AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashatra News Live : वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी

| Edited By: | Updated on: Oct 03, 2025 | 8:15 PM
Share

Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून वैचारिक सोनं लुटतानाच विखारी टीका काल झाली. कालच्या दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकमेकांवर टीका करण्यात आली. अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी भरीव मदतीची मागणी करत आहे. निकषाचे नियम न लावण्याची मागणी करण्यात येत आहे. तर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ऑक्टोबर हिटची तीव्रता तर रात्री आणि सकाळी थंडीची चाहुल लागली आहे. काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Oct 2025 06:57 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

    वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी

    आर्वी तालुक्यातही जोरदार पाऊस

    काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

    जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम

  • 03 Oct 2025 06:55 PM (IST)

    सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग

    सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग

    तुळजाई असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या केमिकल कंपनीचं नाव

    सर्व कामगारांची सुखरूप सुटका, मोठी दुर्घटना टळली

    कंपनीत मोठ्याप्रमाणात स्फ़ोटाचे आवाज, परिसरात भीतीचं वातावरण

  • 03 Oct 2025 06:53 PM (IST)

    शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले, बचाव कार्य सुरू

    शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले

    तिघांचे मृतदेह सापडले, तर तिघांना वाचवण्यात यश

    दोन पर्यटकांचा शोध सुरू

    सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती

  • 03 Oct 2025 06:45 PM (IST)

    वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी

    वर्धा

    – वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी

    – आर्वी तालुक्यातही जोरदार पाऊस

    – काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

    – आधीच येलो मोजक आणि रोगांच्या प्रादुर्भावने सोयाबीनचे नुकसान

    – पावसामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता

    – जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम

  • 03 Oct 2025 06:30 PM (IST)

    शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले

    सिंधुदुर्ग : शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले.

    तिघांचे मृतदेह सापडले, तर तिघांना वाचवण्यात यश. इतर पर्यटकांचा शोध सुरू.

    सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती.

    शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरू.

  • 03 Oct 2025 05:16 PM (IST)

    अभिनेते सयाजी शिंदे ‘सखाराम बाईंडर’ नाटकात पुन्हा दिसणार

    नवी दिल्ली –

    अभिनेते सयाजी शिंदे ‘सखाराम बाईंडर’ नाटकात पुन्हा दिसणार

    नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग यंदा राजधानी नवी दिल्लीत होणार

    उद्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता दिल्लीत रंगणार नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग

  • 03 Oct 2025 04:57 PM (IST)

    पाकिस्तानी सैन्य निष्पाप लोकांवर क्रूर कृत्य करत आहे: परराष्ट्र मंत्रालय

    परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, “पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात निदर्शने झाल्याचे वृत्त आम्हाला मिळाले आहे, ज्यात पाकिस्तानी सैन्याकडून निष्पाप नागरिकांवर क्रूरता देखील समाविष्ट आहे. पाकिस्तानला त्याच्या भयानक मानवी हक्क उल्लंघनांसाठी जबाबदार धरले पाहिजे.”

  • 03 Oct 2025 04:39 PM (IST)

    राहुल गांधींना भारताचे डिजिटल परिवर्तन दिसत नाही: सुधांशू त्रिवेदी

    राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींची परदेशात भारतविरोधी विधाने चिंताजनक आहेत. चॅथम हाऊसमधील त्यांचे भाषण महात्मा गांधींच्या आदर्शांच्या विरोधात आहे आणि भारताच्या जलद आर्थिक आणि डिजिटल प्रगतीकडे दुर्लक्ष करते. सुधांशू त्रिवेदी यांनी या विधानांना देशविरोधी शक्तींचे शस्त्र म्हणून वर्णन केले, जे काँग्रेस पक्षाच्या पतनाचे प्रतिबिंब आहे आणि देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे.

