Maharashtra News LIVE : डोंबिवली डॉक्टर मारहण: चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
Maharashtra News LIVE : नाशिक मध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. गोदा घाट परिसरात पाणी ओसरलं आहे. मात्र रामकुंडा गोदा घाट परिसरात पानवेली आणि कचरा वाहून आला आहे. पालिका प्रशासनाकडून पानवेली काढण्याचे काम सुरू आहे.

मागच्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. आज कुठेही पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि एक्स्प्रेस वे बाधित झाला होता. पावसामुळे राज्यातील विविध धरणांमध्येही पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळेही पावसाकडे लागले होते. आठ दिवस पडलेल्या पावसामुळे पुण्यात एक जुलै ते आठ जुलै दरम्यान 270 झाड पडण्याच्या घटना घडल्या. 20 ठिकाण पाणी शिरले आणि साचल्यांच्या घटना, तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना घडल्या. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने घट होत असल्याने काल रात्री खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6296 क्युसेक विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवली डॉक्टर मारहण: चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
डोंबिवलीतील शास्त्रीनंगर रुग्णालयात मारहाण प्रकरणातील चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपी रमेश म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी प्रमोद निकमवर साताऱ्यात हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. तिसऱ्या आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखळ आहेत. चौथा आरोपी रमेश पवारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
-
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत पडून एकाचा मृत्यू
पिंपरी चिंडवडमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. 27 तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 7 ते 8 जण अडकल्याची भीती असून त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.
-
-
भाजपा नेते विनोद तावडे यांनी घेतली खडसेंची भेट
भाजपा नेत विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यामुळे ते पुन्हा भाजपात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईत विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात चर्चा झाली.
-
राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभोत जोरदार राडा
राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभेत जोरदार राडा झाला. भास्कर जाधव यांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यात हमरीतुमरी झाली. उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री आहेत कुठे? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
-
रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याचे आदेश
डोंबिवली डॉक्टर मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे. पण प्रकृतीचं कारण देत कालच रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाले होते. कोर्टात आणत नाही तोपर्यंत निर्णय देणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याचा रमेश म्हात्रेंचा अर्ज फेटाळला.
-
-
अमेरिकेच्या दोन दिवसांच्या हल्ल्यात 14 ठार, 78 जखमी: इराण
इराणच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या दोन दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार झाले असून 78 जण जखमी झाले आहेत, असे वृत्तसंस्था एपीने म्हटले आहे.
-
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका
लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे पेरणी नंतर उगवलेलेच नाही. सोयाबीन बियाणांची पेरणी करून दहा ते पंधरा दिवस उलटले तरी उगवलेले नसल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
-
खेडच्या रघुवीर घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
पावसाने खेड मधील रघुवीर घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याे घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. रस्त्याची एक बाजू दरीत वाहून गेल्याने खेड येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
-
सरकारचे आमदारच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवताहेत – अंबादास दानवे
सरकारचे आमदारच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत. हे बरोबर नाही, धमक्या दिल्या जातात पोलिस काय करतात? सत्ताधारी या आमदारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे कायद्याचे बारा वाजले आहेत अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
-
उचलीचे घेतलेले पैसे परत न कल्याने उसतोड मजुराचे अपहरण
उचलीचे घेतलेले पैसे परत न केल्याने पाच ते सहा जणांनी ईरटीगा गाडीतून येत आपलं अपहरण केल्याचा आरोप बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथील देविदास भानुदास कापसे नामक ऊसतोड मजुराने केला आहे. अपहरण केल्यानंतर पाच दिवस विविध ठिकाणी फिरवले, कर्नाटक, बीडच्या मांजरसुंबा घाटात नेले आणि तेथुन शिरूर कासार परिसरात नेऊन एका पत्राच्या शेडमध्ये बेल्ट आणि वायरने बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोपही देविदास कापसे यांनी केला आहे.
