Karuna Sharma News : मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम अजित पवार करतात.. ; करुणा शर्मांचा आरोप

Karuna Sharma News : मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम अजित पवार करतात.. ; करुणा शर्मांचा आरोप

| Updated on: Mar 07, 2025 | 10:32 PM

Santosh Deshmukh Death Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर आता करुणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रीपदाचा गैरवापर करून मुंडे आणि त्यांचे साथीदार अशी कृत्य करतात. मात्र आज सगळ्यांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली आहे. काल करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हंटलं होतं. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने सादर केलेल्या आरोप पत्रात हत्येचे व्हिडिओ आणि फोटो देखील आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो आता माध्यमांमधून समोर आलेले आहेत. त्यातून संतोष देशमुख यांचे झालेले अमानुष हाल पाहून सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मी एक फोटो बघितला, त्यात संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्यावर तोंडावर लघवी करत आहे. यातूनच आरोपींची मानसिकता आपल्याला कळते. हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडिओ काढले गेले. वाल्मिक कराड तो व्हिडिओ लाईव्ह बघत आहे. त्यांनी जी लघवी केलेली आहे ती संतोष देशमुख यांच्या तोंडावर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर केलेली लघवी आहे. आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे? असा प्रश्न यावेळी करुणा शर्मा यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अजित पवार हे सुरूवातीपासून धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आलेत. या प्रकरणातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालीय. मी 27 वर्ष त्यांच्या घरात राहिले आहे. मंत्री कसा वागतो? हे मी जवळून पाहिले आहे, असा आरोप देखील करुणा शर्मा यांनी केला आहे.

Published on: Mar 04, 2025 11:47 AM