AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : नांदेडमध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

| Edited By: | Updated on: May 18, 2026 | 11:15 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीमध्ये मनसेचे आंदोलन. स्थानिकांना रोजगार देण्याची जोरदार मागणी. इन्वेंशिया हेल्थकेअर लिमिटेड कंपनीविरोधात आंदोलन. मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

Maharashtra News LIVE : नांदेडमध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू
Breaking news

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरण. कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज राहाता न्यायालयात सुनावणी. कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणुक प्रकरणात आरोपी. भोंदू अशोक खरात , कल्पना खरातसह तीन जणांवर गुन्हा. आरोपी अरविंद बावके आण किरण सोनवणे सध्या न्यायालयीन कोठडीत. दोघांचे जामीन अर्ज अगोदरच राहाता न्यायालयाने फेटाळले आहेत. कल्पना खरातला जामीन मिळणार का ? की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष.परळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पोलीस प्रशासनाकडून नियमांचे पालन करत या जयंती मिरवणुकींना परवानगी देण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावण्यात आले होते. दरम्यान आता या प्रकरणी 13 डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात 11 तर शहर पोलीस ठाण्यात 2 डीजे चालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Apr 2026 06:00 PM (IST)

    …तर सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री होतील – प्रतिभा शिंदे

    महिला आरक्षण आल्यामुळे उद्या ते लागू झाले, तर सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री होऊ शकतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.

  • 16 Apr 2026 05:48 PM (IST)

    संभाजीनगर महानगरपालिका इमारतीची जागा कब्रस्तानाची नाही – आमदार प्रदीप जयस्वाल

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इमारतीची जागा आणि कब्रस्तानाची जागा ही वेगळी वेगळी आहे असे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी म्हटले आहे.त्यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका इमारत ही स्मशानभूमीवर बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी बेचैन आत्मे फिरत आहेत आणि त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे असे वक्तव्य केले होते.

  • 16 Apr 2026 05:33 PM (IST)

    नाशिक धर्मांतर प्रकरणात आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

    नाशिकच्या टीसीएसमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपी शफी शेख आणि रझा मेनन यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडीत राहणार आहे. शफीवर ४ तर रझावर ३ वेग वेगळे गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर पीडितेचा विनयभंग, मानसिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.

  • 16 Apr 2026 04:56 PM (IST)

    विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

    विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

    20 तारखेपर्यंत दिलासा नाहीच, तापमान आणखी वाढण्याची शक्यता

    हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

    काही जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याची शक्यता

  • 16 Apr 2026 04:52 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा, तापमान 42 अंशांच्या पार

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून आज तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक केवळ महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत, तर दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच उन्हात घराबाहेर पडावे, असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस उन्हाचा कडका कायम राहण्याची शक्यता आहे.

  • 16 Apr 2026 04:30 PM (IST)

    वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

    वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

    मागील महिन्यात ५४०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता वाढून ५७०० रुपयांपर्यंत पोहोचला

    सोयाबीनच्या दराने गेल्या चार वर्षांतील उच्चांक मोडला

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • 16 Apr 2026 04:15 PM (IST)

    शिवसेनेन तर्फे भव्य युवासेना वार्षिक मेळावा

    शिवसेनेन तर्फे भव्य युवासेना वार्षिक मेळावा

    शनिवार १८ एप्रिल रोजी वरळी डोम येथे या मेळाव्याचे आयोजन

    या मेळाव्यात युवाशक्तीला दिशा देणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार

    तर युवासेनेची अधिकृत वेबसाइट देखील होणार लाँच

    या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवांचा केला जाणार  सत्कार

  • 16 Apr 2026 03:00 PM (IST)

