PCMC Election Results 2026 LIVE : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयासाठी मोठी रेस्सीखेच, प्रभाग क्रमांक 1 ते 4..
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यात निवडणूक आयोगाने 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरली.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. संपूर्ण राज्याच्या नजरा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे लागल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 2017 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण 4 वॉर्ड आहेत. या 2026 च्या निवडणुकीमध्येही तिच परिस्थिती होती. पिंपरी चिंचवड येथे 4 वॉर्ड प्रमाणे निवडणुका लढवल्या गेल्या. पिंपरी चिंचवड पालिकेवर कायमच अजित पवारांचे वर्चस्व राहिले असून गेल्यावेळी भाजपाने मोठा इतिहास रचत पालिकेत एकहाती सत्ता मिळवली. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाने मोठी चाल खेळत भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे प्रवेश अजित पवार गटात करून घेतले. यासोबतच अजित पवारांनीही म्हटले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत पक्षाची सत्ता हवी.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय समीकरणे बदलली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका वॉर्ड क्रमांक 1 मध्ये एकूण लोकसंख्या 40767 आहे. त्यापैकी अनुसूचित जाती 5348, अनुसूचित जमाती 956 याप्रमाणे. तळवडे गावठाण, एम.आय.डी.सी. आय. टी. पार्क, ज्योतीबा मंदीर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर इथेपर्यंत प्रभाग क्रमांक 1 येतो.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण लोकसंख्या 31161, अनुसूचित जाती 5209, अनुसूचित जमाती 434 याप्रमाणे आहे. चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती, सोनवणे वस्ती, कुदळवाडी इथेपर्यंत प्रभाग क्रमांक 2 आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकून मतदारांची संख्या 37671 आहे, त्यापैकी अनुसूचित जाती 5805 आणि अनुसूचित जमाती 641 मतदार आहेत. पुणे-नाशिक रस्त्यासून पुणे इंटरनॅशल एक्सिबिशन सेंटर, जाधववाडी, एम.एन.जी.एल. गॅस स्टेशन लगतच्या चौकापर्यंत प्रभाग क्रमांक 3 आहे
प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोशी गावठाण, गंधर्वनगरी, आदर्शनगर, डुडूळगाव, नागेश्वरनगर, सदगुरुनगरपर्यंत आहे. त्यामध्ये एकून मतदारांची संख्या 39646 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 39646 तर अनुसूचित जमाती 1204 मतदार आहेत. सध्या सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांनी जोरदार पद्धतीने आपआपल्या परीने प्रचार सुरू केला. भाजपाची सत्ता महापालिकेवर असली तरीही अजित पवार गटाकडून मोठा दावा केला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये गळती लागल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केली जात आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