  • 03 Oct 2025 04:23 PM (IST)

    जम्मू काश्मीर गुलमर्गमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी

    जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील गुलमर्गच्या वरच्या भागात हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.

  • 03 Oct 2025 04:07 PM (IST)

    12 चौकार आणि 2 षटकार मारत ध्रुव जुरेलचं झंझावाती शतक

    वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलनंतर ध्रुव जुरेलने शतक ठोकलं आहे. त्याने 190 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकार आणि 2 षटकारांसह शतकी खेळी केली.

  • 03 Oct 2025 03:52 PM (IST)

    इचलकरंजी: बेकायदेशीर गॅस भरणाऱ्या घरावर पुरवठा अधिकाऱ्यांचा छापा

    इचलकरंजी शहरातील राजेश्वरी नगरमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस भरणाऱ्या अनिल गायकवाड यांच्या घरावर पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी छापा टाकला. यावेळी चार सिलेंडर एक मोटर व एक इलेक्ट्रिक वजन काटा या साहित्यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 03 Oct 2025 03:42 PM (IST)

    8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत जाहीर करा – खासदार कल्याण काळे

    8 दिवसाच्या आत शासनाने मदत जाहीर केली नाही तर जालन्यात शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा खासदार कल्याण काळे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफी करण्याची गरज आहे त्यामुळे ती तात्काळ करावी. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पडल्या नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असंही काळे यांनी म्हटले आहे.

  • 03 Oct 2025 03:32 PM (IST)

    नांदेड: अतिवृष्टीचा हळद पिकाला मोठा फटका

    नांदेडमध्ये अतिवृष्टीचा हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यथा सांगताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. सरकारने किमान लागवड खर्च द्यावा अशी मागणी शेतऱ्यांनी केली आहे.

  • 03 Oct 2025 03:15 PM (IST)

    वर्धा: दुर्गा पूजा उत्सव मंडपात युवकाची शिवीगाळ

    वर्ध्यात दुर्गा पूजा उत्सव मंडप परिसरात कार्यक्रमादरम्यान एका धर्माच्या युवकाने शिवीगाळ केल्याचा आरोप मंडळाने केला आहे. स्टेशनफैल परिसरात ही घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

  • 03 Oct 2025 02:52 PM (IST)

    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला : रामदास कदम

    उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला, असा आरोप शिंदे शिवसेनेच्या रामदास कदम यांनी केला आहे. तसेच हिमंत असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर बोलावं. एकदा होऊन जाऊदे, अशा शब्दात कदमांनी ठाकरेंना चँलेज केलं आहे.

  • 03 Oct 2025 02:45 PM (IST)

    बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी 14 ऑक्टोबरला भव्य मोर्चा

    एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी बंजारा समाजाकडून छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी 14 ऑक्टोबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मोर्च्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील बंजारा समाज सामील होणार आहे.

  • 03 Oct 2025 02:28 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

    परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्त्यावर बसून आंदोलन केलं जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देत नसल्याने शेतकरी रस्त्यावर बसून निषेध नोंदवत आहेत. प्रशासनाकडून कोणी निवेदन स्वीकारत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने रस्त्यावर बसून निषेध नोंदवावा लागत आहे.

  • 03 Oct 2025 02:25 PM (IST)

    भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकचे 5 लढाऊ विमानं पाडली : हवाईदल प्रमुख

    भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकचे 5 लढाऊ विमानं पाडली. भारताने 5 पाकिस्तान F16 आणि JF17 लढाऊ विमान पाडली. पाकचे लढाऊ विमाने पाडल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. तसेच मोठी हानी झाल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धबंदीची मागणी करण्यात आली”, अशी माहिती हवाईदल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • 03 Oct 2025 02:15 PM (IST)

    जालन्यातील पावसामुळे बदनापूर आणि अंबडमधील पिकांना फटका

    जालन्यातील पावसामुळे बदनापूर आणि अंबडमधील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

  • 03 Oct 2025 01:55 PM (IST)

    नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन

    नाशिक शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याने नाशिककर आक्रमक झाले आहेत. नाशिक दिंडोरी रस्त्यावर आरटीओ कॉर्नर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.

