AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE Updates : नाशिकमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत राडा, उमेदवारावर भररस्त्यात बंदूक ताणली

| Edited By: | Updated on: Jan 13, 2026 | 10:26 AM
Share

Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: निवडणुकीचा जाहीर प्रचार आज संध्याकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रचार इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाद्वारे करता येणार नाही. जाहीर प्रचार संपल्यानंतर सर्व प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग राजकीय पक्षांकडून काढण्यात येतील.

Maharashtra News LIVE Updates : नाशिकमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत राडा, उमेदवारावर भररस्त्यात बंदूक ताणली
breakingImage Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 13 Jan 2026 10:37 AM (IST)

    पुण्याला बदल हवाय, 16 तारखेला पुण्याचा कारभारी बदललेला दिसेल; रुपाली चाकणकर यांचा विश्वास

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले आहे. पुण्याला आता बदल हवा असून १६ तारखेला पुण्याचा कारभारी बदललेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जनतेला मोठी आश्वासने देताना सांगितले की, अजित पवार हे केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्यातील मेट्रो आणि बस प्रवास मोफत करतील. दरम्यान, कुख्यात गजानन मारणे याच्या प्रकरणावर विचारले असता, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. आगामी निवडणुकांच्या निकालाकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

  • 13 Jan 2026 10:27 AM (IST)

    नाशिकमध्ये निवडणुकीचा थरार, आप उमेदवारावर बंदूक ताणली

    नाशिकच्या सातपूर भागात प्रभाग ११ मध्ये प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणून त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रचाराला फिरू नकोस असे धमकावत एका तरुणाने बंदूक काढली, मात्र तिथे उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने त्याला पकडून चांगलेच चोपले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढवणारे आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  • 13 Jan 2026 10:17 AM (IST)

    सोलापुरात महायुतीत ठिणगी, भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेना शिंदे गटात थेट सामना

    सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात सध्या जाहीर आव्हान-प्रतिआव्हानांचे सत्र सुरू झाले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अमोल शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. कोठे असले १० लोक खिशात घेऊन फिरतात, अशा शब्दांत गोरेंनी शिंदेंना लक्ष्य केले, तर अमोल शिंदे यांनीही येणाऱ्या विधानसभेला मी देवेंद्र कोठेंच्या विरोधात उमेदवार असेन,” असे खुले आव्हान देऊन निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. सोलापुरात भाजप स्वबळावर, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीमध्ये लढणार असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

  • 13 Jan 2026 10:06 AM (IST)

    पुणे पोलिसांची चाहूल लागताच सचिन घायवळ शेतातून फरार, मदत करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्याचे आदेश

    कोथरूड गोळीबार आणि खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ पोलिसांना चकवा देऊन पुन्हा फरार झाला आहे. जामखेड तालुक्यातील एका शेतात तो लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला, मात्र एका महिलेच्या मदतीने तो निसटण्यात यशस्वी झाला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, घायवळला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्या संबंधित महिलेला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

  • 13 Jan 2026 09:50 AM (IST)

    मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांना थेट मतदान केंद्रावरच जावे लागणार

    75 वर्षांवरील नागरिकांना यावेळी घरोघरी मतदानाची सुविधा नाही.यामुळे वृद्ध मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गर्दीमुळे टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने व्हीलचेअर सह विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार.

  • 13 Jan 2026 09:40 AM (IST)

    महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज प्रभाग क्रमांक ३४ ,३२ व ८ मध्ये रोड शो. निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

  • 13 Jan 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरात महापालिका निवडणूक सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जुंपली

    भाजप आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात आव्हान-प्रतिआव्हान. असले 10 लोकं आमदार देवेंद्र कोठे खिशात घेऊन फिरतात. लढाई ही बरोबरीच्या पैलवानासॊबत केली जाते. पालकमंत्री जयकुमार गोरेंची शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंवर टीका तर आमदार देवेंद्र कोठेंना काय खुमखूमी आलीय माहिती नाही पण येणाऱ्या विधानसभेला भाजप आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध मी विधानसभेचा उमेदवार असेल.

