BMC Election Results 2026 LIVE : मलबार हिल ते गिरगाव… D वॉर्डात कुणाचे वर्चस्व? दिग्गजांची धडधड वाढली
Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत D वॉर्डातील प्रभाग 214 ते 219 मधील हाय-प्रोफाईल लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मलबार हिल आणि गिरगावमधील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदारांचा कौल कोणाकडे आहे ते पहा.

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत D वॉर्डातील प्रभाग 214 ते 219 कडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते. या प्रभागातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या प्रभागात मलबार हिल, ताडदेव आणि गिरगाव यांसारख्या हाय-प्रोफाईल भागांचा समावेश होतो. या प्रभागात वर्चस्व राखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. या वॉर्डात राजभवन, कमला नेहरू पार्क, महालक्ष्मी मंदिर आणि गिरगावचा पारंपरिक मराठी भाषिक असल्याने याठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. या वॉर्डातील अनेक जागा महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने यंदा अनेक दिग्गज नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 214 | ||
| 215 | ||
| 216 | ||
| 217 | ||
| 218 | ||
| 219 |
प्रभाग 214 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60,236 इतकी आहे. यात प्रामुख्याने गोवालिया टँक, जनता नगर, महालक्ष्मी मंदिर, जसलोक हॉस्पिटल आणि ताडदेव यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या अजय पाटील यांनी येथून विजय मिळवला होता.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग 215 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 53,084 इतकी आहे. यात प्रामुख्याने वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब, R.T.O, चिखलवाडी, भाटिया हॉस्पिटल, तुळशीवाडी, बने कंपाउंड आणि तालमीकवाडी या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 216 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 59,265 इतकी आहे. यात प्रामुख्याने नवजीवन सोसायटी, B.I.T. चाळी आणि दलाल इस्टेट या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो. हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजेंद्र नरवणकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 217 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57,385 इतकी आहे. यात प्रामुख्याने पपनसवाडी, शापुरबाग, ऑगस्ट क्रांती मार्ग, गावदेवी आणि गिरगाव चौपाटी या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या मिनल पटेल यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 218 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 56,993 इतकी आहे. यात प्रामुख्याने सिक्कानगर, मंगलवाडी, क्रांतीनगर, ऑपेरा हाऊस, मफतलाल तरण तलाव, चौपाटी आणि गायवाडी यांसारख्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या अनुराधा पोतदार यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 219 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 59,903 इतकी आहे. यात प्रामुख्याने सिमला नगर, हैदराबाद इस्टेट, कमला नेहरू पार्क, राजभवन, तीन बत्ती आणि मलबार हिल या उच्चभ्रू परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या ज्योत्स्ना मेहता यांनी येथून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