    बीडमध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक

    बीडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तयारी करूनही शासनाने लघुलेखक पदभरती न केल्याने भविष्य अंधारात आहे. विशिष्ट कौशल्य असलेल्या या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी इतर परीक्षाही देऊ शकत नाहीत. शासनाने मंत्रालयीन व महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागातील लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्ग रिक्त पदांची नियमित पदभरती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पदभरती न झाल्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून राज्यातील 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांवर या राज्य सरकारच्या निर्णयामुळे परिणाम झाल्याचे सांगत सरकारने पदभरती केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

  • 16 Apr 2026 02:50 PM (IST)

    पवार कुटुंबिय सत्तागामी- आमदार सदाभाऊ खोत

    शरद पवार कुटुंबिय हे कधीच पुरोगामी नव्हतं,पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलामी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे,अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.राज्यात शाहू,फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगामी यांना विचारायचं आहे ते आता आंधळे बहिरे झाले आहेत का ? असं सवाल देखील आमदार खोत यांनी उपस्थित केला आहे.बारामती पोट निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थी शरद पवारांचे कुटुंब व रोहित पवार मैदानात उतरली आहेत,यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे,ते सांगलीत बोलत होते.

  • 16 Apr 2026 02:40 PM (IST)

    विहिरीत आढळला बिबट्या

    चाळीसगाव तालुक्यातील शिवापुर शिवारात एका शेतातील असलेल्या विहिरीत बिबट्या आढळला. विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विहिरीत असलेल्या पाईपला धरून बिबट्या स्वतःचा जीव वाचवत विहिरीत तरंगत आहे. चाळीसगाव परिसरातील शिवापूर परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोराला खाट बांधून विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

  • 16 Apr 2026 02:30 PM (IST)

    धर्मांतरण प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करणार

    नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर आणि महिला लैगिक शोषण प्रकरणात आज न्यायालयात 7 पैकी 2 संशयतांना हजर करण्यात येणार आहे. शफी शेख आणि रजा मेनन असं न्यायालयात हजर करणाऱ्या संशयतांची नावं आहेत. महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 9 पैकी एका गुन्ह्यात त्यांना हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात येणार आहे.

  • 16 Apr 2026 02:20 PM (IST)

    सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ 20 एप्रिलला जाहीर सांगता सभा होणार

    या सांगता सभेला महायुतीसह इतर पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वाधिक मताधिक्याचे रेकॉर्ड या पोटनिवडणुकीत मोडणार असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते आणि निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटलांनी नारी शक्ती वंदना विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने डी लिमिटेशनला विरोध करणे म्हणजे महिला आरक्षणाला विरोध करण्यासारखे आहे. सोनिया गांधी, प्रियांका गांधी या गांधी परिवारातील असल्यामुळे त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र नारीशक्ती वंदन विधेयकामुळे सर्वसामान्य महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.

  • 16 Apr 2026 02:10 PM (IST)

    स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल कराव्यात

    स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल करुन यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावी, असे वादग्रस्त विधान करत माजीमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल यांना पत्र पाठविले आहे . त्यामुळे एकच एकच खळबळ उडाली आहे. सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बलात्कार दोन प्रकारचे आहेत, एक जबरदस्ती केलेला बलात्कार दुसरा महिलेने स्वत:हून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावे गुपित राहिलीच पाहिजेत, हे समाजाकरीता चांगले आहे.

  • 16 Apr 2026 02:00 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका

    गृहखात्याच दुर्लक्ष झाले आहे. आपला महाराष्ट्र यूपी बिहार कडे वाटचाल करत आहे का अस वाटतंय अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली. सत्ताधारी आणि काही विशिष्ट लोक याला धर्माचा रंग देत आहे. भांडण कसे होतील हे बघत आहेत. परतवाड्याला, चिखलदऱ्याला, धारणीला अमरावतीत सहज हॉटेल उपलब्ध करून दिले जातात. हॉटेलमध्ये नियम पाळले जातात का; अमरावती गलिच्छ गोष्टीसाठी भाड्याने घर दिले जातात. अख्ख्या महाराष्ट्रासाठी खाली बघण्याची वेळ आली आहे असे ठाकूर म्हणाल्या.