-
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे पुण्यनगरीत आगमन
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन
मोठ्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यात झाले सहभागी
ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पालखी पुण्यनगरीत दाखल
पुण्यनगरीत भक्तीमय वातावरण
-
जळगावच्या धरणगाव येथील तालुका क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था
जळगावच्या धरणगाव येथील तालुका क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था
दोन वर्षापासून क्रीडा संकुलावरील पत्रे उडाली, साहित्यही तुटले
पत्रे उडून गेल्याने पावसाच्या पाण्यामुळे आतील मैदानासह, क्रीडा साहित्याचे नुकसान
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 805 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे सोन्या चांदीच्या घरात सतत चढ उतार सुरूच आहेत.
-
कसारा : घाटणदेवी मंदिर ते विहिगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
कसारा घाटाचा पर्यायी मार्ग असलेल्या घाटणदेवी मंदिर ते विहिगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. कसारा घाटात काही अपघात व आपत्ती झाल्यास याच मार्गावरून वाहतूक वळविण्यात येते. मात्र सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चार दिवसात झालेल्या पावसाने रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे.
-
अभिनेता अरबाज शेखने तो व्हिडिओ केला डिलिट
सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलच्या लुटीबाबत सोशल माध्यमावर तक्रार केल्यानंतर अरबाज शेख याने पुन्हा एकदा समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी खाजगी हॉस्पिटल मधील संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता, मात्र त्यानंतर असंख्य फोन मेसेज येत असल्यामुळे व्हिडिओ डिलीट केल्याची माहिती अरबाज शेखने दिली आहे. माझे वडील आणि कुटुंब याकडे लक्ष देणे मला जास्त गरजेचे वाटते त्यामुळे हा माझा विषय इथेच संपवत आहे.
-
नाशिक : ठाकरे सेनेचे पदाधिकारी आयुक्त कार्यालयात दाखल
नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात ठाकरे सेनेचे पदाधिकारी दाखल झाले आहेत. पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची वाट लागली त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ठाकरे सेनेकडून केली जाणार आहे.
-
शरद पवारांनी कुणाला भेटावं हे ठाकरे, राऊत सांगणार का?- शिरसाट
शरद पवारांनी कुणाला भेटावं हे ठाकरे, राऊत सांगणार का? शरद पवार राजकीय संस्कृती जपतात. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचे चांगले संबंध- शिरसाट
-
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पोमगावमध्ये गोशाळेवर दरड कोसळली
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पोमगावमध्ये गोशाळेवर दरड कोसळली. दरड कोसळून जवळपास 8 ते 10 जनावरे दगावली. दरडी खाली दबलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. गोशाळेत 150च्या आसपास जनावरे असून इतर जनावरे सुरक्षित असल्याची माहिती
-
अंधेरी-चांदीवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद
अंधेरी-चांदीवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद. इंग्रजी स्पिंकिंग क्सासेसविरोधात मनसे आक्रमक. ‘मराठी बोलणार नाही’, इग्लिंश अकॅडमी संचालकाने मनसे पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तर दिल्याचा आरोप. अकॅडमीचा बोर्डही केवळ इंग्रजीतच लावण्यात आला होता. मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह अकॅडमीत धडक देत संचालकांना जाब विचारला.
