BMC Election Results 2026 LIVE : गोवंडी-अणुशक्तीनगरचा किंग कोण? 134 ते 148 प्रभागाचा संपूर्ण निकाल
Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या एम-पूर्व (M/E) वॉर्डाचे सविस्तर निकाल पहा. प्रभाग क्रमांक १३४ ते १४८ मधील विजयी उमेदवार, शिवाजीनगर, मानखुर्द आणि गोवंडी येथील राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स जाणून

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एम-पूर्व (M/E) वॉर्डाचा निकाल आज जाहीर होत आहे. या वॉर्डमध्ये 134 ते 148 असे एकूण 15 प्रभाग येतात. या पट्ट्यात शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी आणि अणुशक्तीनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली. बदललेली प्रभाग रचना, लोकसंख्येचे नवे निकष आणि आरक्षणाच्या बदललेल्या समीकरणांमुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना आपला प्रभाग बदलावा लागला, तर काहींना अस्तित्वाची लढाई लढावी लागली. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 134 ते 148 मधील विजयी उमेदवारांची नावे
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 134 | ||
| 135 | ||
| 136 | ||
| 137 | ||
| 138 | ||
| 139 | ||
| 140 | ||
| 141 | ||
| 142 | ||
| 143 | ||
| 144 | ||
| 145 | ||
| 146 | ||
| 147 | ||
| 148 |
प्रभाग क्र. 134 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51,465 इतकी आहे. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे. यात रफिकनगर, इंदिरानगर, कमलानगर आणि शिवाजीनगर बस डेपोचा समावेश होतो. मागील निवडणुकीत येथून समाजवादी पक्षाच्या सायरा खान या प्रभागातून विजयी झाल्या होत्या.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्र. 135 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57,874 इतकी आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी राखीव आहे. यात रमाबाईनगर, मोहिते पाटील नगर, चिकूवाडी आणि मंडाला या प्रमुख वस्त्या येतात. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या समिक्षा साखरे यांनी या प्रभागातून विजय मिळवला होता.
प्रभाग क्र. 136 : या प्रभागात एकूण 56,054 नागरिक वास्तव्यास आहेत. यंदा या प्रभागाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) असे निश्चित झाले आहे. आदसानगर फेज 2 आणि शिवाजीनगर टर्मिनसचा समावेश असलेल्या या भागात मागील वेळी समाजवादी पक्षाच्या रुखसाना सिद्धीकी यांनी बाजी मारली होती.
प्रभाग क्र. 137 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51,738 आहे. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) या गटासाठी आरक्षित आहे. यात शिवाजीनगर आणि नूर-ए-इलाही मस्जिद परिसराचा समावेश होतो. मागील वेळी समाजवादी पक्षाच्या आयेशा शेख यांनी येथून मोठा विजय मिळवला होता.
प्रभाग क्र. 138 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 52,262 इतकी आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी राखीव आहे. रमण मामा नगर, मेट्रो हॉस्पिटल आणि शिवाजीनगर हॉस्पिटलचा परिसर असलेल्या या भागात मागील वेळी समाजवादी पक्षाच्या आयेशा खान विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्र. 139 : हा प्रभाग संपूर्ण वॉर्डातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागात 60,011 लोकसंख्या आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. नटवर पारेख कंपाऊंड, लोटस कॉलनी आणि म्हाडा कॉलनीचा यात समावेश होतो. मागील वेळी समाजवादी पक्षाचे अब्दुल कुरैशी येथून निवडून आले होते.
प्रभाग क्र. 140 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57,268 आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गौतमनगर, टाटानगर आणि देवनार स्लॉटर हाऊस या भागांचा यात समावेश होतो. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादिया शेख यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग क्र. 141 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57,417 इतकी आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. अण्णाभाऊ साठे नगर आणि झाकीर हुसेन नगर या वस्त्यांचा यात समावेश होतो. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांनी येथे बाजी मारली होती.
प्रभाग क्र. 142 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 54,563 इतकी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. लल्लूभाई कंपाऊंड, पी.एम.जी. कॉलनी आणि लाले आमीरचंद कॉम्प्लेक्सचा यात समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या वैशाली शेवाळे येथून विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्र. 143 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51,412 इतकी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला या आरक्षणाखाली येतो. महाराष्ट्र नगर आणि चिता कॅम्पमधील काही सेक्टरचा यात समावेश होतो. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा तारी येथून निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्र. 144 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50,326 आहे. हा प्रभाग सर्वसाधारण (Open) गटासाठी निश्चित करण्यात आला आहे. यात देवनार व्हिलेज, मानखुर्द गाव, टेलिकॉम फॅक्टरी कॉलनी आणि अमरनगरचा यात समावेश होतो. मागील वेळी भाजपच्या अनिता पांचाळ यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग क्र. 145 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 53,213 इतकी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण (Open) प्रवर्गात ठेवण्यात आला आहे. या प्रभागात चिता कॅम्प उर्वरित सेक्टर, ट्रॉम्बे कोळीवाडा, दत्तनगर आणि शहाजीनगरचा समावेश होतो. मागील निवडणुकीत MIM चे शहनवाज शेख येथून निवडून आले होते.
प्रभाग क्र. 146 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 54,394 आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गासाठी राखीव आहे. यात अणुशक्तीनगर, वाडवली गाव आणि बी.ए.आर.सी. (BARC) परिसराचा समावेश होतो. गेल्या वेळी शिवसेनेच्या समृद्धी काते येथून विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्र. 147 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 54,166 इतकी नोंदवण्यात आली आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती महिला (SC Women) या गटासाठी आरक्षित आहे. टाटा कॉलनी, आर.सी.एफ. कॉलनी, बी.पी.सी.एल. कॉलनी आणि अयोध्या नगरचा यात समावेश होतो. मागील वेळी शिवसेनेच्या अंजली नाईक येथून विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्र. 148 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 52,380 आहे. हा प्रभाग सर्वसाधारण (Open) गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. या प्रभागात एच.पी. नगर, भारतनगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी आणि काळाचौकी परिसराचा यात समावेश होतो. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या निधी शिंदे यांनी येथून विजय संपादन केला होता.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
