Maharashtra Pune Bandh LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 15, 2022 | 8:37 AM

Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Pune Bandh LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking News Live BreakImage Credit source: tv9 marathi

मुंबई : फ्रिडम फ्रॅक्चर्ड या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार काढून घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि चीन सीमाप्रश्न पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी भारत आणि चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सीमाप्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Dec 2022 06:19 AM (IST)

    पुण्यात 68 व्या सवाई गंधर्व महोत्सवाचा शुभारंभ

    उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोद वादनाने सवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात

    यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव 14 ते 18 डिसेंबर दरम्यान

    यंदाच्या महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील माहितीपटाचे होणार प्रदर्शन

    या सोबतच विविध कार्यक्रमांची पुणेकरांसाठी मेजवानी

  • 14 Dec 2022 10:42 PM (IST)

    वर्धा : लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अडकला

    दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

    नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूची कारवाई

    पोलीस उपनिरीक्षक विवेक लोणकर एसीबीच्या जाळ्यात अडकला

    तक्रारदारास मिळालेला जामीन रद्द होऊ नये, यासाठी घेतली लाच

  • 14 Dec 2022 08:18 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य दावा सांगणार नाही

    Marathi News LIVE Update

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य दावा सांगणार नाही

    दोन्ही राज्यातील तीन तीन मंत्री, बैठक घेऊन सीमावादासंबंधी चर्चा करतील

    दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा

    संवैधानिक पद्धतीने या प्रश्नी तोडगा काढण्यात येईल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

    फेक ट्विटर अकाऊंटमुळे दोन्ही राज्यात वाद वाढल्याचा आरोप

    ही बाब गंभीर असून त्याविषयीची चौकशी होईल

    शांतता राखण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याची समिती

  • 14 Dec 2022 08:04 PM (IST)

    उल्हासनगर : कारखान्याला भीषण आग

    उल्हासनगरमध्ये फरसाणच्या कारखान्याला लागली आग

    कॅम्प दोनमधील महादेव कंपाऊंडमध्ये कारखान्याला आग

    नीलकंठ फरसाण नावाच्या कारखान्याला लागली आग

    उल्हासनगर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

    अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

  • 14 Dec 2022 07:47 PM (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठक सुरु

    Marathi News LIVE Update

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठक सुरु

    सीमावादावर आज तोडगा निघणार?

    संसदेतील शाहांच्या कार्यालयात सीमाप्रश्नी बैठक

    बोम्मई, शिंदे, फडणवीस आणि शाह यांच्यात बैठक

    बैठकीनंतर शाह माध्यमांशी संवाद साधणार

  • 14 Dec 2022 06:13 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत दाखल

    Marathi News LIVE Update

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत दाखल

    सीमाप्रश्नावर केंद्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात खलबत

    सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक

    संसदेतील अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक होणार

  • 14 Dec 2022 05:41 PM (IST)

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नासंदर्भात संध्याकाळी 7 वाजता होणार बैठक

    नवी दिल्ली :

    सीमा प्रश्नसंदर्भात 7 वाजता होणार बैठक

    संसदेतल्या शाह यांच्या कार्यालयात होणार बैठक

    अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार होती बैठक

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक

    ऐनवेळी बैठकीचे ठिकाण बदलले

  • 14 Dec 2022 04:46 PM (IST)

    आता विनोद शिरसाट यांचा राजीनामा

    फ्रॅकचर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या वादावरून राजीनामा सत्र सुरूच

    विनोद शिरसाट यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा

    अनघा लेले यांना दिलेला पुरस्कार राज्य सरकारने परत घेतल्याने शिरसाट यांनी दिला राजीनामा

    महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाला पत्र लिहीत शिरसाठ यांचा राजीनामा

  • 14 Dec 2022 04:41 PM (IST)

    सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले

    Marathi News LIVE Update

    सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले

    995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या भाव 54,244 रुपये

    916 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,887 रुपये

    999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 67,976 रुपये होता

  • 14 Dec 2022 04:27 PM (IST)

    पुण्यात आयकर विभागाच्या 40 ठिकाणी धाडी

    पुण्यात आयकर विभागाच्या धाडी

    40 ठिकाणी टाकल्या धाडी

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर

    पहाटेपासून केंद्रीय पथकाच्या सुरु आहेत धाडी

    खाजगी वाहनानं आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले

    पहाटेपासून कागदपत्रे तपासणीचं काम सुरू असल्याची माहिती....