-
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. नगरसेवक रमेश म्हात्रेला आज कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल. डॉक्टर मारहाण प्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप
-
आदिवासी भागातील येथील ग्रामस्थानी स्वखर्चाने बनवला रस्ता
इगतपुरीतील कथरुवंगण या आदिवासी भागातील येथील ग्रामस्थानी स्वखर्चाने रस्ता तयार केला. चार वर्षापासून रस्त्याचे काम रखडल्याने 75 हजार रुपये वर्गणी काढून रस्ता तयार केला. पावसाळ्यात एखादा व्यक्ती घसरला तर टेकडीवरून खाली घसरत येत असे. वारंवार आमदार, अधिकारी कंत्राटदार यांना भेटूनही काही उपयोग न झाल्याने निर्णय घेतला. मिळणाऱ्या रोजंदारीच्या पैशाने वर्गणी काढून रस्ता तयार करण्याची वेळ आली आहे. मला मागील बिल न मिळाल्याने पुढचे काम करू शकत नाही असे ठेकेदाराने उत्तर दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-
तापी पुलावर धावत्या कारला आग लागली
जळगाव तालुक्यातील विदगावजवळ तापी नदीच्या पुलावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कारमध्ये चालक, एक महिला आणि एक चिमुकली प्रसंगावधान राखत सर्वांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
-
पालखी मार्गावर महिलेचा राडा आधी रस्त्यावर झोपली;मग थेट बॅरिगेट उडवले
आळंदी पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीक ठिकाणी नाकाबंदी तसेच मार्ग बंद करण्यात आले होते. यावेळी आळंदी येथील पीसीएस चौकात ड्रायव्हिंग स्कूल चालक महिलेने पोलिसांसोबत हुज्जत घातली. सोडणार नसेल तर रस्ता अडवणार असे म्हणत थेट रस्त्यावर झोपली. मात्र पालखी मार्गावर सोडण्याची परवानगी नसल्याचे सांगितले असता महिलेने थेट बॅरिकेट उडवून गाडी पुढे नेली. आळंदी पोलीस या घटनेची तसेच संबंधित गाडीची माहिती घेत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
-
धुळ्यात शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा
टीईटी परीक्षा सक्ती रद्द करावी, संच मान्यता जीआर तात्का बदला,बीएलओ चे काम इतर कर्मचाऱ्यांकडे द्यावे,आदी मागण्यासाठी प्राथमिक शाळा,महानगरपालिका ,जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान जिल्ह्यातील १०८८ शाळा बंद असल्याचा दावा करण्यात आला. शहरातील कल्याण भावना पासून प्रमुख मार्गावरून जात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
-
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीतील मगरी बाहेर
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदी पात्रात वास्तव्यास असलेल्या मगरी बाहेर पडल्या आहेत. नदी काठच्या शेतामध्ये मगरी नी आपला मुक्काम केला आहे. पलूस तालुक्यातील अमनापूर येते एका शेतात मगरीने आपले वास्तव केले आहे. तर नदी कडे पाहून आपला भला मोठा तोंडाचा जबडा काडून बसलेले व्हिडीओ शेतकऱ्यांन आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे.
-
म्हात्रेला बरखास्त करून धिंड काढा- आदित्य ठाकरे
डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बरखास्त करून त्यांची धिंड काढली पाहिजे अशी मोठी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. डॉक्टरांना मारहाण झाली, गृहखातं त्यांना न्याय देणार का? असा सवालही त्यांनी केला.
-
ठाणे सिविल रुग्णालयात रमेश म्हात्रे विरोधात डॉक्टरांचे आंदोलन
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे ज्या सिव्हिल रुग्णांमध्ये उपचार घेत आहेत त्याच ठिकाणी डॉक्टर आणि नर्स कर्मचाऱ्यांनी रमेश म्हात्रे यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन केले यावेळी डॉक्टरांनी मात्र यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे
-
मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा डांबरी रस्ता अन् झाडे गेली वाहून; वारणा नदीच्या पुराचा तडाखा
सांगली जिल्ह्यातील वारणा नदी अजूनही दुथडी भरून वाहत असून पुराचा फटका आता नदीकाठच्या रस्त्यांनाही बसू लागला आहे. मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता आणि अनेक झाडे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून राज्यव्यापी शाळा बंद करत धरणे आंदोलन
नाशिक – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून राज्यव्यापी शाळा बंद करत धरणे आंदोलन सुरू आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यासमोर हे आंदोलन केलं जात आहे. शिक्षक संघटना समन्वय समितीकडून कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी अट रद्द करा, शिक्षकांना बीएलओ आणि एसआरए यांसारखी अशैक्षणिक कामं देणं याविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. गोल्फ क्लब मैदानापासून निघालेला शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय समोर दाखल झाला आहे.
-
भाजपचा आमदार लोक मेल्यावर हसतो, भावनाशून्य आहेत- राज ठाकरे
“झाडची झाडं काढली जात आहे. जंगलं नष्ट केली जात आहे. लोकांना राग येत नाही. लोक राग व्यक्त करत नाही. मोबाईलवर व्यक्त करतात आणि झालं. तो राग मतदानात दिसत नाही. नेमकं काय हवंय, कुणाची सत्ता आहे, कुणाची नाही.. काही घेणं देणं नाही. भाजपचा आमदार लोक मेल्यावर हसतो, भावनाशून्य आहे. तुम्हाला किंमत नाही,” असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे.
