BMC Election Results 2026 LIVE : B वॉर्डात कोणाचे वर्चस्व? काँग्रेसचा गड राहणार की शिवसेना-भाजप बाजी मारणार?
Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिकेच्या B वॉर्डातील प्रभाग २२३ आणि २२४ मधील निवडणूक चुरशीची ठरली आहे. उमरखाडी, पायधूनी आणि वाडीबंदर भागातील राजकीय समीकरणे आणि निकालाचे सविस्तर विश्लेषण

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. मुंबई महापालिकेच्या B वॉर्डातील प्रभाग क्रमांक 223 आणि 224 मध्ये राजकीय सत्तासंघर्षाचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. दक्षिण मुंबईचा महत्त्वाचा भाग असलेल्या या दोन्ही प्रभागांमध्ये व्यापारी उलाढाल आणि दाट लोकवस्तीचे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत या दोन्ही जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र बदललेली राजकीय समीकरणे पाहता यावेळी शिवसेना आणि भाजप या दोघांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. उमरखाडी, वाडीबंदर, मांडवी आणि पायधूनी यांसारख्या मोक्याच्या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागांमध्ये स्थानिक विकासकामे, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नागरी सुविधा हेच निर्णायक मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही प्रभागांमध्ये मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यंदाच्या चुरशीच्या लढतीत प्रस्थापित उमेदवारांना आपल्या गड राखण्यात यश आले की नव्या चेहऱ्यांनी बाजी मारली, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 223 | ||
| 224 |
प्रभाग 223 : मुंबईतील प्रभाग क्रमांक 223 हा प्रामुख्याने उमरखाडी, दानाबंदर आणि वाडीबंदर सारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक आणि निवासी भागांनी व्यापलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या सुमारे 63,045 इतकी आहे. येथे बंदर विभागातील (पोटर्स) आणि व्यापाराशी संबंधित कामगारांची मोठी वस्ती आहे. प्रिन्सेस डॉक्स आणि प्रसिद्ध भाऊचा धक्का (फिशरी टर्मिनल) याच प्रभागात येते. त्यामुळे मासेमारी आणि जलवाहतुकीशी संबंधित गोष्टी या भागात मोठ्या प्रमाणात चालतात. हा भाग ऐतिहासिकदृष्ट्या जुन्या मुंबईचा भाग असून येथे दाटीवाटीच्या वस्त्या आणि जुन्या इमारतींचे प्रमाण अधिक आहे. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) साठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत येथे काँग्रेसच्या निकिता निकम यांनी विजय मिळवला होता.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग 224 : हा B वॉर्डमधील दुसरा अत्यंत गजबजलेला भाग असून यात मांडवी, पायधूनी, व्हिक्टोरिया डॉक्स आणि बंगालपुरा या परिसरांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 64,245 इतकी आहे. हा भाग प्रामुख्याने व्यापार आणि दाट लोकवस्तीसाठी ओळखला जातो. पायधूनी सारखा ऐतिहासिक बाजारपेठेचा भाग आणि कोळीवाड्याचा काही हिस्सा या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. वाहतूक कोंडी आणि जुन्या पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन हे येथील मुख्य प्रश्न आहेत. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या आफरीन शेख यांनी येथे बाजी मारली होती. येथे शिवसेना आणि भाजपचेही मोठे अस्तित्व असून निवडणूक चुरशीची ठरु शकते.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