  • 16 Apr 2026 01:45 PM (IST)

    धुळ्यात तापमानाचा पारा तब्बल 42.2 अंशाच्या पुढे.

    धुळ्यात तापमानाचा पारा तब्बल 42.2 अंशाच्या पुढे गेला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची आज नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने शहरातील मुख्य चौकात शुकशुकाट आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात सलग एक एक अंशांनी वाढ झाली आहे. अजून चार दिवस तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • 16 Apr 2026 01:31 PM (IST)

    प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडे यांची कार झाली काळी

    प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची गाडी प्रदूषणामुळे झाली पूर्ण काळी. पंकजा मुंडे यांनी घुग्गुस परिसरातल्या 2 कोल वॉशरिंची केली पाहणी. या दोन कोल वॉशरी मधून जाताना त्यांच्या गाडीवर बसली कोळशाची प्रचंड धूळ.

  • 16 Apr 2026 01:21 PM (IST)

    जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, प्रताप सरनाईक वैतागले

    जनाची नाही तर मनाची तरी ठेवा,प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना भर जनता दरबारात फोन वरून झापले. ​मिरा-भाईंदरमधील लोक दरबारात तक्रार निवारणासाठी एमएमआरडीएचे अधिकारी गैरहजर राहिल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चढला. एका नागरिकाने तक्रार मांडताच सरनाईकांनी थेट फोन लावून “तुम्हाला जनाची नाही तर मनाची आहे का?” अशा शब्दांत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.या कडक भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले, आहेत.

  • 16 Apr 2026 01:10 PM (IST)

    नांदेडमध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

    नांदेड शहरातील देगलुर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू. महापालिकेकडून सुरू आहे नाल्याचे काम. खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलेलं. खेळताना चार मुलं बुडाली. चारही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू .मयत मुलं 7 ते 10 वर्ष वयोगटाची असल्याची माहिती.

  • 16 Apr 2026 12:52 PM (IST)

    उगाचचं लोकांना उचकवून जाती-धर्माचं राजकारण करुन भाजपा दंगली घडवण्याचं प्रयत्न करत आहे का? – यशोमती ठाकूर यांचा आरोप

    अमरावतीच्या परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  उगाचचं लोकांना उचकवून जाती-धर्माचं राजकारण करुन, त्या ठिकाणी भाजपा दंगली घडवण्याचं प्रयत्न करत आहे का? – यशोमती ठाकूर यांनी असा आरोप केला आहे.

    अमरावतीमध्ये जे झालं ते घृणास्पद झालं, दुःख वाटणारं, चिड येणारं आणि राग येणारं आहे.  पीडित महिला ह्या पीडित महिला असतात त्या कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या नसतात, असं त्यांनी सुनावलं.

  • 16 Apr 2026 12:35 PM (IST)

    मावळ,पुणे – कडक उन्हात पोहण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, नदीत बुडून मृत्यू

    कडक उन्हाच्या तडाख्यात अंगाची लाही होत असताना पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला. देहूरोड येथील लोकेश चलवादी हा मित्रांसोबत सांगावडे गावच्या हद्दीतील पवना नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.घटनेनंतर मित्रांनी आरडाओरडा केल्याने शिरगाव परंदवाडी पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लोकेश बेशुद्धावस्थेत सापडला.  मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

  • 16 Apr 2026 12:28 PM (IST)

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनस्टेनोग्राफर पदाच्या भरती रद्द, शासनाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांकडून विरोध

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक, (स्टेनोग्राफर) पदाच्या भरती रद्दच्या शासनाच्या निर्णयाचा जळगावातील विद्यार्थ्यांनी विरोध केला.  शासनाने निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून विद्यार्थ्यांनी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली.

    पाच ते सहा वर्षांपासून क्लासेस लावून स्टेनोग्राफर चे प्रशिक्षण घेतले, आता भरती होईल ही अपेक्षा असताना ऐनवेळी शासनाने भरती न करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी नाराज आहेत.

