AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोर उमेदवारासह अधिकृत उमेदवारही भाजपमध्ये, उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका; पुण्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

PMC Election : पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

बंडखोर उमेदवारासह अधिकृत उमेदवारही भाजपमध्ये, उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका; पुण्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग
PMC Election Shivsena ubtImage Credit source: Google
| Updated on: Jan 06, 2026 | 5:43 PM
Share

राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. अशातच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का

पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9 (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक 11 (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचे पाटील यांनी पक्षात स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अतिशय आनंद देणारे असून, यापूर्वी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही नांदी आहे.’

या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....