    सूत्रांची माहिती

  • 14 Dec 2022 01:59 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा धरणगाव मार्गावर एसटी व ट्रकचा भीषण अपघात

    अपघातात एसटी चालकासह १० ते १२ प्रवासी जखमी

    जखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश

    जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल

  • 14 Dec 2022 12:48 PM (IST)

    मी कुणाच्या श्रद्धेच्या आड आलेले नाही- अंधारे

    पुणे : मी कुणाच्या श्रद्धेच्या आड आलेले नाही, सुषमा अंधारे यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुषमा अंधारे यांचा पलटवार, पत्रकार परिषदेतून सर्व आरोपांचं केलं खंडन, मी वारकरी संप्रदायाला मानणारी आहे, माझी अंत्ययात्रा काढणारे लोकं भगवे फेटा घालून बसले होते , अशी प्रथा वारकरी संप्रदायात नाही, सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर

  • 14 Dec 2022 12:06 PM (IST)

    अमरावतीत ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची 

    अमरावतीत ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची

    मोर्शी तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे दोन माजी मंत्री सभा घेणार

    भाजप आमदार प्रवीण पोटे आणि आमदार रणजीत पाटील आज जाहीर सभा घेणार

    भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या मतदार संघात भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली

  • 14 Dec 2022 11:30 AM (IST)

    सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याने वारकरी आक्रमक

    पुणे - उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना समज द्यावी,

    वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांची मागणी,

    सुषमा अंधारे यांनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप,

    सुषमा अंधारे राजकिय फायद्यासाठी संताचा अपप्रचार करणं बंद करा,

    सर्व संतांची आणि वारकरी सांप्रदायाची तात्काळ माफी मागा, हिंगोलीकर यांची मागणी.

  • 14 Dec 2022 11:24 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर बंदुकीने गोळीबार

    औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर बंदुकीने गोळीबार करतानाचा व्हिडीओ समोर, समृद्धी महामार्गावर बंदुकीच्या माध्यमातून फायर करत बनवला व्हिडीओ, हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रकार

  • 14 Dec 2022 11:16 AM (IST)

    आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्यावर नवनीत राणांचा निशाणा

    भ्रष्ट अधिकाऱ्यांना नव्या सरकारमध्ये स्थान नाही- नवनीत राणा

    आरती सिंह यांच्या बदलीमुळे अमरावतीच्या पोलीस विभागात समाधानाचे वातावरण- नवनीत राणा

    शाईफेक प्रकरणात नवनीत राणांचा भुजबळांना सवाल

  • 14 Dec 2022 11:06 AM (IST)

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार!

    चंद्रपूर : सावली तालुक्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला,  शेतात जातेवेळी झालेल्या वाघाच्या हल्ल्यात बाबुराव कांबळे नामक शेतकरी जागीच ठार, एकाच आठवड्यातली दुसरी घटना, चंद्रपुरात खळबळ

  • 14 Dec 2022 10:31 AM (IST)

    वसईच्या अग्रवाल उद्योग नगर नाका येथे ट्रान्सफार्मरला भीषण आग

    वसई : वसईच्या अग्रवाल उद्योग नगर नाका येथे ट्रान्सफार्मरला भीषण आग; आज सकाळी दहा वाजताची घटना

    आगीत महावितरणच्या विजेचा ट्रान्सफार्मर पूर्णपणे जळून खाक तर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली

    वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझविण्यात मिळविले यश.

    ट्रान्सफार्मर उघडे असल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज

  • 14 Dec 2022 10:08 AM (IST)

    लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी आज नगरमद्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा

    कालीचरण महाराज, काजल दीदी हिंदुस्थानी मोर्चात सहभागी होणार

    सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात होणार

    या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, तर ड्रोनद्वारे पोलिसांची करडी नजर

  • 14 Dec 2022 09:46 AM (IST)

    भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक

    थोड्याच वेळात भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक

    पंतप्रधान मोदी यांचा केला जाणार भव्य सत्कार

    गुजरात विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आज खासदारांकडून केला जाणार सत्कार

    सत्काराला मोदी काय उत्तर देणार याकडे सर्व खासदारांचं लक्ष

    राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह संसदेत दाखल

  • 14 Dec 2022 09:15 AM (IST)

    अवकाळी पाऊस पावसाची हजेरी

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात काल दुपारी, सायंकाळी आणि आज सकाळी अवकाळी पाऊस पावसाची हजेरी, अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ, कपाशी, कांदा, हरभरा आणि तूर पिकाला नुकसान होण्याची शक्यता

  • 14 Dec 2022 08:30 AM (IST)

    नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात औषधांचा तुटवडा

    रक्त पुसायला मेडिकलमध्ये कापसाचा बोळाही नाही

    औषधांचा तुटवडा असल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल

    17 जीवरक्षक इंजेक्शन, 6 प्रकारच्या सलाईन, बेटॅडिन लोशनचा तुडवडा

    औषध खरेदीसाठी मेडिकलला वर्षाला 10 कोटी मिळतात तरीही औषधांचा तुटवडा

  • 14 Dec 2022 08:28 AM (IST)

    चंद्रपूर - कोळशाच्या साठ्यावर धाड, २५ टन कोळसा जप्त

    एकाला अटक, एक फरार : गडचांदूरातील घटना

    गडचांदूर येथील भोयेगाव परिसरात अवैध कोळसा साठ्यावर धाड

  • 14 Dec 2022 08:26 AM (IST)

    दिल्लीची कंपनी करतेय पुणे मनपाची फसवणूक?