  • 16 Apr 2026 12:06 PM (IST)

    संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं

    संविधान सुधारणा विधेयक लोकभेत सादर करण्याबाबत 333 खासदारांचं मतदान. विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं तर विरोधात 126 मतं.

  • 16 Apr 2026 12:03 PM (IST)

    कैसा हराया फेम MIM पक्षाची उमेदवार सहर शेख नॅाट रिचेबल

    कैसा हराया फेम MIM पक्षाची उमेदवार सहर शेख नॅाट रिचेबल.  ⁠वडीलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ⁠सहर शेख आणि तिझे वडील युनूस शेख नॅाट रिचेबल आहे.

    ⁠सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून MIM पक्षाची नगरसेविका आहे, मात्र ती व तिचे वडील मुंब्र्यातदेखील नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 16 Apr 2026 11:50 AM (IST)

    घरगुती सिलिंडर मधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणारी मोठी टोळी जेरबंद

    घरगुती सिलिंडर मधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणारी मोठी टोळी जेरबंद झाली आहे. बेसा पिपळा परिसरात घरगुती सिलिंडर मधून गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना अन्न वितरण विभागाने कारवाई केली.  व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने गॅस चोरी करणारी टोळी सक्रिय, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त. 2 जणांना अन्न वितरण विभागाने पोलीसांच्या स्वाधीन केलं.  या टोळीतील मोठा मासा कोण? याचा शोध सुरू आहे.

  • 16 Apr 2026 11:40 AM (IST)

    मंगरूळ – डोक्यात दगड घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करून 36 वर्षांच्या युवकाचा खून

    धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे ३६ वर्षीय युवकाचा डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.  खून केल्यानंतर मृतदेह तब्बल 90फूट फरफटत नेऊन ओढ्याच्या काठावर पळसाच्या झाडाखाली टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

  • 16 Apr 2026 11:30 AM (IST)

    भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

    भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पड-झड झालेल्या घरांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला .  हिंगोली जिल्ह्यात दिनांक 11-04-2026 रोजी सकाळी 08 वाजून 45 मिनिटांनी अनेक गावांना भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंप मापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता 4.7 रिक्टर स्केल येवढी असल्याच सांगितलं आहे .

    ह्या भूकंपाचा केंद्र बिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे.  या गावात अनेकांच्या घराला तडे गेले आहेत पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पड-झड झालेल्या घरांची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत ज्या ग्रामस्थांचे घरे पडली, काही घरांना तडे गेले अशा नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत.

  • 16 Apr 2026 10:57 AM (IST)

    जळगावच्या शेंदुर्णीत गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको; ग्राहकांचा संताप

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शेंदुर्णी येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीच्या वारंवार फेऱ्या मारूनही कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला होता. पहाटे चार-पाच वाजल्यापासून रांगेत ताटकळत उभ्या राहूनही सिलिंडर न मिळाल्याने हताश झालेल्या ग्राहकांनी रस्त्यावर रिकामे सिलिंडर आडवे टाकून वाहतूक रोखली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 16 Apr 2026 10:47 AM (IST)

    धर्मांतरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक

    नाशिक येथील टीसीएस कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणावरून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेत, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर ‘राष्ट्रद्रोहा’चे गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. “हिंदुस्थानमध्ये आम्ही अशा घटना खपवून घेणार नाही. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचे छुपे कनेक्शन शोधून काढण्याचे आवाहन यंत्रणांना केले आहे. या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्यांनीही आपल्या भूमिकेचा विचार करावा, असे सांगत गृहमंत्रालयाने स्वतःहून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या अन्यायाविरुद्ध आज काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाद्वारे भाजप प्रशासनावर दबाव निर्माण करत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

  • 16 Apr 2026 10:37 AM (IST)

