Maharashtra Breaking News in Marathi : रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
Maharashtra Breaking News in Marathi : आज 9 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुंबई | दि. 9 मार्च 2024 : महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात यश आले आहे. मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्यात जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपची दुसरी यादी येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा- रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पर्यटन आराखडयातील जलक्रीडा प्रकल्प, बांबू मुल्यवर्धन केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ईव्हीएम मशीन विरोधात कल्याणामध्ये सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार आहे.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
लोकसभेसाठी सगळ्यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे- शरद पवार
लोकसभेसाठी बारामती मतदार संघातून शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची व्यासपीठावरून घोषणा केली. भोरमधील हरिश्चंद्री गावामध्ये सभा सुरू आहे.
-
लढणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो पळपुट्यांचा नाही- संजय राऊत
शरद पवार यांना भीष्मपितामह यासाठी म्हणत नाही की भीष्म हा कौरवांच्या बाजूने होता. पण हा पिता आज आमच्यासाठी लढतोय. लढणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो पळपुट्यांचा नाही. शिवसेना ही लढणाऱ्यांची फौज आहे आपला सरकार आल्यावर कर्जमाफी करू. नक्कीच कर्जमाफी करू पण गद्दारांना माफी नाही, असं संजय राऊत म्हणाले.
-
-
कोल्हापुरात निर्भय बनो सभेला सुरुवात
असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनो सभा होतेय. सभेला शाहू छत्रपती महाराज यांची हजेरी असून शाहू छत्रपतींनी व्यासपीठावर न जाता खाली बसून सभा ऐकन पसंत केलं. शाहू छत्रपतींच्या कृतीने उपस्थितांची मन जिंकली आहे.
-
पुन्हा मोदी सरकार स्थापन करा : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
रायपूरमध्ये किसान महाकुंभला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे मी नाही तर नीती आयोग म्हणत आहे. यावेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करा, आम्ही भारतातील गरीबी दूर करू.
-
येत्या गुरुवारी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता
सर्वच राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आतापासूनच प्रचाराला वेग दिला आहे. दरम्यान, निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येत असून, तेथील पाहणी करून पुढील गुरुवारी किंवा शुक्रवारी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
-
-
‘आप’ पुढील आठवड्यात पंजाबमधील उमेदवारांची घोषणा करणार
आम आदमी पार्टी पुढील आठवड्यात पंजाबमधील लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते. आम आदमी पक्षाचे खासदार आणि संघटन मंत्री संदीप यांनी टीव्ही 9 शी बोलताना ही माहिती दिली आहे.
-
सरकारने अयोध्येपासून कलम 370 पर्यंत तोडगा काढला: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले गेले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले आहे. असे अनेक प्रश्न होते ज्यांच्या निराकरणाची कल्पनाही कोणी केली नव्हती पण मोदींनी अशा प्रत्येक समस्येचे निराकरण केले आहे
-
पोलिसांची धडक कारवाई
नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे इर्टीगा मोटारीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमलीपदार्थ जप्त केला आहे.
-
शरद पवार यांना भेटणार
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे त्यांच्या मताशी ठाम आहेत,शरद पवार यांना भेटून माझं काय चुकलं हे विचार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.
-
ललिता पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
जळगावच्या अमळनेर मधील भाजपच्या पदाधिकारी ॲड ललिता पाटील यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.जळगाव लोकसभेच्या उमेदवारी बाबत झालेल्या बैठकीत ॲड ललिता पाटील यांचीही उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेत उमेदवारीबाबत ललिता पाटील यांनी इच्छा व्यक्त केली.
-
प्रणिती शिंदे यांचे नाव निश्चित
काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे.प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा दौरा सुरु केला आहे.
-
सोने सूसाट, चांदी वधारली
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कहर केला. सोन्याची ७० हजारांकडे वाटचाल सुरु आहे. तर चांदीने पण ७५ हजारांकडे कूच केली आहे.
-
प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभेसाठी निश्चित?
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा गावभेट दौरा केलाय. लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न हाती घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
-
अमरावतीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार, अभिजीत अडसूळ यांचा दावा
अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा यांचा बालिशपणा सुरु आहे. त्या फार बालिशपणे वागतात. यापूर्वी त्यांनी बरेचसे कार्यकर्ते घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले पण ते तोंडघशी पडले. अमरावतीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार. नवनीत राणा यांना तिकीट मिळणार नाही. त्या फारच करतात खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला.