-
या देशात काय चाललंय, कुणाच्या कामाबद्दल कोण बोलतंय, काही सांगता येत नाही- राज ठाकरे
“नितीन गडकरी हे ट्रान्सपोर्ट मंत्री आहेत. पण पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घातलं पाहिजे, यावर ते बोलतात. त्यावर पेट्रोलियम मंत्री बोलतील. ते ब्र शब्द काढत नाही आणि हे त्यावर प्रवचन देतात. कुणाच्या कामाचं कोण बोलतंय, काय चाललंय या देशात, काही सांगता येत नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी गडकरींवर केली आहे.
-
तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक, इतरांचं असल्यावर राजकारण?- राज ठाकरे
“मिसिंग लिंकचं झालं. भाजपचे लोक म्हणतात, ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा.. तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाहीत. उद्या कुणी असं केलं तर, ही नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. झाड पडून मुलगा जातो, माणूस जातो, मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक. इतरांचं असल्यावर राजकारण करणार. मिसिंग लिंकवर नशीब माणसं नाही मेली,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
-
दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता? त्यावेळी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं का?- राज ठाकरे
“मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी गळतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वाहा, त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता? दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता? त्यावेळी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं का? स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण? असं कसं होईल,” अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
-
राज्यात मोबाईल उचलल्यावर जे मराठीत ऐकायला मिळतं, ते मनसेच्या आंदोलनामुळेच- राज ठाकरे
“महाराष्ट्रात मोबाईल उचलल्यावर जे मराठीत ऐकायला येतं. ते मनसेच्या आंदोलनानंतर सुरू झालं. तोपर्यंत मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी होतं. भाषा वाईट नसते. पण आमच्यावर लादलं जातं. कारण आमचे लोक चिडत नाहीत. आंदोलन करत नाहीत. राग व्यक्त केला तर मोबाईलवर करतात,” असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
-
माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सर्व बांधकामं बंद करा- राज ठाकरे
“माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सर्व बांधकामं बंद करा. फ्लाय ओव्हर ब्रिजेस म्हणजे विकास नाही. ही लोकं परदेशात जाऊन काय करतात, ते आजवर समजलेलं नाही. तिथली शहरं बघा. इथे इमारतींची कशीही बांधकामं होत आहेत. 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि त्याचा पिलर पडला,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
कामगारसेनेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी सरकारवर साधला निशाणा
राम मंदिराच्या चोरीवर बोल्याने धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरीला गेले यावर बोलायचे नाही? राम मंदिराच्या ट्रस्टी भाजपचेच आणि आरोप करणारे पण तेच.
-
गोंदे ते घाटणदेवी मंदिर पर्यंत महामार्गावर असलेले खड्डे आले बुजविण्यात
गोंदे ते घाटणदेवी मंदिर पर्यंत महामार्गावर असलेले खड्डे आले बुजविण्यात. मात्र पाडळी, गोंदे, बोरटेंभे, मुंढेगाव परिसरात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे व चुकीच्या डायवर्जन मुळे होतेय वाहतूक कोंडी. रोज छोट्यामोठ्या प्रमाणात अपघातांना निमंत्रण.