    ‘स्वच्छ पुणे' या प्रकल्पाअंतर्गत पुणे मनपाची फसवणूक

    मनसे नेते वसंत मोरे यांचा आरोप

    वापरलेल्या पाणी बॅाटल जमा करणाऱ्या ‘स्वच्छ एटीएमला‘ विरोध

  • 14 Dec 2022 08:07 AM (IST)

    झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक

    पुणे : झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक,

    छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्रानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिला अखेरचा इशारा,

    हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून 18 डिसेंबरला टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार

    या चित्रपटास छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेसह राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध आहे.

  • 14 Dec 2022 07:49 AM (IST)

    अमरावती आणि नाशिक विभागातून कोल्हापुरात जनावरांची वाहतूक करायला बंदी

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

    दोन्ही विभागात लम्पिच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

    जनावरांच्या आठवडी बाजाराला देखील मज्जाव

    जनावरांचा आठवडा बाजार आणि इतर विभागातून जनावरांच्या वाहतुकीबाबत गेल्या काही दिवसापासून होती संभ्रमावस्था

  • 14 Dec 2022 07:47 AM (IST)

    चंद्रकांत पाटील शाइफेक प्रकरणी निलंबित झालेले 10 पोलीस पुन्हा सेवेत

    पिंपरी चिंचवड : चंद्रकांत पाटील शाइफेक प्रकरणी निलंबित झालेले 10 पोलीस पुन्हा सेवेत, सर्वावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत करण्यात आलं होतं निलंबन, मात्र दबाव वाढल्याने या 10 पोलीस पुन्हा सेवेत दाखल

  • 14 Dec 2022 07:21 AM (IST)

    पॉलिश करण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरले

    मालेगाव : मनमाडला पॉलिश करण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरून महिला फरार, संशयित महिला सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरु

  • 14 Dec 2022 07:03 AM (IST)

    अवघ्या नऊ महिन्यांतच शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली

    21 एप्रिल रोजी सूत्रे घेतली होती हाती

    काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयातील तीन उपायुक्तांची देखील झाली होती बदली

    त्यामुळे नाशिक पोलीस दलाची सूत्रे आता नव्या अधिकाऱ्यांच्या हाती

    पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी

    अंकुश शिंदे यांनी याअगोदर नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून केले कामकाज

  • 14 Dec 2022 07:01 AM (IST)

    अमरावतीत येत्या 17 डिसेंबरला 23 केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा

    6 हजार 577 उमेदवार देणार परीक्षा, परीक्षेसाठी 740 अधिकारी व कर्मचारी सज्ज

    शासनाच्या विविध विभागातील जागांसाठी होत आहे एमपीएससीची परीक्षा

    परीक्षेसाठी प्रशासन झाले सज्ज

  • 14 Dec 2022 06:24 AM (IST)

    सोलापूर बंदमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे सहभागी होणार नाही

    राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला आमचा पाठिंबा नाही

    राष्ट्रपुरुषांच्या अवमानाप्रकरणी 16 डिसेंबरला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे सोलापूर बंदची हाक देण्यात आलीय

    सोलापूर बंदची हाक ही महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे

    सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु ठेवण्याचे केले आवाहन

  • 14 Dec 2022 06:21 AM (IST)

    धुळे- मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ भीषण अपघात

    महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक

    अपघातात 2 ठार तर 1 जण जखमी

    महामार्गावर नादुरुस्त ट्रकच काम करत असताना झाला अपघात

    अपघातात मेकॅनिकसह ट्रकमधील एकजण ठार

  • 14 Dec 2022 06:19 AM (IST)

    नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या तथा डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात समजकटकांचा हल्ला

    प्राची पवार यांच्यावर धारधार शास्त्राने हल्ला

    प्राची पवार या माझी आमदार व राष्ट्रवादीचे माजी दिग्गज नेते वसंत पवार यांच्या कन्या

    प्राची पवार यांची प्रकृती गंभीर

    त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर

  • 14 Dec 2022 06:16 AM (IST)

    दर तीन-चार मिनिटाला एक बलात्कार, काय देश आहे हा?: भालचंद्र नेमाडे

    देशातल्या कायदा व सुव्यवस्थेवरच लेखक भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

    जळगावातील जैन समूहाने साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केलं होतं

    या सोहळ्यानंतर लेखक भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांशी बोलताना परखड मतं मांडली

  • 14 Dec 2022 06:12 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे, जनतेतून थेट सरपंच निवड असल्यामुळे चुरस वाढली

    कल्याण तालुक्यात नऊ ग्रामपंचायत निवडणूका

    1 ग्रामपंचायत बिनविरोध तर 8 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

    प्रशासनाकडून 8 ग्रामपंचायतींसाठी 24 मतदान केंद्र उभारत कर्मचाऱ्यांना मतदान प्रशिक्षण देणाचे कार्य सुरू

Published On - Dec 14,2022 6:09 AM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.