-
आचारसंहिता लागायला चार, पाच दिवस बाकी आहे – रावसाहेब दानवे
जालना : 14, 15 किंवा 16 मार्च या तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची दिशा सुरू होणार आहे. या दोन चार दिवसांमध्ये एवढे उद्घाटन दोन चार जणांकडून होतील अशी शक्यता कमी होती. सगळ्यांना एकत्र केलं आणि 101 कोटीचे उद्घाटन आपण ठेवले. या पलीकडे जाऊन आपले काही उद्घाटने बाकी आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
-
आमचे सर्व दरवाजे आम्ही बंद करून टाकले आहेत, जितेंद्र आव्हाड
ठाणे : राज ठाकरे म्हणजे स्वतः एक नाटक कंपनी आहेत. मिमिक्री आर्टिस्ट आहेत. कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे ते आर्टिस्ट आहेत. स्वतःच्या पक्ष वाढवण्यापेक्षा दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय. आम्ही खुले आम सांगतोय आमच्यातून गेलेल्याला कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सर्व दरवाजे आम्ही बंद करून टाकले आहेत, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
-
तर ओबीसी देखील यांना मतदान करणार नाही, प्रकाश शेंडगे यांचा इशारा
बीड : प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने आम्हाला असं वाटत आहे की ते महाविकास आघाडी सोबत जाणार नाही ते आमच्या सोबत स्वतंत्र लढतील. आमच्या सोबत जर स्वतंत्र लढले तर बहुजनांची ताकद ओबीसींची ताकद आणि दलितांची ताकद ही राज्यात यंदा निर्णायक ठरेल असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले. मराठे भाजपला मतदान करणार नाही. गावोगावी निषेध केला जाईल आणि अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आमची रणनीती करत आहे. ओबीसीदेखील मराठ्यांना मतदान करणार नाही. जो ओबीसी इतकी बात करेगा वही देश मे राज करेगा, असा इशाराही त्यांनी दिला.
-
अभिजीत अडसूळ यांची टीका
नवनीत राणा आणि रवी राणा यांचा हा बालिशपणा आहे त्या फार बालिश वागतात यापूर्वी सुद्धा त्यांनी बरेचसे कार्यकर्ते घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितलं पण ते तोंडघशी पडले, अशी टीका अभिजीत अडसूळ यांनी केली.
-
उंटावरुन शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही – एकनाथ शिंदे
मी उंटा वरुन शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. जनतेच्या मदती अडी अडचणींना धावणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले आहे.
-
शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जन्मताच सोन्याचा चमचा तोंडी घेतलेल्यांनाच मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे का ? शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये का ? असा सवाल सातारा पाटण येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
-
कोयना धरणावर जल पर्यटन प्रकल्प
कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. त्याच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगितलं. हा प्रकल्प करताना पर्यावरणाचा सुद्धा विचार करण्यात आला आहे.
-
मुंबईतील गोखले पुलाच्या कामावर प्रश्न
गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या मुंबईतील अंधेरीमधील गोखले पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर तो नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र गोखले पुलाचं कामकाज पाहता बीएमसी आणि रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जुना गोखले पूल आधी जसा होता तसा न बांधता वेगळ्याच पद्धतीने बांधल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय.
-
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा
माझा समाज आज ताट सोडून उन्हात बसला आहे. आपण उन्हात तळपल्याशिवाय मुलाला सावली भेटणार नाही. सरकारने समाजाची कदर करावी. सरकारने ओळखून घ्यावे मराठे तुमचा राजकीय सुफडा साफ करतील.
-
चंद्रकांत पाटील यांची महत्वाची बैठक
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आज अमरावतीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक.
-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी धुळे मालेगाव धावता रोड शो
राहुल गांधी यांची भारत छोडो न्याय यात्रा 12 मार्चला धुळ्यात. 12 मार्चला सायंकाळी दोंडाईचा येथे राहुल गांधींच्या आगमन आणि मुक्काम…
-
केंद्र सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक बुधवारी होणार
पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी होणार बैठक. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी शेवटची कॅबिनेट बैठक दिल्लीत कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता.
-
शरद पवारांच्या उपस्थितीत सातारा लोकसभेची बैठक
थोड्या वेळात शरद पवारांच्या उपस्थितीत सातारा लोकसभेची बैठक होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, आमदार शशिकांत शिंदे या बैठकीला पोहोचले आहेत. मोदीबागेतील कार्यालयात ही बैठक सुरू होणार आहे. आज सातारा लोकसभेच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार आहे.