-
कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी पुन्हा धोकादायक
कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी पुन्हा धोकादायक! टेकडी खचली, भिंत कोसळली टेकडीवरून मलबाथेट रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत. कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी परिसरात पुन्हा दरडसदृश्य मलबा कोसळल्याने पत्रीपुलजवळील उर्दू शाळेच्या मागील बाजूस असलेल्या घराची भिंत ढासळली. घटनेत घराचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. टेकडीवरून मोठ्या प्रमाणात मलबा रस्त्यावर आल्याने परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच KDMC चे आपत्ती व्यवस्थापन व संबंधित विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले
-
धाराशिव जिल्ह्यात भेसळ युक्त दूध पावडर विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा परदाफाश
धाराशिव जिल्ह्यात भेसळ युक्त दूध पावडर विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा परदाफाश. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून भूम येथे भेसळ युक्त दूध पावडर विकणाऱ्या मोरक्यावर एफडीएची धडक कारवाई. भेसळयुक्त दूध पावडर विक्रेता बाळासाहेब गोडगे याच्यासह 4 जणांवरती भूम पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हा दाखल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना. भूममध्ये एफडीएच्या कारवाईत 61 बॅक पावडर केली जप्त. आरोपी बाळासाहेब गोडगे भूम परिसरातील अनेक दूध डेअरींना भेसळयुक्त दूध करायचा सप्लाय. दूध पावडर भेसळ रॅकेटमध्ये परिसरातील अनेक दूध संकलन केंद्रांचा समावेश
-
सैराट फेम अरबाज शेखच्या नोबल हॉस्पिटलवरील आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटल मध्ये दाखल
सैराट फेम अरबाज शेखच्या नोबल हॉस्पिटलवरील आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटल मध्ये दाखल. मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचे मेडिकल सील करण्याचे आदेश. अन्न औषध प्रशासनाकडून हॉस्पिटल मधील मेडिकलची तपासणी करण्यात आली. मेडिकलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने आम्ही कारवाई करतोय. प्रिस्क्रिप्शन मध्ये कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आशा अनेक त्रुटी आढळल्या आहेत त्यामुळे आम्ही मेडिकल सील करणार आहोत.
-
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवरील जुन्या पुलाला जलपर्णीचा विळखा
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवरील जुन्या पुलाला जलपर्णीचा विळखा. पुराच्या पाण्यासोबत आलेली जलपर्णी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात अडकली. पाण्याचा फुगवटा वाढल्याने जुन्या पुलाला संभाव्य धोका. जुन्या पुलावरील एका ठिकाणचे कठडे तुटल्याचे निदर्शनास. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने जलपर्णी हटवावी; नागरिकांसह वाहनधारकांची मागणी…
-
कल्याण – नेतीवली टेकडी पुन्हा धोकादायक, मलबा थेट रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत
कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी पुन्हा धोकादायक झाली आहे. नेतीवली टेकडी परिसरात पुन्हा दरडसदृश्य मलबा कोसळल्याने पत्रीपुलजवळील उर्दू शाळेच्या मागील बाजूस असलेल्या घराची भिंत ढासळली. घटनेत घराचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
-
सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार या फडणवीसांची भेट घेत आहेत. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या भेटी दरम्यान राजकीय चर्चा काय होते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
-
‘झाडे वाचवा’ आंदोलनासाठी मनसे आज रस्त्यावर
ठाणे – पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याची घटना समोर आली असून अनेक जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर झाडांसंदर्भात मनसेचं अनोख आंदोलन सुरू असून ‘झाडे वाचवा’ आंदोलनासाठी मनसे रस्त्यावर उतरली आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठाण्यात मनसे आक्रमक झाली असून पर्यावरण रक्षणासाठी आज ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तसेच ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हरिनिवास सर्कल येथे आंदोलन होणार.
-
शरद पवार- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून संजय राऊत नाराज
शरद पवार – एकनाथ शिंदे यांची काल दालनातील भेट झाली, मात्र त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष चोरणाऱ्यांसोबत जाणं किंवा भेटणं आम्हाला मान्य नाही, असं राऊत म्हणाले.
-
दिलासादायक! नाशिकचं गंगापूर धरण 70 टक्के भरलं
नाशिकच्या दारणा धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर भावली धरण 87 टक्के भरल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर अनेक धरणांतील पाणीसाठाही 50 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. नाशिकचं गंगापूर धरण 70 टक्के भरलं आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर मुसळधार पाऊस झालाय. नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांतील एकूण पाणीसाठा ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
-
विधानभवनासमोर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेचं आंदोलन
विधानभवनासमोर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोल सुरू आहे. आंदोलकांनी कापूस फेकला. या आंदोलनामुळे तणाव वाढल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर धान्य देखील फेकले.