  • 03 Oct 2025 01:40 PM (IST)

    पैठण येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा

    हैदराबाद गॅझेट अधारे बंजारा समाजचा एसटी प्रवर्गात समावेष्ठ करा अशी मागणी बंजारा समाजाने मोर्च्याद्वारे केली आहे. कासवानकर स्टेडियम ते शिवाजी चौक असा बंजारा समाजाचा भव्य मोर्चा आहे.

  • 03 Oct 2025 01:25 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून विराट मोर्चा

    शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार देण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी कडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 03 Oct 2025 01:10 PM (IST)

    अक्षय कुमारच्या लेकीकडे झाली होती न्यूड फोटोची मागणी

    राज्यात होणारे ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून महाराष्ट्रात ‘सायबर जागरूकता महिना’ साजरा केला जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या लेकीकडे देखील न्यूड फोटोची मागणी झाल्याचे सांगितले आहे.

  • 03 Oct 2025 12:54 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचे आभार मानतो, त्यांनी माझे 1 हजार रुपये वाचवले – देवेंद्र फडणवीस

    मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो, त्यांनी माझे 1 हजार रुपये वाचवले. मी आव्हान केलं होतं की, उद्धव ठाकरेंच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा दाखवा, एक हजार रुपये मिळवा. मी पत्रकारांना विचारलं की, मला एक हजाराचा फटका आहे का? अख्ख्या भाषाणात ते विकासावर काही बोलले नाहीत. यावेळी तर सभेला पुढे माणसही नव्हती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 03 Oct 2025 12:51 PM (IST)

    सायबर क्राइमच आपल्यासमोर आव्हान – देवेंद्र फडणवीस

    सध्या सायबर क्राइमच आपल्यासमोर आव्हान. सायबर क्राइला आळा घालण्यासाठी नवीन सेंटर तयार. सायबर क्राइम वाढत आहे. महाराष्ट्रात सायबर जागरुकता महिना साजरा करण्यात येणार . लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 03 Oct 2025 12:26 PM (IST)

    रामदास कदम सारख्या श्वानांना किंमत देत नाही – भास्कर जाधव

    मी काय केलं हे नारायण राणे सांगू शकत नाहीत. कामातून गेलेल्या माणसाबद्दल काय बोलणार?. रामदास कदम सारख्या श्वानांना किंमत देत नाही. काहीजणांनी शाहना भेटून छोटं वॉशिंग मशीन आणलं असावं. सोसायटीची चौकशी लागली म्हणून चिपळूनमध्ये एकाने पक्षांतर केलं असं भास्कर जाधव म्हणाले.

  • 03 Oct 2025 12:15 PM (IST)

    देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला

    वडेल येथील देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण जयेंद्र समाधान भदाणे (वय 23) हा तरुण मोसम नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना. संभाजीनगर सिडको येथील 10 ते 15 तरुण विसर्जनासाठी गेले होते. दोन तरुण नदीत उतरले असता, गौरव महाले वाचला मात्र जयेंद्र बेपत्ता. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रसंग घडला. नदी पात्रात जयेंद्र भदाणे याचा शोध सुरू. रात्री पोलिसांनी गस्त घातली असती तर अपघात टळला असता, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा.

  • 03 Oct 2025 11:42 AM (IST)

    सांगलीत संपत्तीसाठी जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढले, सख्ख्या बहिणींवर जीवघेणा हल्ला

    सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात नात्यांची आब्रू वेशीवर टागणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या जन्मदात्या वडिलांच्या खांद्यावर बसून मुलगा मोठा झाला, त्याच मुलाने केवळ संपत्तीच्या लोभापोटी त्यांना घराबाहेर हाकलून दिले आहे. एवढ्यावरच न थांबता, या मुलाने आपल्या सख्ख्या बहिणींवरही जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप वडिलांनी आणि बहिणींनी केला आहे. विशेष म्हणजे, हल्ला झाल्यावर या मुलानेच आधी आटपाडी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आटपाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.

