्यांनी पवार साहेबांना दु:ख दिलं. याचा हिशोब या निवडणुकीतून दाखवून द्यायचाय. निकाल देखील आपल्याच बाजुने लागणार आहे असं अभिजीत पाटील म्हणाले.

  • 08 Nov 2024 09:46 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीला मुंबईत

    धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आले भेटीला. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अमोल मिटकरी, सुनील तटकरे, धनंजय मुंडे दाखल. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आले भेटीला. थोड्याच वेळात अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता.

  • 08 Nov 2024 09:17 AM (IST)

    हर्षवर्धन जाधव यांची जीवाला धोका असल्याची तक्रार

    कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. काही गाड्या माझा पाठलाग करत आहेत, काही लोक अपहरणाचा कट रचत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मागे भाजप नेते रावसाहेब दानवे असल्याचा त्यांचा आरोप आहे

  • 08 Nov 2024 09:03 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : आज पीएम मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज धुळ्यात पार पडत आहे. विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज येथे येत आहेत. धुळे शहरातील गोशाळा मैदानाच्या 45 एकरावर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. अडीच हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. भव्य सभा मंडप व्यासपीठ अशी संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

Published On - Nov 08,2024 9:00 AM

Follow us
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.