-
पुण्याच्या गुरववाडी गोशाळेवर दरड कोसळली, आठ ते दहा जनावरे दगावली
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पोमगाव श्री राधा चैतन्य गोशाळा गुरववाडी येथे गोशाळेवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास आठ ते दहा जनावरे दगावली आहेत. दरडीखाली दबलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलंय. या गोशाळेत दिडशेच्या आसपास जनावरे आहेत. घटनेत इतर जनावरांना काहीही झालेलं नाही. सुदैवाने इतर जनावर यातून बचावली आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती मिळतेय.
-
अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग..
नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग… गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ…नदीकाठावर चरणाऱ्या पाच ते सहा गाई पुराच्या पाण्यात वाहून गेल्या… खानगाव थडी पुलाजवळ एक गाय नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढली… उर्वरित गाई काही अंतरावर नदीकाठी स्वतःहून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती…
-
पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली
अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली. नांदगाव नदीत पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. पुन्हा एकदा अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
-
नांदूर मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही विसर्ग सुरू
13,407 क्यूसेकने गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या च्या दिशेने पाण्याचा विसर्ग. गेल्या तीन दिवसांत 3.94 टीएमसी पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास होणार मदत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा…
-
हतनूर – रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका, वयोवृद्ध रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ
छत्रपती संभाजीनगरच्या हतनूर – रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका, वयोवृद्ध रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रकार. चिखलमय रस्त्यामुळे डॉक्टर अर्ध्या वाटेतच थांबले; 3 किमी बैलगाडीतून रुग्ण डॉक्टरांपर्यंत रस्ता मंजूर तरी काम रखडले, ग्रामीण भागातील रस्त्याचे विदारक वास्तव पुन्हा समोर
-
आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान
आळंदीच्या पवित्र नगरीतून आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात अवघी आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
-
मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग
नांदूर, मधमेश्वर धरणातून सलग चौथ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 13,407 क्यूसेकने गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत 3.94 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास होणार मदत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा.
-
अवैध मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची छापेमारी,1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त
भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ दाभाडी येथे एका हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अचानक छापेमारी केली.यावेळी या पथकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी मध्याचा अवैध साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी दोन जणांवर राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लाख 23 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला.
-
अमरावतीत सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही उगवले नाही
अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही दहा दिवसापासून उगवलेच नाही. अमरावती, तिवसा,नांदगाव खंडेश्वर, मोर्शी , चांदुर रेल्वे तालुक्यात बियाणे उगवल्या नसल्याच्या तक्रारी. आतापर्यंत कृषी विभागाकडे 200 च्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने यांची माहिती. एसडीओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून पंचनामे सुरू केले आहेत आणि बियाणांचे नमुने तपासणी करिता पाठवले आहेत, कृषी विभागाची माहिती. तपासणी अहवाल आल्यावर पुढील कारवाई दिशा ठरवली जाईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करणार.
-
परळी प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची NSG कडून रेखी
परळी प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डकडून सुरक्षे संदर्भात रेखी. नॅशनल गार्डचे पथक येथे आले होते, त्या पथकाने मंदिराची संपूर्ण पाहणी केली. हे वैद्यनाथ मंदिर स्थळ अतिरिकेच्या लिस्टवर आहे. त्या दृष्टीने भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने त्यांना येथे पाहणी करण्यासाठी पाठवले होते.
-
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस सुरूच आहे.सलग सहाव्या दिवशी चांदोली धरण पाणलोट अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 81 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ झाली आहे. 34 .40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात आता 19.52 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.यामुळे धरण जवळपास 57 टक्के इतके भरले असून धरणामध्ये 18 हजार 900 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे.
-
कोयना धरणात पाणीसाठा वाढला
कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 59.75 टीएमसी. कोयना धरणात 89510 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात, कोयनानगर 151 मिलिमीटर, नवजा 192 मिलिमीटर आणि महाबळेश्वर मध्ये 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
-
हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा धक्का
हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांना भूकंपाचा धक्का जाणवलाय. यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. या भूकंपाची 4.2 रिक्टरस्केल एवढी भूमापक केंद्रात नोंद झालीये. नांदेड मध्ये जमीन कंप पावल्याचे दृश्य सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मागच्या काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिक भयभीत आहेत.
Published On - Jul 09,2026 8:17 AM