  • 03 Oct 2025 11:27 AM (IST)

    गोंदियात परतीच्या पावसाचा मोठा घात, 470 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान

    गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा घात केला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ४७० हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अतिवृष्टीचा फटका ८७६ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या उभ्या पिकांची हानी झाली आहे. गोंदिया कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार हे मोठे शेती नुकसान लक्षात घेता, विभागाने त्वरित पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाला तातडीने माहिती देऊन पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. तसेच अधिक माहिती आणि मदतीसाठी सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  • 03 Oct 2025 11:13 AM (IST)

    संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशी होणार – मनोज जरांगे पाटील

    संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशी होणार असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कधी पकडणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात नव्याने लढाई सुरु होणार असेही त्यांनी यावेळी सांगितले

  • 03 Oct 2025 11:05 AM (IST)

    शेतकरी आंदोलनासाठी बैठक घेणार : मनोज जरांगे पाटील

    वेळ आली तर महाराष्ट्रात एकही मंत्री राहणार नाही. मुंडे ज्याच्या प्रचाराला येतील, ती सीट मराठे पाडतील, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनासाठी बैठक घेणार आणि मग पुढची दिशा ठरवणार असल्याचेही स्पष्ट केले.

  • 03 Oct 2025 10:59 AM (IST)

    तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं ? मनोज जरांगे यांचा सवाल

    बीड जिल्ह्यातील मराठे आता शहाणे होतील.  तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं ? मनोज जरांगे यांचा सवाल

  • 03 Oct 2025 10:57 AM (IST)

    शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे दुर्दैवी – खासदार ओमराजे निंबाळकर

    शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.  उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातूनच या सगळ्या नेत्यांना उमेदवारी दिल्या आणि त्यातूनच हे पुढे आले आहेत.  असं असतानाही उद्धव साहेबांवर बोलणे बाळासाहेबांवर बोलणे हे निंदनीय आहे. सामान्य लोक बघत आहेत, खालच्या पातळीला जाऊन टीका करणे हे लोकांना हे आवडत नाही असंही ते म्हणाले.

  • 03 Oct 2025 10:33 AM (IST)

    जळगावात चक्क पोलिस कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, लाखो गमावले

    जळगावात चक्क पोलिस कर्मचाऱ्याची 1 लाख 32 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने 1 लाख 32 हजार 142 रुपयात फसवणूक करण्यात आली.  प्रणेश प्रकाश ठाकूर असे 34 वर्षीय फसवणूक झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत.  याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • 03 Oct 2025 10:19 AM (IST)

    पिंपरी चिंचवड – लिफ्टमध्ये अडकून एका 11 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    लिफ्टमध्ये अडकून एका 11 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी येथे घडली.  पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटी येथे काल संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे.  राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही घटना घडली आहे, 11 वर्षीय मुलगा लिफ्ट सोबत खेळत असताना ही घटना घडली.

  • 03 Oct 2025 10:09 AM (IST)

    निफाड (नाशिक) – पाच महिन्यांपासून सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान

    निफाड (नाशिक) – गेल्या पाच महिन्यांपासून सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.  द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, करपा यांसह अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.  द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचा धक्कादायक अहवाल समोर आला.