    नाशिक टीसीएस प्रकरण, निदा खानचा दिल्ली ब्लास्ट कनेक्शनचा संशय

    नाशिक येथील टीसीएस कंपनीत समोर आलेल्या लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खानचा दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील आरोपी डॉक्टर शहीन याच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. निदा खान भिवंडी परिसरात लपून बसली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तिला पकडण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सखोल शोधमोहीम राबवत आहेत. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या गंभीर आरोपांची चौकशी आता विविध स्तरांवर सुरू असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संवेदनशील परिस्थितीत, नागरिकांनी निदा खान किंवा या प्रकरणाशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 16 Apr 2026 10:27 AM (IST)

    चांदिवलीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची तांत्रिक पडताळणी, देशातील पहिलीच ऐतिहासिक प्रक्रिया

    चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया आज १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील बोरीवली (पूर्व) येथे सुरू झाली आहे. माजी आमदार नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या मागणीनंतर, देशात पहिल्यांदाच ईव्हीएममधील बर्न मेमरी (Burnt Memory) आणि मायक्रो कंट्रोलर (Microcontroller) या घटकांची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या राजेंद्र नगर गोदामात सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे. यामध्ये यंत्रणेची सुरक्षितता आणि अचूकता तपासली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक दृढ करण्यासाठी उचलले गेलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. या तांत्रिक माहितीसाठी आमदार दिलीप लांडे यांचे वकील ॲडव्होकेट समाधान सुलाने यावेळी उपस्थित राहणार आहेत.

  • 16 Apr 2026 10:18 AM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा दौऱ्यावर, सेवाग्राम आश्रमाला भेट देणार

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आपल्या या दौऱ्यात राष्ट्रपती सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीला भेट देणार आहेत, त्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गांवरील वाहतूक २०-२० मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  • 16 Apr 2026 10:07 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ; हायकोर्टाच्या वकिलाची धारदार शस्त्राने हत्या

    छत्रपती संभाजीनगरमधील गांधेली फाट्याजवळ हायकोर्टातील वकील मिथुन भास्कर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. क्लायंटला भेटायला गेलेले असतानाच त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. घटनास्थळी संशयितांच्या दुचाकीचे ठसे उमटले आहेत, हा प्रकार लूटमारीतून घडला की त्यामागे काही नियोजित कट आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

  • 16 Apr 2026 09:50 AM (IST)

    कल्याणात शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून 47 लाखाची फसवणूक

    खडकपाडा पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधील बिकानेर येथून ठोकल्या बेड्या. रीगतमल शर्मा उर्फ लालचंद असे या आरोपीचे नाव असून याआधी देखील या प्रकरणी निकेश पटेल नावाच्या आरोपीला पोलिसांनी केले होते जेरबंद. सोशल मीडियातून संपर्क साधून विश्वास संपादन करून आरोपींनी केली होती फसवणूक. आणखी किती जणांना गंडा घातला याचा पोलिसांकडून तपास सुरू

  • 16 Apr 2026 09:40 AM (IST)

    आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून 11 दिवसात पर्दाफाश

    जळगावातील ७ लाखाची रोकड असलेले एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून ११ दिवसात पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून अजून तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. मोबीन मील्ला, अब्दुल नूर करीम अशी अटक करण्यात आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. चोरट्यांनी जळगावातील इक्विटास बँकेचे ७ लाखाची रोकड असलेले एटीएम मशीन चोरून नेले होते, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या टोळीने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सटाणा, जळगाव येथे लाखोंची रोकड असलेले एटीएम चोरून नेल्याची माहिती समोर

  • 16 Apr 2026 09:30 AM (IST)

    बसस्थानकात 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, हिंगोलीत खळबळ

    हिंगोली-बसस्थानक परिसरात 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा मृत्यू उष्माघाताने झाला असावा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ जिल्ह्याचे तापन 40° वर..