-
राजकारणात टिकायचं असेल तर संयम हवा- राज ठाकरे
राजकारणात जर तुम्हाला टिकायचं असेल तर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम हवा. आपल्याला वाटतं की नरेंद्र मोदींचं हे सर्व यश आहे. त्यांचं यश काही अंशी आहेच, पण यशाचं सर्वांत मोठं श्रेय जातं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना. इतक्या लोकांनी इतकी वर्षे ज्या खस्ता खाल्ल्या आहेत, त्याचं हे यश आहे. हे सर्व अचानक घडलेलं नाही, असं राज ठाकरे भाजपबद्दल म्हणाले.
-
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे- राज ठाकरे
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. त्याचा फायदा पक्षासाठी होऊ शकतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ठरवलं की नाशिकमध्ये करायचं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचं ठरवलंय, असं राज ठाकरे म्हणाले.
-
पोलीस बंदोबस्तात दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकाम काढलं जाणार
पुणे- पोलीस बंदोबस्तात दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकाम काढलं जाणार आहे. दर्ग्याजवळील परिसरात कलम 144 लागू होणार आहे. चारपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र थांबता येणार नाही. पोलिसांकडून आवाहन करून सर्वांना बाहेर काढण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळात सोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे.
-
कोल्हापूर लोकसभेवरून मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये जुंपली
कोल्हापूर- कोल्हापूर लोकसभेवरून मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये जुंपली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा मंत्री मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. सतेज पाटील यांना इतका बालिशपणा कुठून आला माहीत नाही. राजकारणात असं होत नसतं, अशी प्रतिक्रिया मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे. आदराच्या भावनेने मी छत्रपती शाहू महाराजांबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये अशी आमची भावना होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
-
भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 12 मार्चला जाहीर होणार
नवी दिल्ली- भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 12 मार्चला जाहीर होणार आहे. 11 मार्चला राजधानी दिल्लीतल्या मुख्यालयात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 150 हून अधिक उमेदवारांची नावं दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
Live Update | मी जाती साठी लढत आहे, करोडो मराठ्यांचे कल्याण झाले पाहिजे – जरांगे पाटील
मी जाती साठी लढत आहे, करोडो मराठ्यांचे कल्याण झाले पाहिजे… देवेंद्र फडवणीस यांनी दडपशाही सुरू ठेवली आहे… त्यांचे षडयंत्र कसे मोडायचे मी बघतो… माझ्या घरावर 13 सिमेंट पत्रे आहेत… काय चौकशी करणार? आता पाच ते सहा करोड मराठे एकत्र येणार आहेत, त्याच्यासाठी आपण नऊशे एक्कर जमीन शोधत आहोत – असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
-
Live Update | मुंबई काँग्रेसच्या वतीने रणशिंग प्रशिक्षण शिबिरचे आयोजन
मुंबई काँग्रेसच्या वतीने रणशिंग प्रशिक्षण शिबिरचे आयोजन… मुलुंड येथील म्हाडा कॉलनी, आर आर सिंह सभागृह येथे एक दिवसीय शिबिराचे आयोजन… शिबिराला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला , काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पवन खेरा, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती… काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करणार ऑनलाइन मार्गदर्शन… रणसिंग प्रशिक्षण शिबिराला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित
-
Live Update | भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग
भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली आहे. मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचा प्रयत्न…
-
पुणे पोलीस दलातील सर्व बडे पोलीस अधिकारी पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात दाखल
पुणे पोलीस दलातील सर्व बडे पोलीस अधिकारी पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात दाखल झाले आहेत. पुण्याचे सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडून संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यात आला. पुणे शहर मंदिर परिसरात पुन्हा पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
-
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन. पुणे शहर विद्रुपीकरणाचा जाहीर निषेध म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भाजप विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. “अबकी बार मोदी सरकार” असा मजकूर लिहित शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्रूपीकरण केल्याचा शरद पवार गटाचा आरोप.
सुंदर अशा पुणे शहराचा भाजप विद्रूपीकरण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आज आंदोलन करण्यात आलं.
-
भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतं – संजय राऊत
अजित पवार, प्रफुल्ल पटे, हसन मुश्रीफ यांनी गुडघे टेकले आणि भाजपसोबत गेले. कारवायांसमोर त्यांनी गुडघे टेकले.
पण आम्ही भाजपाच्या कारवायांसमोर झुकणार नाही
-
कितीही कारवाया केल्या तरी आम्ही झुकणार नाही – संजय राऊत
रोहित पवार कोणतंच चुकीचं काम करू शकत नाही. आमच्यावर कितीही कारवाई केली तरी आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही.
-
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरातील भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भोसरी येथे महेश लांडगे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन करणार आहेत. चार वाजता देवेंद्र फडणवीस भांडारकर इन्स्टिट्यूट येथे येणार आहेत. काल रात्री कसब्यात दर्ग्याजवल तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. काल रात्री झालेल्या संपूर्ण परिस्थितीचा ही आढावा देवेंद्र फडणवीस पोलिसांकडून घेणार आहेत.