  • 03 Oct 2025 09:55 AM (IST)

    मंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

    मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.  15 मिनिटात महाराष्ट्राच्या पुरस्थितीची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही

  • 03 Oct 2025 09:40 AM (IST)

    मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या

    नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या. नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात घडली घटना तीन ते चार जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्राने केला हल्ला

  • 03 Oct 2025 09:30 AM (IST)

    नाशिक शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ‘येलो अलर्ट’

    आज पुन्हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता. नाशिकमधील घाटमाथ्याच्या प्रदेशात आज आणि उद्या असा दोन दिवसांचा ‘येलो अलर्ट’ मागील चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची विश्रांती

  • 03 Oct 2025 09:20 AM (IST)

    जयकुमार गोरे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी

    पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी. रा. स्व. संघाचा ड्रेस परिधान करत, हातात लाठी घेत पथसंचलनात सहभागी. सोलापुरातील पूर्व भागात झालेल्या पथसंचलनात नोंदवला सहभाग

  • 03 Oct 2025 09:10 AM (IST)

    1 लाख 32 हजार 142 रुपयांची फसवणूक

    जळगावात चक्क पोलिस कर्मचाऱ्याची 1 लाख 32 हजार रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने 1 लाख 32 हजार 142 रुपयात फसवणूक.

  • 03 Oct 2025 08:58 AM (IST)

    अश्विन पौर्णिमेनिमित्त तुळजापुरला जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये दोन दिवस बदल

    तुळजापूर येथे अश्विन पौर्णिमेला होणारी गर्दी पाहता आसपासच्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. श्री तुळजाभवानी माता चे दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक हजेरी लावतात यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी नगर, हैदराबाद जाणारा मार्ग तसेच लातूर या तीन मार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिले आहेत.

  • 03 Oct 2025 08:50 AM (IST)

    जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

    15 मिनिटात महाराष्ट्राच्या पुरस्थितीची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही अशी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.शेतकरी म्हणून जगलेलं आमचं सरकार आहे, त्यामुळे कुणाच्या सल्ल्याची आवश्यकता आम्हाला भासणार नाही, असे ते म्हणाले.

  • 03 Oct 2025 08:40 AM (IST)

    धाराशिवच्या व्यापाऱ्याची थेट बिहार मधून फसवणूक

    धाराशिव मध्ये बिहार मधील अज्ञात ऑनलाईन हॅकरनी धाराशिवच्या व्यापाऱ्याला चार लाख रुपयाला गंडा घातलाय. व्यापाऱ्याशी संपर्क साधून क्रेडिट कार्डचा गैरवापर करत फसवणूक करण्यात आलीय. धाराशिव येथील खंडेराव कवडे यांच्या क्रेडिट कार्डवर बिहारमधील पटना येथील अज्ञात व्यक्तीने चार लाख रुपयांच्या वेगवेगळ्या वस्तू मागवल्या मात्र पैसे धाराशिव येथील रघुनाथ कवडे यांच्या खात्यातून कट झाले. बिहार मधील अज्ञात व्यक्तीने कवडे यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने एका ई-कॉमर्स साइटवरून हा प्रकार घडवून आणलाय. याप्रकरणी धाराशिव च्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • 03 Oct 2025 08:30 AM (IST)

    53 हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

    जालना जिल्ह्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे जवळपास साडेतीन लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावर शेती पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांच प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय.त्यामुळे महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत केवळ यापैकी फक्त 53 हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले. पंचनाम्याची गती संथ असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून सातत्याने होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहे.

  • 03 Oct 2025 08:20 AM (IST)

    बिबट्याचा वावर वाढला

    जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे भरदिवसा बिबट्याने श्वानावर हल्ला केला आहे. हा थरार थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे.घराच्या अंगणात श्वानावर बिबट्याने झडप घातली. श्वानाला वाचवण्यासाठी घरातील मुलांनी आरडाओरडा करत आवाज दिला. त्यानंतर बिबट्याने थेट घराकडे धाव घेतली.

  • 03 Oct 2025 08:11 AM (IST)

    करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

    दोर जळाला पण पीळ नाही गेला, अशी टीका करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली. तसेच त्यांनी त्यांच्या आमदारकीवरून पुन्हा निशाणा साधला.

Published On - Oct 03,2025 8:07 AM

Follow us
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....