  • 16 Apr 2026 09:20 AM (IST)

    निलंबित ट्रॅफिक वॉर्डनला चेंन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक

    पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांची सोन साखळी हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेला आरोपी हा निलंबित ‘ट्रॅफिक वार्डन’ आहे. वाहतूक विभागातूनच चोरलेल्या गाडीचा वापर तो चोरी करण्यात साठी करत होता. सचिन चव्हाण असं सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्याच नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सचिन चव्हाण या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 16 Apr 2026 09:05 AM (IST)

    नाशिकच्या वृक्षतोडी चा मुद्दा पुन्हा गाजणार

    21 एप्रिलला तारखेला वृक्षतोडी विरोधात नाशिक मध्ये निघणार मोर्चा. मनसे जिल्हा सम्पर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा. तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडी ला करणार विरोध. या आधी अमित्त ठाकरे यांच्या उपस्थितीत निघाला होता पर्यावरण प्रेमीचा मोर्चा. वृक्षतोडी बरोबर गोदावरी सिमेंट काँक्रीट चा मुद्दाही उपस्थित करणार

  • 16 Apr 2026 08:58 AM (IST)

    हिंगोलीत उष्माघाताने मृत्यू का?

    हिंगोली बस्थानक परिसरात 30 वर्षीय व्यक्तीचा मृत देह आढळला. हा मृत्यू उष्माघाताने झाला असावा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तपमानात मोठी वाढ जिल्ह्याचे तापन 40° वर.

  • 16 Apr 2026 08:53 AM (IST)

    नाशिकच्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा गाजणार

    21 एप्रिलला तारखेला वृक्षतोडी विरोधात नाशिक मध्ये निघणार मोर्चा. मनसे जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा. तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला करणार विरोध. याआधी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत निघाला होता पर्यावरण प्रेमींचा मोर्चा. वृक्षतोडी बरोबर गोदावरी सिमेंट काँक्रीटचा मुद्दाही उपस्थित करणार.

  • 16 Apr 2026 08:36 AM (IST)

    धरणगावातअल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

    जळगावातील धरणगावात अल्पवयीन मुलीवर तरुणाने घरात घुसून केले अत्याचार.  तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या आरोपीने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत तसेच पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

  • 16 Apr 2026 08:30 AM (IST)

    दिंडोशी पोलिसांकडून भोंदू बाबाविरोधात एफआयआर दाखल

    दिंडोशी पोलिसांनी भोंदू बाबाविरोधात एफआयआर दाखल केला. सध्या दिंडोशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.  हा भोंदू बाबा उपचाराच्या नावाखाली दारूची बाटली आणि बोकडाचे काळीज मागायचा. दूरदूरहून लोक या बाबांकडे भूतबाधा उतरवण्यासाठी येतात. हे बाबा रात्री 6 ते 7 च्या सुमारास आपली झाडफुक सुरू करतात आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ती चालू ठेवतात. हा बाबा म्हणतो की देवी माझ्यात अवतरते आणि ज्यांना मुले नाहीत त्यांना मदत करण्याचा दावा करतो.या बाबाविरुद्ध अनेक तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

  • 16 Apr 2026 08:17 AM (IST)

    खरात प्रकरणात नवा मोठा खुलासा

    जमीन खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल उघड. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांची चौकशी. अशोक खरातच्या दोन बँक खात्यांमध्ये RTGS ने कोट्यवधींचे व्यवहार. आरोपींच्या खात्यांत मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार.शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा. अशोक खरात, पत्नी कल्पना खरातसह इतरांवर कारवाई. दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर. आर्थिक व्यवहारांची चौकशी.

  • 16 Apr 2026 08:16 AM (IST)

    नाशिक मध्ये आज हिंदू सकल समाजाचा मोर्चा

    TCS कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यलय पर्यंत निघणार मोर्चा. TCS कंपनीत घडलेल्या घटनेचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन. वेगवेगळ्या हिंदू संघटना मोर्चात होणार सहभागी. धर्मांतर आणि महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चा.

Published On - Apr 16,2026 8:15 AM

Follow Us
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.