Nana Patole | ‘पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही भाजपाविरोधातील (BJP) राज्यातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही भाजपाविरोधातील (BJP) राज्यातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलंय. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना नाना पटोले यांनी सांगितलं, की मी वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. येथे मी मागणी केली आहे की देशाची ओळख नायनाट करण्याचा प्रयत्न जे नरेंद्र मोदींचं भाजपाचं सरकार करत आहे, हे सरकार देशातून हद्दपार झाली पाहिजे. आज ते वाशिम जिल्ह्यातील बंजारा बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी इथं संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त आले असता बोलत होते. संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव (जयंती) आज साजरा करण्यात आला. यावेळी भजन सुरू असताना नाना पटोले यांनी बंजारा समाजाच्या कार्यक्रमात टाळ वाजवत, भजन करत कार्यक्रमात सहभाग घेतला.