-
अजित पवार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येणार
उद्या पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मल्टिसपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीसांची पण हजेरी असणार आहे. ३८० कोटीचं हॉस्पिटल उभं राहतंय. शरद पवार गटाचे नगरसेवक सचिन दोडके यांनी पाठपुरावा केला होता.
-
गोखले पुलाचे काम कसे चुकले?; चहल म्हणाले…
अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पूल आणि बर्फीवाला पुलामध्ये निर्माण झालेल्या अंतर चुकल्याने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचं सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी तर थेट आयुक्तांचे निलंबन करावे अशी मागणी केली. यानंतर आता नेमके गोखले पुलाचे काम कसे चुकले? या संदर्भात आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलंय.
-
अमरावतीत तिसऱ्या दिवशीच ठिय्या आंदोलन
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर पांढरी खानपूर येथील गावाच्या प्रवेशद्वारासाठी नागरिकांचे तिसऱ्या दिवशीच ठिय्या आंदोलन सुरूच आहे. पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, नंतरच गावी परतनार आंदोलकांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावातील मुख्य चौकात प्रवेशद्वारावर नाव देण्यावरून दोन गटात वाद झालाय. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. काल विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा तोडगा निघाला नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे.
-
Maharashtra News | समृद्धी महामार्गावर अपघात, राजकीय पक्षांच्या दोघांचा मृत्यू
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगरच्या जवळ असलेल्या जटवाडा परिसरात भीषण अपघात झाला आहे. एक कार अज्ञात वाहनावर धडकून हा अपघात झाला आहे. या अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाच्या दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैजापूर ते जालना दरम्यानचा समृद्धी महामार्ग अजूनही धोकादायक असल्याचं या अपघातातून समोर येत आहे.
-
Maharashtra News | जळगाव लोकसभा मतदार संघासंदर्भात मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक
जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता बैठक. शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, दोन्ही जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांसह पदाधिकारी राहणार उपस्थित. बैठकीत सर्वानुमते जळगाव लोकसभेच्या उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून कोण उमेदवार असेल याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष.
-
Maharashtra News | मध्य, हार्बर मार्गावर उद्या दुरुस्तीकामे
विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.
-
Maharashtra News | केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची पुणे महानगरपालिकेला नोटीस
कात्रज उद्यानातून बिबट्या पळाल्याप्रकरणी पालिकेला बजावण्यात आली नोटीस. बिबट्या प्रकरणी तात्काळ अहवाल सादर करा. पुणे महानगरपालिकेला सूचना. घटना घडल्यानंतर प्राणीसंग्रहालय प्रशासनाने तत्काळ केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणास कळविणे अपेक्षित होते. मात्र याबाबत महापालिकेने कुठलीही माहिती कळवली नसल्याचा आरोप.
-
Marathi News | कोयत्या गँगवर कारवाई
पुण्याच्या हवेली तालुक्यातील पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे युवकांवर कोयत्यांनी खुनी हल्ला करून गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. या कोयता गँगमधील आठ जणांना हवेली पोलिसांनी जेरबंद केलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांतच पोलिसांनी कोयता गँगच्या आठ जणांना ताब्यात घेतले.
-
Marathi News | मुंबई मार्च’च्या वतीने उद्या आगळे आंदोलन
मुंबईत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सोयींचा अभाव आहे. तसेच सातत्याने रस्त्यांवर वाहतूक खोळंब्याची समस्या भेडसावते. रस्त्यांची गुणवत्ताही खराब आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मार्च’ या मुंबईकरांच्या विविध हक्क आणि सुविधांसाठी आवाज उठवणाऱ्या संस्थेतर्फे उद्या रविवारी, १० मार्च रोजी दांडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
-
Marathi News | हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट
गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग हा जातो या महामार्ग वरील सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीरामपूर या पुनर्वशीत गावाजवळ महामार्ग जातो. या ठिकाणी एका हॉटेलमध्ये एका सिलेंडरला अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. या स्फोटात संपूर्ण हॉटेल हे जळून खाक झाले.
-
Marathi News | मंगळवारी डोंबिवली कल्याणमध्ये पाणी पुरवठा बंद
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी मोहिली येथील उदंचन, जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांना टाटा पॉवर कंपनीच्या कांबा येथील फिडरमधून महावितरण कंपनी विद्युतपुरवठा करते. टाटा पॉवर कंपनीला आपल्या कांबा येथील फिडर दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यामुळे कांबा केंद्रातून जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
Published On - Mar 09,2024 7:10 AM