  • 13 Jan 2026 09:20 AM (IST)

    डॉ. निखिल सैंदाणे गजाआड; ‘सिव्हिल’मधील आयसीयू फसवणूकप्रकरणी अटक

    कोव्हिड काळात बनावट कंपनीमार्फत शासनाची ३ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी असताना गैरप्रकार. सरकारवाडा पोलिसांकडून सोमवारी सायंकाळी राहत्या घरातून अटक. नाशिक सिव्हिलमध्ये ३० खाटांचे आयसीयू उभारणीचे कंत्राट

  • 13 Jan 2026 09:10 AM (IST)

    नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर ताणली बंदूक

    नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची दिली धमकी. घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात. बंदुक ताणणारा युवक जेल मधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप

  • 13 Jan 2026 09:00 AM (IST)

    पुणे- राज्यातील 107 परीक्षा केंद्र रद्द

    पुणे- राज्यातील 107 परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार आढळल्याने केंद्रावर राज्य मंडळाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यापूर्वी काही प्रकार झालेल्या परीक्षा केंद्रावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील दहावीची 31 बारावीची 76 केंद्राची मान्यता रद्द करण्यात आले आहे. यात परीक्षा केंद्र छत्रपती संभाजी नगर विभागातील आहेत.

  • 13 Jan 2026 08:53 AM (IST)

    नाशिक- टिळकवाडी तरण तलाव रस्ता तब्बल १२ महिने पूर्णतः बंद राहणार

    नाशिक- टिळकवाडी तरण तलाव रस्ता तब्बल १२ महिने पूर्णतः बंद राहणार आहे. रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी वाहतूक बंदी करण्यात आली. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांना या मार्गावर पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे.

  • 13 Jan 2026 08:43 AM (IST)

    नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर ताणली बंदूक

    नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक ताणली गेली. नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आली. घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. बंदुक ताणणारा युवक जेलमधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे.

  • 13 Jan 2026 08:31 AM (IST)

    जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल

    जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रभाग 11 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारानां मतदानासाठी पैसे वाटप केले जात असल्याचं लेखी तक्रारीत नमूद आहे. पैसे दिल्यावर मतदान कसं आणि कुणाला करावं याबाबत देखील डेमो दिला जात असल्याचं व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.

  • 13 Jan 2026 08:26 AM (IST)

    नाशिक- 122 जागांसाठी 729 उमेदवारांचा प्रचार आज थांबणार

    नाशिक- 122 जागांसाठी 729 उमेदवारांचा प्रचार आज थांबणार आहे. अनेक ठिकाणी आज प्रचार रॅली आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारी, 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसंच दहा हजार कर्मचारी तैनात असतील.

  • 13 Jan 2026 08:25 AM (IST)

    नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी 

    नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारी ( बंडखोरी ) आणि पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई करण्यात आली.

  • 13 Jan 2026 08:22 AM (IST)

    गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ शेतातून फरार

    पुणे- पोलीस शोधत येत असल्याची माहिती मिळताच गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ शेतातून फरार झाला. कोथरूड गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ परदेशात लपून बसला आहे. तर त्याचा भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. एका व्यावसायिक महिलेकडून 40 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी सचिन घायवळवर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून सचिन घायवळ फरार असून तो जामखेड तालुक्यातील एका शेतात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारांच्या तोफा आज (13 जानेवारी) संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली होती. चिन्हवाटपानंतर प्रचाराला वेग आला. गेल्या काही दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रभागाचा कोपरान कोपरा पिंजून काढला आहे. मतदारांना कामांची आश्वासनं देत, घराघरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं. अखेर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांचं प्रतिबिंब पुण्याच्या गल्लीबोळात पाहायला मिळत आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या..

Published On - Jan 13,2026 8:14 AM

Follow us
डोंबिवलीत पैसे वाटल्यावरुन राडा, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत पैसे वाटल्यावरुन राडा, नेमकं काय घडलं?.
मातोश्रीचं दार, ते अदानी; फडणवीसांकडून ठाकरेंची सगळीच पोलखोल
मातोश्रीचं दार, ते अदानी; फडणवीसांकडून ठाकरेंची सगळीच पोलखोल.
...पण आम्ही 16 तारखेला जिंकणार, अमित ठाकरे यांचा विश्वास
...पण आम्ही 16 तारखेला जिंकणार, अमित ठाकरे यांचा विश्वास.
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ.
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात.
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य.
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण.
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन.